उन्हाळ्यात होणाऱ्या वातावरण बदलाचा परिणाम हा जसा शरीरावर होतो तसाच तो आपल्या लाईफस्टाईलवरही होतो. कपडे, आहार यामध्ये हे बदल अगदी पटकन जाणवायला लागतात. सुती कपडे, कॉटन कुडती अशा कपड्यांना प्राधान्य दिले जाते. तर आहारात ताक, दही, लस्सी, पन्ह, आंबा असे पदार्थ अगदी आवर्जून येतात. पण काही पदार्थ हे या दिवसात खाण्याची इच्छा होत नाही. आता नॉन व्हेज पदार्थच घ्या ना उन्हाळ्यात नॉनव्हेज पदार्थ हे कितीही खावेसे वाटले तरी देखील असे नॉन-व्हेज पदार्थ टाळणे हे नेहमीच चांगले. पण हे नॉन-व्हेज पदार्थ टाळले नाहीत तर त्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेऊया
मेंदी लावल्यावर केस होत असतील कोरडे, तर वापरा सोप्या टिप्स
वाढेल उष्णता
अंडी, चिकन, मटण, मासे या पदार्थांमधून शरीराला एनर्जी मिळते. शरीराला उर्जा देण्याचे काम हे पदार्थ करतात. पण उन्हाळ्यामध्ये आधीच आजुबाजूच्या वातावरणात उष्णता वाढलेली असते. अशावेळी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शरीर थंड करणारे पदार्थ खाणे फारच गरजेचे असते. नॉन-व्हेज पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता वाढून इतर त्रास होण्याची शक्यता अधिक बळावते. यामुळे जुलाब किंवा डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. ज्यामुळे सतत अस्वस्थ वाटत राहते.
पिंपल्स आले तरी चेहऱ्यावर टाळा स्टेरॉईड्स असलेल्या क्रिम्स
पुरळ आणि पुटकुळ्या
तुमच्या पोटाच्या आरोग्यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. काही जणांना नॉन-व्हेजचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता वाढून पुरळ आणि पिंपल्स येण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही उन्हाळ्यात अजिबात चिकन किंवा नॉन- व्हेज पदार्थ खाऊ नका. कारण या पदार्थांमुळे शरीरात निर्माण झालेली हिट शरीराबाहेर योग्य पद्धतीने पडली नाही की मग ती पिंपल्सच्या स्वरुपात चेहऱ्यावर दिसू लागते. जर तुम्ही सतत चिकन आणि इतर पदार्थ खात असाल तर तुम्ही ते टाळा.
मासिक पाळीवर परिणाम
उकाडा, उन्हाळा आणि नॉन-व्हेज पदार्थ असे एकत्रितपणे सुरु असेल तर त्याचा परिणाम मासिक पाळीवरही त्याचा परिणाम होतो. खूप वेळा हिट वाढल्यामुळे पिरेड्स लवकर येण्याची जास्त शक्यता असते. पिरेड्स सायकल बिघडली की त्याचा शरीरावर परिणाम होतो. मासिक पाळीसंदर्भात तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही या दिवसात नॉन-व्हेज खाल्ल्यामुळे त्रास होऊ शकतो. अति उष्णतेमुळे हा त्रास होऊ शकतो.
पचनशक्ती मंदावणे
नॉन-व्हेज पदार्थ हे असेही पचायला जड असतात. खूप जणांनीच पचनशक्ती ही फारच कमी असते. त्यांना व्हेज पदार्थ पचतानाही त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये शरीराच्या हालचाली मंदावलेल्या असतात. डोक्यावर पडणारे उन, वातावरणात असलेला आळशीपणा यामुळे या दिवसात चालायचीही इच्छा होत नाही. अशावेळी जर तुम्ही नॉन- व्हेज पदार्थ खाल्ले तर तुमची पचनशक्ती मंदावणे आलेच. त्यामुळे अपचन, पोटात दुखणे, डोकेदुखी असे काही त्रास तुम्हाला नक्कीच होऊ शकतात.
पोट बिघडणे
नॉन व्हेज पदार्थांमध्ये असलेल्या उष्णतेमुळे पोटाचा आणखी एक त्रास होऊ शकतो तो म्हणजे पोट बिघडण्याचा. पोटाला गरजेपेक्षा जास्त उष्णता मिळाल्यामुळे जुलाबाचा त्रासही होऊ शकतो. या शिवाय अशा खाण्यामुळे बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठतेच्या या त्रासामुळे गुदद्वारासंदर्भातील इतरही त्रास तुम्हाला होऊ शकतात
आता उन्हाळ्यात नेमकं कोणत्या कारणासाठी नॉन-व्हेज खाणे हे टाळायचे हे जाणून घेतल्यानंतर आहारात जास्तीत जास्त भाज्या आणि ज्युसचा समावेश करा.
डेंटल इम्प्लांटस केल्यानंतर टाळा हे पदार्थ, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला