पिंपल्स आले तरी चेहऱ्यावर टाळा स्टेरॉईड्स असलेल्या क्रिम्स

पिंपल्स आले तरी चेहऱ्यावर टाळा स्टेरॉईड्स असलेल्या क्रिम्स

चेहऱ्यावर पिंपल्स आले की, अगदी नकोसे होते. हे पिंपल्स जाण्यासाठी आपण इतकी खटपट सुरु करतो. मग चेहऱ्यावर वेगवेगळे उपाय करु लागतो. जो सल्ला देईल त्याचा सल्ला ऐकून आपण पिंपल्स जाण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करुन पाहू लागतो. काही उपाय हे अगदी पटकन चेहऱ्यावर काम करतात. तुमचा चेहरा पूर्ववत करण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? काही क्रिम्समध्ये स्टेरॉईडचे घटक असतात. जर एखादी क्रिम लावल्यानंतर जर तुम्हाला त्याचा पिंपल्सवर एका दिवसात किंवा एका रात्रीत परिणाम जाणवत असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. अशा स्टेरॉईड असलेल्या क्रिम चेहऱ्यासाठी फारच हानिकारक ठरु शकतात. ज्याचे विपरित परिणाम चेहऱ्यावर जाणवू शकतात.

चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्या कमी करण्यासाठी सोपे DIY

स्टेरॉईड्स म्हणजे काय? (What Is Steroids?)

आता सगळ्यात आधी जाणून घेऊया स्टेरॉईड्स म्हणजे नेमके काय? स्टेरॉईड्स हे  एक प्रकारचे केमिकल्स असून त्याला हार्मोन्स असे देखील म्हटले जाते. हे मानवी शरीरासाठी बनवलेले असे केमिकल आहे ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होऊन त्याच्या समस्या कमी होतात.  अनेक गोष्टींमध्ये स्टेरॉईड्स हे घातले जातात. पण याचा नेमका वापर होणे गरजेचे असते. जर जास्त स्टेरॉईड वापरले गेले तर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये स्टेरॉईड्स हानिकारक

  1. अनेक सौंदर्यप्रसाधानांमध्ये स्टेरॉईडचा वापर केला जातो. या क्रिम्स अगदी एकदा लावल्या तरी तुमची त्वचा ही खूप सुंदर आणि चांगली दिसू लागते. पण या क्रिम्स काही काळासाठी दिलासा देत असल्या तरी त्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. 
  2. स्टेरॉईड असलेल्या क्रिम्स अधिक प्रमाणात वापरल्या तर तुमचा चेहरा सुजू शकतो. काही जणांना स्टेरॉईडची एलर्जी असते. ज्याच्यामुळे त्वचा अशी दिसू लागते. 
  3. स्टेरॉईड असलेल्या क्रिम्समुळे तुमच्या त्वचेला अगदी पटकन चमक येते. चेहरा तुकतुकीत दिसू लागतो. पण जसजसा त्याचा परिणाम उतरतो. तसतशी त्वचा ही अधिक विचित्र दिसू लागते. म्हणजेच ज्या त्रासाने तुम्ही हैराण आहात तो त्रास तुम्हाला होऊ लागतो. 
  4. स्टेरॉईड्सच्या सतत वापरामुळे तुमच्या त्वचेला त्याची सवय होऊन जाते. ज्याचा परिणाम ती आपला प्रभाव दाखवणे सोडून देते.
  5.  स्टेरॉईडचा उपयोग अनेकदा पिंपल्स घालवण्यासाठी केला जातो. काही काळासाठी पिंपल्स हे नक्कीच त्यामुळे येणे बंद होतात.पण या क्रिम्सचा वापर बंद केल्यानंतर दुपट्टीने पिंपल्स येऊ लागतात.

सतत शिंका येत असतील तर करा सोपे घरगुती उपाय

थोडी वाट पाहा

 पिंपल्स घालवण्याचा उत्तम उपाय म्हणजे वाट पाहणे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पिंपल्सची वाढ आणि जाणे अवलंबून असते.  त्यामुळे असा त्रास सुरु झाल्यानंतर तुम्ही थोडा ब्रेक घ्या. काही काळासाठी मन शांत करा. पाणी भरपूर प्या. चांगला आहार घ्या आणि छान आनंदी राहा. म्हणजे पिंपल्स असूनही तुम्हाला आनंद मिळेल. 


स्टेरॉईड असलेल्या क्रिम्स जर तुम्हाला कोणी दिल्या असतील तर त्या अजिबात वापरु नका.

लैंगिक आजारांकडे करु नका दुर्लक्ष, होतील गंभीर त्रास