आयपीएस विश्वास नांगरे पाटील आज अनेक तरूणांचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्राचे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या यशाचा प्रवास सुखकर नक्कीच नव्हता अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी त्यांच्या आयुष्यात यशाचं शिखर गाठलेलं आहे. त्यांच्या हा जीवनप्रवास अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. यासाठीच ते नेहमी त्यांच्या व्याख्याने, पुस्तके आणि कार्यातून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत असतात. तरूणांनी आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवण्यासाठी असे विचार नक्कीच प्रोत्साहन देणारे ठरू शकतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत विश्वास नांगरे पाटील यांचे कोट्स तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
यश आणि अपयश हे जगण्याचा एक भाग आहेत. असलं तरी यश मिळवण्यासाठी प्रयत्न आणि मेहनतीची शिकस्त करावी लागते. यासाठीच हे विश्वास नांगरे पाटील कोट्स ऐका आणि तसा जगण्याचा प्रयत्न करा.
१. "माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण मात्र त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं" - विश्वास नांगरे पाटील
२. "ज्यांचे कष्ट दमदार असतात त्यांचे जगणं वागणं रूबाबतच असतं" - विश्वास नांगरे पाटील
३. "पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी औकात" - विश्वास नांगरे पाटील
४. "ज्याला खरोखरच लक्ष गाठायचं आहे, त्याने सर्व गोष्टींवर लक्ष ठेवायला हवे" - विश्वास नांगरे पाटील
५. "आमच्या खांद्यावर जी आई पी एस ची पाटी आहे, त्यावरील सर्व्हिस हा शब्द महत्त्वाचा आहे" - विश्वास नांगरे पाटील
६. "जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवा" - विश्वास नांगरे पाटील
७."ज्यांना स्वप्न पाहायची असतात, त्यांना रात्र मोठी हवी असते, ज्यांना स्वप्न साकार करायची असतात, त्यांना दिवस मोठा हवा असतो" - विश्वास नांगरे पाटील
८. "आठवू नकोस भूतकाळातील काही ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक, स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस, स्वप्नांसाठी हट्टाने जगायला शिक" - विश्वास नांगरे पाटील
९. "जिथे तुम्ही जाल तिथे तुमची गरज निर्माण करा" - विश्वास नांगरे पाटील
१०. "हार पत्करणे माझे ध्येय नाही कारण मी बनलोय जगण्यासाठी" - विश्वास नांगरे पाटील
जीवनात चांगले वाईट प्रसंग प्रत्येकाच्या अनुभवला येतात मात्र अशा प्रसंगाना तुम्ही कसे तोंड देता हे महत्त्वाचे आहे. विश्वास नांगरे पाटील यांचे प्रेरणादायी विचार तुम्हाला अशा प्रसंगांना ध्येर्याने तोंड देण्याचं बळ देतील - विश्वास नांगरे पाटील
१.विपरित परिस्थितीत काही लोक तुटून जातात तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात - विश्वास नांगरे पाटील
२. अडचणी आयुष्यात नाही मनात असतात, ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल - विश्वास नांगरे पाटील
३. आपलं जे अस्तित्व आहे, व्यक्तिमत्त्व आहे, ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.
४. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर... आईवडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या आनंदअश्रूंसाठी मोठं व्हायचं आहे हे लक्षात ठेवा - विश्वास नांगरे पाटील
५. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका, कारण यशस्वी गणिताची सुरूवातच शुन्यापासून होते - विश्वास नांगरे पाटील
६. पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण परत पुन्हा लढण्यास तयार होणं ही जीवंतपणाची निशाणी आहे - विश्वास नांगरे पाटील
७. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडून देऊ नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात - विश्वास नांगरे पाटील
८. कष्ट इतके शांततेत करा की तुमचे यश धिंगाणा घालेल - विश्वास नांगरे पाटील
९. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामधे धमक असते - विश्वास नांगरे पाटील
१०. इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे - विश्वास नांगरे पाटील
महात्मा ज्योतिबा फुले विचार मराठीमध्ये (Mahatma Jyotiba Phule Quotes In Marathi) जे तुमच्या जीवनाला दाखवतील नवी दिशा
विश्वास नांगरे पाटील यांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगात वीरश्री संचारते मग त्यांचे हे प्रेरणादायी विचार आणि शायरी (Vishwas Nangare Patil Shayari) तुमच्या मनाला नक्कीच प्रोत्साहन देतील
१. जिथे तुमची हिम्मत संपते तिथे तुमच्या पराभवाला सुरूवात होते - विश्वास नांगरे पाटील
२. अभ्यास केल्याने कोणाच्या अंगाला भोक पडलं अथवा कोणी मेलं असं मी आजवर ऐकलेलं नाही - विश्वास नांगरे पाटील
३. शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते - विश्वास नांगरे पाटील
४. तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचण किती आहे पण तुमच्या अडचणींना अवश्य सांगा की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत - विश्वास नांगरे पाटील
५. ज्यांचे आदर्श छत्रपती शिवराय असतील ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाहीत - विश्वास नांगरे पाटील
६. स्वतःवर विश्वास असेल तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही - विश्वास नांगरे पाटील
७. यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असते पण त्याची एकाग्रता ही एखाद्या लेझरसारखी असते
८. प्रेम बिम धोका आहे अभ्यास करा हाच मोका आहे - विश्वास नांगरे पाटील
९. आपली चांगली वेळ जगाला सांगते की, आपण काय आहोत. पण आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे - विश्वास नांगरे पाटील
१०. आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही - विश्वास नांगरे पाटील
वाचा - स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार (Swami Vivekananda Thoughts In Marathi)
सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी आणि जगण्याला नवी प्रेरणा देण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांचे विचार
१.परिक्षा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची एक संधी - विश्वास नांगरे पाटील
२. रोज सकाळी उठल्यावर तुमच्यासमोर दोन पर्याय असतात, एक स्वप्नं बघत झोपा आणि दुसरा उठा, स्वप्नांचा मागे लागा - विश्वास नांगरे पाटील
३. जबाबदारीची जाणीव असली की सकाळी कोणत्याच वेळेला उठण्याचा कंटाळा येत नाही - विश्वास नांगरे पाटील
४. मॅनजमेंट प्लॅनिंग शिकायचं असेल तर ते छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून शिका - विश्वास नांगरे पाटील
५. सोळा सतरा वर्षाचं वयच असं आहे की या वयात चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं वाटते, ती गोष्ट कदाचित अनुकुचीदार काचही असू शकते. ती काच कधी लागेल, त्याची कधी जखम होईल, ती जखम कधी चिघळले, आणि त्याचं कधी गॅंगरिन होईल आणि कधी आयुष्य उधवस्त होईल, हे कळतही नाही - विश्वास नांगरे पाटील
६. आयुष्यामध्ये या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत
७. वाट पाहत राहिलो तर इतरांनी न निवडलेलं, शिल्लक राहिलेलं, शिळंच ताटात पडेल, हे नक्की आहे - विश्वास नांगरे पाटील
८. मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडणार नाही, साखर झोप घेणार नाही, असा संकल्प करून पेटून उठा - विश्वास नांगरे पाटील
९. नदीत पडल्यावर ज्याला पोहता येत नाही तोच गटांगळ्या खातो, बुडतो, मरतो. पण ज्याला पोहता येतं, त्याला पाण्याशी स्पर्धा करता येते, त्याला लाटेवर आरूढ होता येतं, त्याच्यासाठी नदीत मारलेला सूर हा आनंद आहे, साहस आहे, सॉलिड मज्जा देणारी गोष्ट आहे - विश्वास नांगरे पाटील
१०. कष्ट करून जिद्दीने, प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतःला एवढं सिद्ध करायचं आहे की, नियतीने सुद्धा विचारावं, बोल तेरी रजा क्या है? - विश्वास नांगरे पाटील
वाचा - महात्मा गांधीचे विचार देतील तुमच्या आयुष्याला नवी दिशा (Mahatma Gandhi Quotes In Marathi)