2 चमचे मीठाची कमाल, मिळेल चमकदार त्वचा

2 चमचे मीठाची कमाल, मिळेल चमकदार त्वचा

त्वचेसाठी सॉल्ट स्क्रब (Salt Scrub) उत्तम ठरतो हे आपण सर्वांनीच ऐकले आहे. पण त्यासाठी तुम्हाला बाहेर बाजारात जायची गरज नाही तर तुम्ही घरच्या घरीही सॉल्ट स्क्रब तयार करून वापरू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही बाजारातील एप्सम सॉल्ट स्क्रबचा वापर करा अथवा सी सॉल्टचाही वापर करू शकता. पण तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल तर तुम्ही सी सॉल्ट बॉडी स्क्रबचा उपयोग करून घ्या. घरात सॉल्ट बॉडी स्क्रब तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्ही केवळ 5-10 मिनिट्समध्ये हे तयार करू शकता. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही 2 चमचे मीठाची कमाल नक्कीच उपयोगात आणायला हवी. त्यासाठी काय काय साहित्य लागते आणि ते कसं तयार करायचं ते आपण पाहूया. 

सॉल्ट स्क्रब वापरताना काय घ्यावी काळजी

Freepik

Beauty

Manish Malhotra Methi Face Scrub Gel

INR 945 AT MyGlamm

घरी सॉल्ट स्क्रब बनवताना सर्वात पहिले तुम्ही आपल्या त्वचेची नक्की काय गरज आहे हे जाणून घ्यायला हवं. अर्थात डेड स्किन सेल्स हटविण्यासाठी अथवा तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी अथवा अतिरिक्त तेल त्वचेवरून काढण्यसाठी आणि सीबमची समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

सर्वात पहिले आपल्याला नियमित वापरता येईल असे सॉल्ट स्क्रब बनवता आले पाहिजे आणि नंतर कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी सॉल्ट स्क्रब कसे बनवायचे ते पाहूया. तुम्ही जर चेहऱ्याचे क्लिंनिंग करू इच्छित असाल तर 2 चमचे मीठ त्यासाठी खूप होते.

उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी वापरा हे उटणं

असे बनवा नियमित सॉल्ट स्क्रब

रेग्युलर सॉल्ट स्क्रब अर्थात असा स्क्रब जो तुमच्या त्वचेवरील मृत कोशिका हटवून त्वचेवरील चमक वाढविण्यास आणि मसल्स अधिक रिलॅक्स करण्यास अधिक मदत मिळते. त्यासाठी तुम्हाला या गोष्टीची गरज आहे. 

 • 4-5 चमचे सैंधव (काळे मीठ)
 • अर्धा चमचा हळद 
 • 1 चमचा 
 • ऑलिव्ह ऑईल 

हे सर्व मिक्स करून स्क्रब बनवा आणि कमीत कमी 20 मिनिट्ससाठी आपल्या संपूर्ण शरीरावर स्क्रबिंग करा. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. 

कोरडेपणा दूर करण्यासाठी सॉल्ट स्क्रब

freepik

तुमची त्वचा अधिक कोरडी असेल तर तुम्हाला असा स्क्रब हवा जो अगदी सहजपणाने तुमच्या त्वचेवर डेड स्किन काढून टाकण्यास मदत करेल. तसंच त्वचेला मुलायमपणा देईल. असा सॉल्ट स्क्रब बनविण्यासाठी खालील गोष्टींचा उपयोग करा. 

 • 4-5 चमचे सैंधव (काळे मीठ)
 • अर्धा चमचा हळद 
 • 1 चमचा बदाम तेल
 • 1 चमचा कोरफड जेल
 • नारळाचे तेल

या सर्व गोष्टी एकत्र करून स्क्रब बनवा आणि चेहरा, मान आणि संपूर्ण शरीरावर कमीत कमी 20  मिनिट्स स्क्रबिंग करा. यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करा. तुम्हाला अतिशय अप्रतिम तर वाटेलच त्याशिवाय त्वचाही मऊ आणि मुलायम होते. 

चमकदार त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी प्या ‘हे’ ज्युस

तेलकट त्वचेसाठी सॉल्ट स्क्रब

तेलकट त्वचेवर सीबम येण्यासह अतिरिक्त अॅक्ने आणि मुरूमंची समस्याही अत्यंत सामान्य असते. तुम्हाला असा स्क्रब हवा जो तुमच्या त्वचेवरील उत्पादन नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. यासाठी कशाचा वापर करायचा ते पाहूया. 

 • 4-5 चमचे सैंधव (काळे मीठ)
 • अर्धा चमचा हळद 
 • 1 चमचा कोरफड जेल

तिन्ही गोष्टी एकत्र करून स्क्रब तयार करा आणि पूर्ण शरीराला लाऊन साधारण 20 मिनिट्स मसाज करा. नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. तुम्हाला अतिशय ताजेतवाने वाटेल. तसंच त्वचा स्वच्छ होते आणि मुलायम होते. 

चंदनाच्या फेसपॅकने करा त्वचा अधिक चमकदार

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक