घरातच बनवा बाजाराप्रमाणे चविष्ट सफरचंदाचे जाम (Apple Jam)

घरातच बनवा बाजाराप्रमाणे चविष्ट सफरचंदाचे जाम (Apple Jam)

सकाळचा नाश्ता म्हटलं की घाईघाईमध्ये ब्रेड, बटर आणि जाम हा तर अगदी घराघरात ठरलेला असतो. ऑफिसला जाताना अथवा सकाळीच अगदी लवकर जायचं असेल तर तेव्हा बनवायला वेळ नसतो. मग अशावेळी सर्वात पहिले लक्ष जातं ते म्हणजे फ्रिजमध्ये असणाऱ्या ब्रेडकडे. लहान मुलांचा तर अगदी आवडता नाश्ता म्हणजे ब्रेड, बटर आणि जाम. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही हे जाम घरीदेखील तयार करू शकता. बाहेर एक बाटली विकत घ्यायची म्हटलं की 100 रूपयांची नोट लगेच मोडली जातेच. पण तुम्ही स्वादिष्ट, चविष्ट आणि त्याचबरोबर हेल्दी असे सफरचंदाचे जाम घरच्या घरी करू शकता आणि तेदेखील बाजारापेक्षा अधिक चांगले. याची सोपी आणि मस्त रेसिपी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही ही रेसिपी वापरून नक्की सफरचंदाचे जाम घरी तयार करा आणि याचा आस्वाद घ्या. हे बनवणे अगदी सोपे आहे. तसंच तुम्हाला जास्त खर्चही येत नाही आणि यामध्ये घरी बनविल्यामुळे कोणतेही केमिकलही मिक्स नाही. मुलांच्या तब्बेतीसाठीही हे अत्यंत चांगले ठरते. चला तर मग जाणून घेऊ कसे बनवायचे सफरचंदाचे जाम. 

ब्रेड सुकला असेल देऊ नका फेकून, असा करा वापर

साहित्य

 • 1 किलो सफरचंद 
 • अर्धा किलो साखर 
 • लिंबाचा रस 
 • 1 चमचा वेलची पावडर 
 • अर्धा चमचा दालचिनी पावडर (तुम्हाला आवडत असल्यास)

घरच्या घरी बनवा व्हॅनिला केक आणि द्या सरप्राईज

बनविण्याची पद्धत

 • सफरचंदाचे जाम बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही सफरचंद कापा आणि त्यातील बी वेगळे करा. बी सहित जाम चवीला चांगले लागत नाही. त्यामुळे तुम्ही बी काढून टाका
 • बी काढल्यानंतर एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्या आणि त्यात सालासकट सफरचंद किसून घ्या. हे किसलेले सफरचंद पाण्यात ठेवल्याने काळे पडणार नाही
 • गॅसवर तुम्ही दुसऱ्या पातेल्यात पाणी काढून किसलेले सफरचंद उकळायला ठेवा आणि त्यात साखर घाला. साखरेचे पाणी सुटू लागेल तसं ते ढवळा आणि त्यात वेलची पावडर आणि दालचिनी पावडर घालून मिक्स करा. 
 • हे पूर्ण शिजल्यावर गॅसवरून खाली काढा. साखरेमुळे याला मस्त पाक सुटेल आणि सफरचंद आणि साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचा सुंदर वासही येईल
 • खाली काढल्यावर त्यात लिंबाचा रस पिळून व्यवस्थित मिक्स करा. तुमचे सफरचंदाचे जाम तयार आहे. 
  थंड झाल्यावर बाटलीत भरा आणि फ्रिजमध्ये ठेवा. तुम्हाला हवं तेव्हा ब्रेड गरम करून अथवा नुसत्या ब्रेडला लावून खा. 
 • तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीचा वापरही करू शकता. तुम्ही आदल्या दिवशी सफरचंद पाण्यात ठेवा आणि ती दुसऱ्या दिवशी उकडवून घ्या. उकडवल्यावर नंतर ते मिक्सरमधून काढा.
 • दुसऱ्या पॅनमध्ये साखर, पाणी मिक्स करून त्यात वेलची पावडर, दालचिनी पावडर मिक्स करून घ्या. साखरेचा पाक तयार झाला की, त्यात वरील मिश्रण एकत्र करा. वरून लिंबू रस पिळा. तुमचा जाम तयार आहे
 • तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने हा सफरचंदाचा जाम तयार करू शकता. लहान मुलांनाच नाही तर अगदी मोठ्यांनाही हा जाम खूपच चविष्ट असल्याने आवडतो आणि हा जाम करायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जाम तयार करता येते. तसेच हे जाम फ्रिजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. 

उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला 'हायड्रेट'

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक