सीक्वेन कॅरी करताना या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या

सीक्वेन कॅरी करताना या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या

ग्लॅमरस दिसण्यासाठी अथवा पार्टी लुकसाठी सीक्वेन कॅरी करण्याचा सध्या ट्रेंड आहे. सीक्वेनच्या साड्या, ड्रेस आणि अॅक्सेसरिज प्रत्येकीकडे असतातच. सीक्वेन कॅरी करताना काही गोष्टींबाबत सावध असणं गरजेचं आहे. कारण एक छोटीशी चुक तुमचा लुकच बिघडवू शकते. कारण सीक्वेनने जशा तुम्ही ग्लॅमरस दिसू शकता अगदी त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात सीक्वेन कॅरी केल्यामुळे तुमचा लुक बटबटीत वाटू शकतो. यासाठीच सीक्वेन घालताना काही नियम तुम्ही पाळायला हवेच.

इंडिअन विअर -

सीक्वेन मध्ये वर्कच्या साड्या आणि ड्रेस घातल्याने पार्टीत तुम्ही शोभून दिसू शकता. मात्र जर तु्म्ही हेव्ही सीक्वेन वर्क केलेल्या साडी अथवा ड्रेसवर भरपूर दागिने घातले तर ते मुळीच चांगलं दिसत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या इंडिअन वेअरवर ज्या रंगाच्या सीक्वेन आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या दागिन्यांची निवड करायला हवी. शिवाय ते अतिशय सौम्य आणि कमी चमचमणारे असावे. एखादी चैन अथवा हॅंगिग इअररिंग्ज यासोबत नक्कीच मॅच होतात. मात्र ते मुळीच हेव्ही नसतील याची काळजी घ्या. केसांमध्येही जास्त चमचमणाऱ्या हेअर अॅक्सेसरिज वापरू नका. 

वेस्टर्न विअर -

साडी प्रमाणेच वनपीस अथवा शॉर्ट ड्रेसमध्येही सीक्वेन वर्क शोभून दिसू शकतं. शॉर्ट ड्रेस अथवा पार्टीवेअर वनपीसमसोबत तुम्ही योग्य प्रकारचे फूटवेअर कॅरी करायला हवेत. मात्र लक्षात ठेवा ते मुळीच हेव्ही वर्क वाले नसावे. साध्या डिझाइनचे अथवा प्लेन फूटवेअर अशा कपड्यांवर जास्त चांगले दिसतात. जर तुम्हाला तुमचा लुक क्लासी हवा असेल तर हा नियम तुम्ही पाळायलाच हवा.

मेकअप कसा कराल -

जर तुम्ही सीक्वेन वर्कचे आऊटफिट परिधान करणार असाल तर तुम्हाला मेकअप अगदी साधा करण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचा लुक नॅचरल वाटेल. जर जास्त हायलायटरचा वापर तुम्ही केला तर तुमचा ड्रेस आणि चेहरा दोन्ही चमकणारे दिसेल. तुम्ही तुमचे चेहऱ्याचे अगदी काही पॉईंट जसे की चिक बोन्स आणि लिप्स नक्कीच कमी प्रमाणात हायलाईट करू शकता. मात्र ते तुमच्या आऊटफिटच्या रंगसंगतीला मिळते जुळते असावे. 

instagram

सीक्वेन फूटवेअर

सीक्वेन साडी अथवा ड्रेस प्रमाणे तुम्ही सीक्वेन वर्कचे फूटवेअरही कॅरी करू शकता. एखाद्या साध्या सिंपल ड्रेसला ग्लॅमरस करण्यासाठी त्यासोबत सीक्वेन फूटवेअर घालणं एक चांगला पर्याय ठरू शकेल. जर तुमच्या ड्रेसवर अगदी कमी प्रमाणात सीक्वेन वर्क असेल जसं की फक्त नेकवर्क अथवा हाताच्या जवळ असलेलं वर्क तर तुम्ही या ड्रेससोबत हेव्ही सीक्वेन वर्क असलेले फूटवेअर घालू शकता. मात्र तुमच्या ड्रेसच्या बॉटमला असं वर्क असता कामा नये नाहीतर त्यावर असे शूज चांगले दिसणार नाहीत. 

instagram

सीक्वेन क्लच

सीक्वेन क्लच पार्टी लुकसाठी अगदी परफेक्ट ठरू शकतं. आजकाल क्लचमध्ये अशा प्रकारचे  अनेक पर्याय मिळतात. सीक्वेन क्लच वापरताना फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्या ते तुमच्या आऊटफिटला मॅच असावेत. यात काळा, सोनेरी, चंदेरी आणि विविध रंग मिळतात. तुम्ही काळे आणि काळपट रंग दिवसा कार्यक्रमांसाठी वापरू शकता तर सफेद, सोनेरी, चंदेरी आणि उजळ रंग रात्रीच्या वेळीव वापरा. 

instagram

Beauty

Tinted Perfection Brightening Banana Primer

INR 1,095 AT MyGlamm