मटकीपासून बनवा चटकदार रेसिपी आणि वजन करा कमी

मटकीपासून बनवा चटकदार रेसिपी आणि वजन करा कमी

कडधान्य ही शरीरासाठी फारच पौष्टिक असा खुराक आहे. जर आहारात हिरव्या पालेभाज्या नसतील तर अशावेळी आहारात अगदी हमखास कडधान्य असायला हवीत. कोणं म्हणतं की, कडधान्य फक्त उसळी स्वरुपातच खाता येतात. असे मुळीच नाही. कारण आता वेगवेगळ्या पद्धतीने कडधान्य खाल्ली जातात. जे लोक डाएट करतात अशांना तर आहारात कडधान्य खाण्याची सवय असतेच. मूग,मटकी, चणा, वाटाणा, चवळी असे वेगवेगळे प्रकार अगदी तुम्हीही नित्यनेमाने खात असाल. पण कधी मटकीपासून उसळीव्यतिरिक्त काही बनवले आहे का? आज आपण मटकीपासून काही चटकदार रेसिपी बनवूया ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील आणि सध्याचा घरी बसून असलेल्या काळात तुमचे पोट भरण्यास मदत करेल.

थंडगार सोलकढी बनवा घरीच, जाणून घ्या रेसिपी (Solkadhi Recipe In Marathi)

मटकी चाट

Instagram

जर तुम्हाला चाट खाण्याची खूप इच्छा झाली असेल तर मटकीपासून तुम्ही मस्त चटपटीत चाट रेसिपी बनवू शकता. हे करणे फारच सोपे आहे 

साहित्य: मोड आलेली आणि उकडलेली मटकी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट आणि गोड चटणी, बारीक शेव

कृती:  अगदी इतर कोणत्याही चाट प्रमाणे तुम्हाला सगळे साहित्य एकत्र करायचे आहे. मटकी ही सगळ्यात शेवटी घालून एकजीव करुन घ्या. त्यानंतर वरुन शेव भुरभुरा. मस्त मटकी चाट सर्व्ह करा. 

संध्याकाळच्या वेळी लागणारी ही भूक शमवण्यासाठी तुम्हाला हा चाट एक चांगला पर्याय आहे.

घरच्या घरी बनवा मऊ लुसलुशीत इडलीचे वेगवेगळे प्रकार (Idli Recipe In Marathi)

मटकीची तर्री

Instagram

आता तर्री म्हटल्यावर तुम्हाला काहीतरी तेलकट पदार्थ खाल्ल्यासारखे वाटत असेल तर असे अजिबात नाही. कधीतरी काहीही खाण्याची इच्छा नसेल आणि थोडीशी मिसळ खायची इच्छा होत असे तर अशावेळी अशी तर्री कामी येते. 

साहित्य :  मोड आलेली मटकी, एक कांदा, 1 ‘टोमॅटो,आलं-लसूण पेस्ट, लाईट पोह्याचा चिवडा किंवा डाएट चिवडा, कोथिंबीर, कडिपत्ता, मोहरी

कृती: एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट चांगले भाजून घ्या.
दुसरीकडे कुकरमध्ये मोड आलेली मटकी उकडून घ्या. त्यामध्ये हळद आणि मीठ घालून ते छान शिजवून घ्या.
कांदा-टोमॅटोची पेस्ट करुन घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करुन मोहरी आणि कडिपत्त्याची फोडणी द्या. त्यामध्ये तयार पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्या
त्यामध्ये उकडलेली मटकी घालून परता. आवश्यकतेनुसार पाणी घाला.उकळून झाल्यानंतर सर्व्ह करताना त्यामध्ये डाएट चिवडा घाला आणि मस्त रेसिपी एन्जॉय करा.

तुम्हालाही आवडतात आप्पे तर बनवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने (Appe Recipes In Marathi)

मटकी रोल

ज्याप्रमाणे फ्रॅकी केली जाते अगदी तसंच करायचं आहे. मटकीची उसळ जर उरली असेल तर ती कोरडी करुन घ्या.  आता एक चपाती घेऊन त्याच्या बेसला तुमच्या आवडीचा सॉस लावा. चिंच-खजूराची चटणीही चांगली लागते. त्यावर कोरडी केलेली  मटकीची भाजी पसरा. त्यावर चाट मसाला, भरपूर कांदा, कोथिंबीर घालून चपाती रोल करुन घ्या. हा रोल भाजी-चपाती म्हणून खाला दिला असता तर खाल्ला जात नाही. पण जरा चटपटीत केला तर तो मटामट खाल्ला जातो. 


आता मुलांना किंवा तुम्हालाही चटपटीत पण चांगले काही खायचे असेल तर या काही रेसिपी नक्की ट्राय करा.