कोरोनामुळे (Corona) सामान्य माणूसच हवालदिल झाला नाहीये तर याचा फटका सगळ्याच उद्योगक्षेत्रावर, चित्रपटसृष्टीवरही झालेला आहे. गेल्यावर्षीपासून काही बिग बजेट चित्रपटांना यामुळे नुकसान सहन करावे लागत असून या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक निर्मात्यांनाच नाही तर अगदी कलकारांनाही याचा फटका पडला आहेत. काही कलाकारांचे या दोन वर्षात त्यामुळे चित्रपट प्रदर्शितच होऊ शकलेले नाहीत. असे नक्की कोणते चित्रपट आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. ज्यांना सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे.
स्नेहलता वसईकरला येतेय शाळेची आठवण, झाली भावनिक
सूर्यवंशी
मागच्या वर्षी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख मार्चमध्ये ठरली होती. मात्र कोरोनामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली. पुन्हा मार्चमध्ये यावर्षी चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरूवात झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका निर्माते आणि कलाकारांना बसला आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट सलग दुसऱ्या वर्षीही प्रदर्शित होऊ शकलेला नाही. आता याची तारखी पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून नक्की हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची माहिती नाही.
जॅकलिनने शेअर केली प्रेमाची निशाणी, चाहत्यांनी दिली ही खास प्रतिक्रिया
राधे – द मोस्ट वाँटेड भाई
सलमान खानचा चित्रपट राधे – द मोस्ट वाँटेड भाई हा मागच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे यावर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे सलमानने जाहीर केले होते. पण यावर्षी देखील ईद मे च्या शेवटच्या आठवड्यात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळेही यावर्षी चित्रपट प्रदर्शित न करता आल्यास, पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र अजूनही कोणालाही काहीही अंदाज लावता येत नाही.
83
2020 एप्रिलमध्ये प्रदर्शित होणारा 83 हा रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणारा चित्रपटही कोरोनाच्या लाटेमुळे अडकून पडला आहे. वर्ल्ड कपवर आधारित कबीर खानने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट चर्चेचा विषय होता. मात्र आता हा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती नाही. हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र पुन्हा आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने निर्मात्यांना नक्कीच याचा फटका बसला आहे.
अपघातातून बचावली गौतमी देशपांडे, चाहत्यांना दिली माहिती
भुज – द प्राईड ऑफ इंडिया
भुज – द प्राईड ऑफ इंडिया या चित्रपटात अजय देवगणची मुख्य भूमिका आहे. पण कोरोनाच्या वाढत्या लाटेमुळे या चित्रपटाला फटका बसला आहे. आता हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. याचा जबरदस्त फटका निर्मात्यांना बसणार आहे. पण आता परिस्थिती कधी सुधारणार याची कोणालाही कल्पना नसल्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
थलायवी
कंगना राणावतचा ‘थलायवी’ या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपटही कोरोनामुळे पुढे प्रदर्शित करण्याचे ठरविण्यात आले आहे. पण यामुळे नक्कीच निर्मात्यांना घाटा सहन करावा लागत आहे. 23 एप्रिल रोजी हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण आता मात्र याची तारीख पुढे नक्की कोणती आहे त्याबद्दल सांगण्यात आलेले नाही. पण पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही कोरोनामुळे त्रास सहन करावा लागणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक