ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
चेहऱ्याचे तारुण्य टिकवणाऱ्या बोटॉक्स ट्रिटमेंटबद्दल तुम्ही काय जाणता

चेहऱ्याचे तारुण्य टिकवणाऱ्या बोटॉक्स ट्रिटमेंटबद्दल तुम्ही काय जाणता

वय कितीही वाढले तरी सौंदर्यात कोणतीही कमतरता होऊ नये असे प्रत्येक स्त्रीला वाटते. सुंदर दिसणे हा जणू स्त्रीचा अधिकारच आहे. पूर्वी फक्त योग्य काळजी आणि पार्लरच्या जीवावर सौंदर्य सोपवलेले असायचे पण आता विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की,तारुण्य जास्तीत जास्त काळासाठी टिकवणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना शोधून काढल्या आहेत. ‘बोटॉक्स’ ही अशी ट्रिटमेंट आहे ज्याबद्दल फार काही बोलले जात नव्हते पण आता सगळ्यांनाच ही ट्रिटमेंट माहीत झाली आहे. पण बोटॉक्स म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया या ट्रिटमेंटची थोडक्यात आणि सोप्यात सोप्या शब्दात समजेल अशी माहिती

त्वचेची खोलवर स्वच्छता करणारी मायक्रो डर्मा ट्रिटमेंट आहे तरी काय

बोटॉक्स म्हणजे काय?

बोटॉक्स म्हणजे काय?

Instagram

ADVERTISEMENT

बोटॉक्स हे ‘न्युरोटॉक्सिन’ आहे. वय जसे वाढते तशी त्वचा सैल पडू लागते. त्वचा सैल पडू लागली की, अर्थातच आपला चेहरा अनाकर्षक दिसू लागतो. अशावेळी हे न्युरोटॉक्सिन तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंना ताणण्याचे काम करते.  बोटॉक्सचे नाव हे त्यामधील असलेल्या  ‘बोट्युलिनम टॉक्सिन’च्या नावाने केले जाते. हे इंजेक्शन स्नायूमध्ये दिले जाते. त्यामुळे थोड्यावेळासाठी चेहरा सुजल्यासारखा वाटतो.  चेहऱ्यावरील जेथील त्वचा सैल असेल त्या ठिकाणी हे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन दिल्यानंतर त्या भागातील सुरकुत्या कमी होतात.  त्वचा अधिक आकर्षक दिसू लागते. 

आयब्रोजना शेप द्या मायक्रोब्लेडिंग ट्रिटमेंटने, जाणून घ्या फायदे

कशी केली जाते बोटॉक्स ट्रिटमेंट

बोटॉक्स असे केले जाते

Instagram

ADVERTISEMENT

जर तुम्ही बोटॉक्स ट्रिटमेंट करण्याचा विचार करत असाल तर ही ट्रिटमेंट नेमकी कशी केली जाते ते जाणून घेऊया. 

  • बोटॉक्स ट्रिटमेंट कुठेही केली जात नाही. विशिष्ट स्किन क्लिनिकमध्येच केले जाते.योग्य तज्ज्ञांंच्या अध्यक्षतेखाली ही ट्रिटमेंट केली जाते. 
  • डोळ्यांच्या आजुबाजूचा भाग, ओठांच्या आजुबाजूचा भाग, गाल या भागावर बोटॉक्सचे इंजेक्शन दिले जाते.
  •  चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या सुरकुत्या असतात. त्यामुळे सगळ्याच सुरकुत्या काढून टाकता येत नाही. त्या सुरकुत्यांना अॅक्टिव्ह क्रिजे म्हणतात. त्या सुरकुत्या घालवल्या जात नाही. तर हावभावाशिवायही चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या टिकून राहतात त्यांना स्टॅटिक क्रिजेस म्हणतात. बोटॉक्सच्या माध्यमातून त्या क्रिजेस कमी केल्या जातात. 
  • या ट्रिटमेंटसाठी फारसा वेळ लागत नाही. एकदा डॉक्टरांना कन्स्ल्ट केल्यानंतर ट्रिटमेंटसाठी मुळात 10-15 मिनिटांचा कालावधी लागतो.
  • एकदा इंजेक्शन दिल्यानंतर चेहरा थोडा सुजल्यासारखा वाटतो. पण काही वेळानंतर ही सूज उतरते.  पण लगेचच तुमच्या चेहऱ्यात फरक पडत नाही. चेहऱ्यामध्ये बदल व्हायला साधारण आठवडाभर लागतो.
  • बोटॉक्सचे इंजेक्शन योग्य ठिकाणी लागणे फारच गरजेचे असते. जर तसे झाले नाही तर त्याचे दुष्परिणामही होऊ लागतात. त्यामुळे ही ट्रिटमेंट योग्य पद्धतीने करणे फार गरजेचे असते. 
  • एक बोटॉक्स इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा परिणाम 5 ते सहा महिने चांगला टिकून राहतो. त्यानंतर त्याचा परिणाम ओसरु लागतो. 

आता तुम्ही जर बोटॉक्स ट्रिटमेंट करण्याचा विचार करत असाल तर आधी या काही गोष्टींचा विचार नक्की करा. 

लिपस्टिकच्या मदतीने अशी मिळवा तुमच्यासाठी परफेक्ट शेड

 

ADVERTISEMENT

 

02 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT