डाएट करायलाच नको फक्त करा हे 5 व्यायामप्रकार

डाएट करायलाच नको फक्त करा हे 5 व्यायामप्रकार

वजन तर सगळ्यांनाच कमी करायचं असतं पण त्यासाठी करावा लागणारा डाएट खूप जणांना जमत नाही. उपाशी राहून आणि फक्त हेल्दी खाऊन जगणं खूप जणांसाठी फारच कठीण असतं. ‘डाएट सोडून बाकी सगळं काही सांगा आम्ही करु’ असे म्हणत खूप जणं डाएटकडे पाठ फिरवून व्यायाम करण्याकडे भर देतात. जर तुम्हालाही डाएट करायचा कंटाळा असेल आणि ते न करता वजन कमी करायची इच्छा असेल तर तेही काही अंशी शक्य आहे. डाएट न करता रोजचा आहार घेतही तुम्ही वजन कमी करु शकता. फक्त हे वजन कमी करण्यासाठी तुम्ही 5 असे व्यायामप्रकार आहेत जे नियमित करायला हवेत. जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठी योग्य असे 5 व्यायामप्रकार

डाएट करणाऱ्यांसाठी ऑनलाईन चमचमीत आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी

क्रॉस जॅक्स (Cross Jacks)

Giphy

जंपिंग जॅक्सच्या पुढील प्रकार म्हणजे क्रॉस जॅक्स (Cross Jacks). संपूर्ण शरीराला थकवून टाकणारा असा हा व्यायामप्रकार आहे. यामध्ये बऱ्यात कॅलरीज बर्न होतात. पायांसाठी हा उत्तम असा व्यायाम आहे. साधारणपणे महिलांमध्ये मांड्या जाड आणि स्थुल असण्याचा त्रास असतो. या मांड्या कमी करण्यासाठी  हा व्यायामा चांगला आहे. हा व्यायाम करताना सुरुवातीला दोन पायांमध्ये अंतर ठेवून उभे राहा. कंबरेबर हात ठेवून डावा पाय उजव्या बाजूला आणि उजवा पाय डाव्या बाजूला आणत उड्या मारा. अशा किमान 40 उड्या तरी मारा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच हा बदल जाणवेल.

स्कॉट्स (Squats)

Giphy

पाय, नितंब आणि मांड्यासाठी उत्तम असा व्यायाम आहे. अगदी कधीही करता येईल असा हा व्यायाम आहे. यामध्येही तुम्हाला बरेच प्रकार करता येतात. एक दिवस नुसते स्कॉट्स एक दिवस सुमो स्कॉटस त्यानंतर सेमी स्कॉट्स मारुन तुम्ही त्यामध्ये विविधता आणू शकता. त्यामुळे स्कॉटस तुम्ही हमखास माराच. सुरुवातीला 20 आणि त्यानंतर पुढे वाढवत जाता. सुरुवातीला या असे केल्यास थोड्या मांड्या दुखावल्या जातील पण नंतर हळुहळू तुम्हाला त्याची सवय लागेल. 

आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)

पुश अप्स (Pushups)

GIPHY

अप्पर बॉडीसाठी सगळ्यात उत्तम असा व्यायामप्रकार म्हणजे पुश अप्स. हा व्यायाम केल्यामुळे छाती, खांदे आणि हातांचा उत्तम व्यायाम होतो. पुशअप्स मारणे म्हणजे शरीराचा संपूर्ण भार हातावर तोलणे हा व्यायाम प्रकार करताना थोडी मेहनत घ्यावी लागते. सुरुवातीला हाफ पुशअप्स मारुन तुम्ही सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही पुशअप्सची संख्या वाढवा. तुम्हाला तुमचे शरीर टोन्ड वाटू लागेल. पुशअप्स रोज मारले तरी चालू शकतात.

जॉगिंग (Jogging)

Giphy

संपूर्ण शरीरासाठी उत्तम असा आणखी एक व्यायामप्रकार म्हणजे जॉगिंग. जॉगिंगमुळे वजन कमी व्हायला मदत मिळते. दिवसातून किमान 30 मिनिटं तरी तुम्ही जॉगिग करा. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. कॅलरीज बर्न होतात. भूक चांगली लागते. पोटाचे आरोग्य चांगले होते. वजन वाढीच्या अन्य समस्या दूर होतात. त्यामुळे अगदी आवर्जून रोजच्या रोज तुम्ही जॉगिंग केले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळू शकतो.

55 मिनिटे खाण्याचा डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन आहे तरी काय?

क्रंचेस (Crunches)

Giphy

पोटावरील चरबी करण्यासाठी उत्तम असा व्यायामप्रकार म्हणजे क्रंचेस. पाठीवर झोपून पायांची घडी करुन घ्या. आता हात डोक्याखाली घेऊन गुडघ्याच्या दिशेने शरीर वर उचला. असे करताना ओटी पोटात चांगलाच ताण जाणवतो. हा व्यायाम पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हा व्यायाम तुम्ही अगदी हमखास करायला हवा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. 


आता डाएट करु नका फक्त योग्य पद्धतीने आणि योग्यवेळी हा व्यायाम करा तुम्हाला तुमच्या वजनात नक्कीच फरक जाणवेल.