या कारणासाठी धारण करावा पाचू, होईल फायदाच फायदा

या कारणासाठी धारण करावा पाचू, होईल फायदाच फायदा

हिरवा रंगाचे रत्न म्हणजे पाचू. हिरवाकंच असा पाचू हा बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. पाचूमध्ये हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड मिळतात म्हणजे थोडा गडद आणि फिकट रंगाचा असतो. हे रत्न खाणीतून काढले जाते. मुलत: हिरव्या रंगामध्ये मिळणाऱ्या या रत्नावरही प्रक्रिया केली जाते मगच तो धारण करण्यास दिला जातो. ज्यांच्या पत्रिकेत बुध हा कमजोर असतो त्यांना पाचू ग्रह धारण करण्यासाठी दिला जातो. पाचू हा ग्रह धारण केल्यामुळे बौद्धिक आणि मानसिक विकास होण्यास मदत मिळते. ज्यांना बोलण्यासंदर्भातील काही त्रास असेल तर अशावेळीही पाचू धारण करण्यास सांगितला जातो. जर तुम्ही पाचू धारण करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पाचूचे फायदे आणि पाचू ओळखण्याची विशिष्ट पद्धत ही माहीत असायला हवी. जाणून घेऊया पाचू संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती

‘हिरा है सदा के लिए’ पण तो कोणी घालावा,जाणून घ्या

खरा पाचू कसा ओळखावा? (How To Know Real Emerald)

Instagram

असे म्हणतात की खरा पाचू हा कोलंबियामध्ये मिळतो. त्या ठिकाणी हे अत्यंत महागडे असे रत्न आहे. पाचूचा विशिष्ट असा आकार सांगता येत नाही. पण पाचू अगदी लहान अंगठीच्या खड्यापासून ते मोठ्या खड्यांपर्यंत मिळतात. हल्ली खरा पाचू ओळखणे फारच गरजेचे झाले आहे. कारण बारीक बारीक काचांना हिरवा रंग देऊन  काही जण पाचू विकतात. पाचू पाण्या टाकल्यानंतर त्याच्या हिरव्या रंगाची आभा उठते. पाण्यात टाकल्यानंतर तो त्याच्या वजनापेक्षा हलका होतो. पाचू तुटलेला किंवा दुभंगलेला असेल तर तो अजिबात वापरु नये. त्यामुळे नकारात्मक उर्जा अधिक  निर्माण होते.

कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या (Know Which Zodiac Is Best For People To Wear In Marathi)

पाचूचे फायदे

पाचूचे अनेक फायदे आहेत. पण त्यापैकी काही फायदे हे नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील. 

  • चांगले आरोग्य आणि  धनसंबंधी प्रगतीसाठी पाचू हा धारण करण्याचा सल्ला दिला जातो. 
  • विषारी घटकांशी लढण्याची ताकद ही पाचूमध्ये असते. पाचू धारण केल्यामुळे सर्पदशांची शक्यता ही कमी  होते.
  •  गर्भवती महिलांनी डिलीव्हरीच्या वेळी पाचू धारण केला तर त्यांना प्रसुतीच्या वेदना कमी होतात. 
  • ज्यांना बोलण्यास अडथळा असतो त्यांनी पाचू धारण केल्यास वाचा सुधारते असे म्हणतात. 
  • ज्यांच्या पत्रिकेत बुध कमजोर आहे त्यांनी योग्य सल्ल्यानिशी पाचू धारण करावा. 
  • पाचू काही काळ पाण्यात ठेवून अशा पाण्याने डोळे धुवावे त्यामुळे नेत्ररोग होत नाहीत.
  • पाचू हे रत्न शीतलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे रत्न धारण केल्यामुळे पिक्त आणि पचनासंबधी असणारे त्रास कमी होण्यास मदत मिळते. 
  • स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पाचू मदत करते. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला पाचू घालण्यास सांगितले जाते. 
  • वीर्यशक्तीचा अभाव असल्यासही पाचू हा फारच फायदेशीर ठरतो. 
  • करणी किंवा कोणत्याही नकारात्मक उर्जेचा परिणाम हा पाचू धारण केलेल्या व्यक्तींवर होत नाही.

 

आता जर तुम्हाला हे फायदे हवे असतील तर तुम्हीही योग्य सल्ल्यानंतर पाचू धारण करावा.

धनप्राप्ती, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते का ‘हिलिंग’ स्टोन