आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्यांचे अनुभव हे त्यांच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.आता या सेलिब्रिटी कोरोना डायरीजमध्ये आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली होती. अभिनेता अर्जुन रामपाल हा काहीच दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. त्यावेळी त्याने त्याची माहिती लगेचच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. पण या घटनेला 4 दिवस पूर्ण होत नाही तोच अर्जुन रामपाल ठणठणीत बरा झाल्याची माहिती समोर आली. त्याने इतक्या कमी दिवसात कोरोनावर कशी मात केली याची एक पोस्टही शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे कोरोनाबद्दलची तुमची भीतीही कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल.
या मालिकांचे थांबणार चित्रीकरण, प्रेक्षकांना बघावे लागणार जुने एपिसोड्स
काय म्हणाला अर्जुन
चार दिवसांपूर्वी अर्जुन रामपालने एक पोस्ट शेअर करत त्याला कोरोना झाल्याची बातमी दिली.टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याने स्वत:ला घरीच होम क्वारटांईन केले आहे असे देखील त्याने सांगितले. त्याला झालेला कोरोना हा असिंटेमाटिक कोरोना प्रकारातील होता. त्यामुळे त्याला त्याचा फारसा त्रास होत नव्हता. पण तरीही त्याने कोरोना नियंमाचे पालन कर 10 दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानिशी औषधोपचार सुरु असल्याचे देखील त्याने म्हटले. पण चार दिवस होत नाही तोच अर्जुनची एक नवी पोस्ट आली आणि त्यामध्ये तो कोरोनामुक्त झाल्याचे त्याने सांगितले. अनेकांना त्याची ही पोस्ट वाचून थोडासा धक्काच बसला. पण अर्जुनने त्यामागील कारणही सांगितले आहे. नुकतीच अर्जुनने कोव्हिडची लस घेतली होती. या लसीनंतर त्याला कोरोना झाला असला तरी देखील त्याची तीव्रता ही तितकी जाणवली नाही. त्याने घेतलेल्या लसीचा त्याला फायदा झाला असेच त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय सगळ्यांना लस घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. इतकेच नाही त्याने काटोकोरपणे नियम पाळल्याचा उल्लेख देखील यामध्ये केला आहे.
रूद्र दी ऐज ऑफ डार्कनेस’मधून अजय देवगन करणार डिजिटल डेब्यू
वॅक्सिनेशनवर दिला भर
अर्जुनच्या बरे होण्यावरही अनेकांना आक्षेप आहे. सर्वसामान्यांची कंबर या कोरोनाने मोडली असताना आता सेलिब्रिटी मात्र ठणठणीत आणि दिसत आहेत. अनेकांनी हे वॅक्सिनसाठी केलेले कॅम्पेन असा देखील उल्लेख केला आहे. अर्जुन चार दिवसात बरा होतो केवळ वॅक्सिन घेतल्यामुळे हे अनेकांना पटले नाही. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीकाही केली आहे. पण असे असले तरी त्याने वॅक्सिनसाठी जनजागृती करण्याचे काम केले याची स्तुती त्याचे चाहते करत आहेत. लोकांमध्ये वॅक्सिनसंदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत आणि त्यातच या अर्जुनने वॅक्सिन घ्या असा सल्ला दिल्यामुळे त्याच्यावर संशयाची सुई फिरत आहे.
कोरोनापेक्षाही देशाला लागलेली कीड म्हणजे राजकारण, अभिनेत्रीने व्यक्त केला राग
क्वारंटीन वेळ घालवला असा
अर्जुनने त्याला कोरोना झाल्यापासून वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याने त्याचे अनेक फोटो शेअर केले आहे. यामध्ये पुस्तक वाचनापासून ते पेटींग करेपर्यंत तो त्याचा छंद जोपासताना दिसत आहे. त्यामुळे त्याने त्याचा जो काही वेळ कोरोनासाठी घालवला तो फारच आनंददायी घालवला असेच दिसत आहे.