‘हिरा है सदा के लिए’ पण तो कोणी घालावा,जाणून घ्या

‘हिरा है सदा के लिए’ पण तो कोणी घालावा,जाणून घ्या

प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की, तिच्याकडे एक तरी हिऱ्याचा सेट असावा. सेट शक्य नसल्यास अंगठी तरी हिऱ्याची असावी. सगळ्या दागिन्यांमधील शान असा हा स्टोन सगळ्यांना हवाहवासा वाटतो. ‘हिरा है सदा के लिए’ असं या चमकणाऱ्या स्टोनबद्दल उगाच म्हटले जात नाही. पण हिरा हा तुमच्यासाठी आहे का नाही? हे तुम्ही कधी जाणून घेतले आहे का? हिरा हा असा खडा आहे जो लाभला तरच तुमची भरभराट करतो असे म्हटले जाते. काही जणांना हिरा हा लाभतही नाही. त्यामुळे सरसकट सगळ्यांनी आवड म्हणून हिरा करताना काही गोष्टींची काळजी घेणे हे फारच गरजेचे असते. हिरा घेण्यापूर्वी आणि तो धारण करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे फारच गरजेचे असते.

...म्हणून दाराबाहेर काढली जाते रांगोळी

हिऱ्याबद्दल महत्वाच्या गोष्टी:

हिरा हा खडा शुक्राच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे ज्यांचा शुक्र बळकट असतो. त्यांना हिरा परीधान करण्यास सांगितले जाते. या शिवाय ज्यांच्या राशीसाठी हा लाभदायक आहे त्यांनीच हिरा परिधान करावा असे सांगितले जाते. जर तुमच्या पत्रिकेत तुम्हाला हिरा परिधान करण्यास सांगितले असेल तरच तुम्ही हिरा परिधान करणे नेहमीच चांगले असते. हिरा हा सगळ्यांनाच लाभतो असे नाही. हिऱ्याच्या जशा सकारात्मक बाजू आहेत. तशाच हिऱ्याच्या नकारात्मक बाजू देखील आहे. त्यामुळे हिरा सगळ्यांनाच लाभ, भरभराट आणि यश देतोच असे काही नाही. त्यामुळे हिऱ्याची अंगठी लगेचच करु नका. तो हिरा तुमच्या जवळ ठेवा. जर तो तुम्हाला लाभला असेल तरच तुम्ही तो घडवा. त्या आधी तो घेण्याची घाई मुळीच करु नका. 

हिऱ्याचे फायदे

Instagram

वर सांगितल्याप्रमाणे हिरा हा शुक्राच्या अधिपत्याखाली येतो. शुक्र ह प्रेम, सौंदर्य आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक मानला जातो. याच्या वापरामुळे तो आनंद आपल्या आयुष्यात येतो. असे म्हणतात, ज्या महिला आभूषण, फॅशन डिझायनिंग अशा क्षेत्राती महिलांना हिरा लाभतो. त्यांच्या क्षेत्रात त्यांना यश देतो. या सोबत कला क्षेत्राशी निगडीत लोकांसाठीही हिरा फारच लाभदायी असतो.  ज्यांच्या पत्रिकेत शुक्र ग्रहाचा शुभ प्रभवा आहे अशांना हिरा घालण्यास काहीच हरकत नाही. पण तुम्ही ज्योतिषाचा योग्य सल्ला घेऊनच हिरा वापरणे योग्य ठरते.

शिवाला प्रिय अशा ‘रुद्राक्ष’ घालण्याचे फायदे

हिरा खरेदी करताना

Instagram

 हिरा हा असा खडा आहे जो इतका अणुकुचीदार असतो की, तो सोन्यालाही छेदून जाऊ शकतो. त्यामुळे त्याला घडवताना तो योग्य पद्धतीने घडवावा लागतो. हिरा हा वेगवेगळ्या सेंटमध्ये मिळतो. म्हणजेच त्याचे वेगवेगळे आकार मिळतात. हिऱ्याचा आकार जितका वाढतो तितकी त्याची किंमत वाढत जाते. त्यामुळे बजेट हा विषयही हिरा निवडताना फार महत्वाचा असतो. 

टाळा या चुका

Instagram

हिरा कधीही सेकंड हँड घेऊ नये. कारण असा हिरा तुम्हाला लाभेलच असे नाही. हिरा कधीही तुटलेला असू नये.  हिरा हा स्वच्छ असावा त्यावर जर डाग असेल तर असा हिरा टाळणे नेहमीच उत्तम कारण असा हिरा नाहक नकारात्मक उर्जा उत्पन्न करतो. त्यामुळे या चुका टाळाव्यात. 


आता हिरा खरेदी करताना काही गोष्टींची काळजी नक्की घ्यावी म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा मिळेल.

धनप्राप्ती, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते का ‘हिलिंग’ स्टोन