योगासनांमधील म्हणायला गेले तर सगळ्यात सोपे पण प्रभावी आसन म्हणजे ‘वज्रासन’. वेगवेगळ्या कारणांसाठी योगासनं केली जातात. जर तुम्हाला योगा करण्याचा फारसा वेळ नसेल तर वज्रासनासारखे सोपे आसन नाही. वयाच्या कोणत्याही वर्षी हे आसन करता येते. वज्रासनाच्या पूर्वस्थितीपासून अंतिस स्थितीपर्यंत सगळ्या कृती अगदी व्यवस्थित आणि नीट केल्या तर त्याचे फायदे तुम्हाला मिळतात. योगासनांच्या मदतीने तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळतात. योगासनांच्या मदतीने वजन कमी होते. वजन नियंत्रणात राहण्यापासून ते मन स्थिर करण्यासाठी योगासनं ही महत्वाची असतात. वज्रासन या आसनाबाबतही अगदी तसेच आहे. वज्रासनाचे वेगवेगळे फायदे (vajrasana benefits in marathi) आहेत. ते जाणून घेतले तर तुम्ही वज्रासन नियमितपणे कराल.
'वज्रासन' या शब्दाची फोड केली तर ‘वज्र + आसन’ असा होतो. वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र शिवाय याचा अर्थ जननेंद्रीय असाही केला जातो. या आसनाचा परिणाम ओटीपोटावर व जननेंद्रीयावर होतो म्हणून हे आसन फार फायद्याचे असते. ध्यानधारणा करण्यासाठीही या आसनाचा उपयोग केला जातो. या आसनाची पकड इतकी मजबूत असते की, त्यावरुनच या आसनाचे नाव असे ठेवण्यात आले आहे. वज्रासन करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. अगदी कधीही हे आसन तुम्हाला करता येऊ शकते. पचनशक्ती, वजन कमी करण्यासाठी, लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी, झोप सुधारण्यासाठी हे आसन फारच फायद्याचे असते.
वज्रासन हे आसन वेगवेगळ्या कारणांसाठी फारच फायदेशीर असते. नेमके कोणत्या कारणासाठी हे आसन करायला हवे हे जाणून घेण्यासाठी वाचा वज्रासनाचे फायदे. म्हणजे तुम्ही हे आसन करु शकाल.
बसण्याची पद्धत, चालण्याच्या सवयी यामुळे अनेकदा आपल्याला अंगदुखी होते. शरीराचे वाढलेले वजन देखील यासाठी कारणीभूत असते. जर तुम्हालाही कोणत्याही कारणामुळे अंगदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही वज्रासन करा. वज्रासन करताना तुमच्या शरीराचा सगळा भार मांड्यांवर घेतला जातो. काही काळांसाठी पायावर हा भार पडल्यामुळे थोडासा त्रास होतो. पण त्यानंतर अंगदुखी, गुडघेदुखी कमी होण्यास मदत मिळते. अंगदुखीपासून सुटका करण्यासाठी तुम्ही वज्रासन करण्यास काहीच हरकत नाही.
पाठीच्या दुखण्याचा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही अगदी हमखास वज्रासन करायला हवे. वज्रासन करताना तुमच्या पाठीचा कणा हा ताठ राहतो. त्यामुळे पाठीसंदर्भातील इतर त्रास कमी होतात. बरेचदा बसण्याची चुकीची पद्धत ही देखील पाठीच्या कण्याला दुखापत देते. जर तुम्ही जास्त काळासाठी पोक काढून बसत असाल तर तुम्हाला हा त्रास होणे अगदी स्वाभाविक आहे. तुमच्या बसण्याची पद्धत चुकते हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही दिवसातून एकदा तरी वज्रासन करायलाच हवे. पाठदुखी असणाऱ्यांनी हे आसन करण्यास काहीच हरकत नाही. पण तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले. कारण जर तुम्हाला बसण्याचा त्रास असेल तर हे करताना थोडासा अडथळा नक्की येईल. पण हे आसन तुम्हाला थोड्या दिवसाने नक्की करता येईल.
वज्रासनाच्या फायद्यापैकी आणखी एक फायदा म्हणजे लैंगिक क्षमता वाढवणे. शरीराला आलेला क्षीण घालवण्यासाठी वज्रासन फारच फायद्याचे असते. सेक्स लाईफ चांगले करण्यासाठी हे आसन फार महत्वाचे आहे. जर सेक्समध्ये तुम्हाला समाधान मिळत नसेल किंव स्टॅमिना कमी आहे असे वाटत असेल तर हे आसन फार महत्वाचे आहे. शरीराचा ताण घालवून तुम्हाला जोडीदारासोबत आनंद देण्यासाठी हे आसन तुम्हाला करता येऊ शकते. अभ्यासांती अशा गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष दोघांनी वज्रासन करायलाच हवे.
निरोगी शरीरासोबतच मनाची शांती ही देखील आरोग्यासाठी फार महत्वाची असते. जर तुम्ही मानसिक तणावाखाली असाल किंवा कोणत्याही गोष्टीत तुमचे मन लागत नसेल तर तुम्ही वज्रासन करायला हवे. वज्रासनाच्या स्थितीमध्ये गेल्यानंतर शरीराला इतका आराम मिळतो की त्यामुळे मनाची शांंती मिळते. वज्रासनाच्या या स्थितीमध्ये तुमचे श्वसन कार्य सुरळीत चालते. त्यामुळे मनावर ताबा मिळवता येतो. याशिवाय उच्चरक्तदाब, ताणतणाव या सगळ्यापासून तुम्हाला दूर ठेवते.
पचनासंदर्भातील त्रास अनेकांना असतो. पोटाच्या विकारासाठी वज्रासन हे आसन फार महत्वाचे आणि चांगले आहे. वज्रासनाच्या स्थितीमध्ये शरीरातील चयापचय क्रिया चांगली होते. वज्रासनात बसताना पोटाला एक ताण मिळतो. हा ताण मिळाल्यामुळे शरीरात रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो.पाय, मांड्या यांच्याकडे अडणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या असलेल्या इतर समस्या कमी होतात. जर तुम्हाला गॅसेसचा त्रास असेल तरी देखील तुम्ही आसन करु शकता. जेवून झाल्यानंतर तुम्ही हे आसन केले तर तुमच्या पोटाचे आरोग्यही चांगले राहते. पचन चांगले झाले तर तुमची त्वचाही चांगली होते. त्वचेवर ग्लो आणण्यासाठीयोगासनं आहेत
मन अशांत असेल तर एखाद्या गोष्टीत लक्ष लागणे हे फारच कठीण असते. हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे आणि कामांच्या स्वरुपामुळे खूप जणांना योग्यवेळी झोप लागत नाही. निद्रानाशाचा त्रास तुम्हाला असेल तर तुम्ही वज्रासन करायला हवे. वज्रासन केल्यामुळे मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत मिळते. मन शांत असेल आणि पोटाचे आरोग्य चांगले असेल तर झोप पटकन येते. झोप येण्याचा त्रास असणाऱ्यांना झोपेपूर्वी अवघ्या 5 मिनिटांसाठी का असेना हे आसन करावे तुम्हाला नक्कीच चांगली झोप येईल.
शरीरातील फॅट कमी करण्यासाठी आणि बॉडी टोन्ड करण्याचा जर तुमचा विचार असेल तर तुम्ही वज्रासन करायला हवे. तुमच्या BMI वरुन तुम्ही स्थुल आहात की नाही हे निश्चित होते.BMI म्हणजे बॉडी मास. बॉडी मास नियंणात ठेवण्यासाठी वज्रासन मदत करते. जर तुमचे बॉडी मास नियंत्रणात राहिले तर तुमचे शरीर अधिक सुडौल आणि चांगले दिसू लागते. अगदी महिनाभर हा प्रयोग करुन पाहा तुम्हाला तुमच्या शरीरात नक्कीच बदल झालेला जाणवेल. तुम्ही कोणतेही योगासन केल्यानंतर हे आसन सगळ्यात शेवटी केले तरी चालेल.
वज्रासनाचे फायदे वाचता हे आसन करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर या काही स्टेप्स फॉलो करुन तुम्ही हे आसन करा.
पूर्वस्थिती: वज्रासनाच्या पूर्वस्थितीत तुम्हाला दोन्ही पाय पसरुन बसायचे आहे. दोन्ही हात नितंबाच्या बाजूला ठेवायचे आहे.
असे करावे आसन:
महत्वाची गोष्ट: आसन सोडताना डोळे अलगद उघडावे. एकेक पाय सरळ करुन घ्यावा आणि निवांत व्हावे. दररोज हे आसन केल्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे मिळतील.
पोटाचे आरोग्य चांगले करण्यासाठी वज्रासन हे आसन फारच लाभदायक आहे. कोअर मसलसाठी हा व्यायाम चांगला असल्यामुळे पोटाचा घेर कमी करण्यासाठी हे आसन मदत करते. पोटाचे मसल टोन्ड करण्यासाठी हे आसन तुम्ही करु शकता. पोटाचा घेर कमी करायचा असेल तर तुम्ही दिवसातून एकदा तरी वज्रासन करायला हवे त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल.
वज्रासन करण्यासाठी कोणतीही ठराविक अशी वेळ नाही. तुम्ही वज्रासन कधीही करु शकता. जर तुम्हाला खूप पोट भरल्यासारखे वाटत असेल. पोटात गडबड वाटत असेल तरी देखीत तुम्ही आसन करु शकता हे आसन केल्यानंतर तुम्हाला आराम मिळेल. जेवल्यानंतर तुम्ही रोज वज्रासन केले तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होईल.
वज्रानामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. त्यामुळे यकृताचे कार्य सुरळीत चालते. सायटिका संदर्भातील आजार ही दूर राहतो. त्यामुळे चांगल्या यकृतासाठीही तुम्ही हे आसन करावे.