ADVERTISEMENT
home / पालकत्व
कसा असावा बाळाचा आहार, तज्ज्ञांचा सल्ला

कसा असावा बाळाचा आहार, तज्ज्ञांचा सल्ला

आपल्या बाळाला योग्य आणि पोषक आहार मिळावा याकरिता प्रत्येक पालक प्रयत्न करत असतात. बाळाचे योग्य पोषण, खाण्या-पिण्याची वेळ, बाळाचा आहार याबाबत पालकांना अनेक प्रश्न भेडसावू शकतात. बाळाची योग्य वाढ आणि विकासाकरिता त्याला पोषक आहार देणे अतिशय गरजेचे आहे. यासंदर्भात आम्ही डॉ. सुरेश बिराजदार, सल्लागार, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल,  खारघर यांच्याशी चर्चा केली. कारण काही नवमातांना याची कल्पना नसते आणि आणि त्यांना सांगायलाही कोणीही नसतं. त्यामुळे नक्की काय हवं आहे ते नवमाता जाणून घेऊ शकता. तुम्हालाही बाळासाठी योग्य आहार काय हवा ते जाणून घ्यायचा असेल तर हा लेख नक्की वाचा. 

दूध पिताना बाळ सतत उलटी करत असेल तर त्यामागे असू शकतं हे कारण

एक वर्षाच्या बाळाला कसा आहार कसा असावा?

एक वर्षाच्या बाळाला कसा आहार कसा असावा?

Freepik

ADVERTISEMENT

 

तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पहिल्या काही महिन्यांपर्यंत आपल्या बाळाला घन पदार्थ अर्थात घट्ट पदार्थ देणे टाळा. आपले बाळ घन पदार्थ खाण्यायोग्य होईपर्यंत त्याला केवळ आईचे दूध द्यावे. आईला दूध येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही गाईचे दूध अथवा पावडरचे दूध देऊ शकता. स्वतःच्या मर्जीने गाईचे दूध अथवा पावडरचे दूध पाजणे टाळा. 

पहिल्या दिवसापासूनच बाळाची घ्या अगदी सौम्यपणे काळजी, महत्त्वाच्या गोष्टी

  • सुरवातीचे 12 महिने आईने दर  2 तासांनी बाळाला स्तनपान दिले पाहिजे. आपल्या बाळाला भूक लागणे त्यासंबंधीच्या त्याच्या संकेतांना समजून त्यानुसार बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी आपल्या बाळाला आहार देताना आपल्याला काही शंका किंवा समस्या असल्यास डॉक्टरांशी बोला.
  • आईचे दूध बाळासाठी सर्वोत्त्तम ठरते. बाळाला आवश्यक ती सर्व पोषक तत्वे ही आईच्या दुधातून मिळतात. 
    आपल्या बाळाला पुरेसा आहार देताय का याची खात्री करा, बाळाला स्तनपान करणे आवश्यक असून त्याची टाळाटाळ करू नका. पोषण आहार घेण्याच्या सवयी या मुलाच्या गरजेनुसार बदलू शकतात त्याबाबत चिंता करू नये.
  • जर आई बाळाला स्तनपान देऊ शकत नसेत तर बाळाला दुधाचा योग्य पुरवठा करण्यासाठी ब्रेस्ट पंपचा वापर करावा. पंप केलेले आईचे दूध योग्य तापमानात योग्य प्रकारे साठवून बाटलीच्या सहाय्याने बाळांना दिले जाऊ शकते.
  • जेव्हा आईचे दुध पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसेल अशावेळी बाळाला फॉर्म्युला मिल्क देऊ शकता. हवाबंद डब्यातील फळांचा रस अथवा इतर पेय बाळाला किमान एक वर्ष तरी देऊ नका.
  • बाळाच्या वाढीनुसार तसेच त्यांच्या विकासानुसारच बाळाला सहा महिन्यांनंतर घन पदार्थांची ओळख करून दिली पाहिजे. बाळाला स्वत:हून बसू द्या, एखादा खाण्याचा पदार्थ दिसल्यास त्यांना तोंड उघडण्याचा प्रयत्न करू द्या. एखादा पदार्थ नको असल्यास ते स्वतः डोके फिरवून त्यास नकारार्थी प्रतिसाद देतात. घन पदार्थांची ओळख करून देताना सुरुवातीला थोडया थोड्या प्रमाणापासून प्रारंभ करा. शेंगदाणे, पॉपकॉर्न, द्राक्षे किंवा तोंडात अडकणार्‍या मोठ्या खाद्यपदार्थाचे तुकडे देऊ नका. मऊ शिजवलेले किंवा मॅश केलेले बटाटे, व्हेज, चीज, केळी आणि मटार द्या.
  • आपल्या बाळाला मध देऊ नका कारण यामुळे बाळाला विषबाधा होण्याची शक्यता असते. जेव्हा आपल्या मुलाला भूक नसलेली असेल तेव्हा आग्रहान एखादी वस्तू खाऊ घालू नका. या निरोगी खाण्याच्या सवयींमुळे आपले बाळ नक्कीच सुदढ राहू शकते. बाळाची प्रतिकारशक्तीही यामुळे अत्यंत चांगली राहते. तसंच वाचा 2 वर्षाच्या बाळाचा आहार (2 varshachya balacha aahar).

लहान बाळाला कधीच भरवू नका हे खाद्यपदार्थ

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT

 

23 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT