भारतातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरे (Famous Ram Mandir In India In Marathi)

भारतातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरे (Famous Ram Mandir In India In Marathi)

भारतात भगवान श्रीरामास विष्णूचा सातवा अवतार मानलं जातं. श्री विष्णूने असूरांचा वध करण्यासाठी राम अवतारात पृथ्वीवर जन्म घेतला होता. एवढंच नाही तर श्रीराम हे एक आदर्श पुरूषदेखील मानले जातात. शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक रूपातील एक महान मानव म्हणून त्यांची आजही ख्याती आहे. ज्यामुळे भारतात श्री रामाची प्रमुख देवतांच्या रूपात पूजा केली जाते. रामनवमी, दसरा आणि दिवाळी सारख्या मोठ्या सण भारतात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. भगवान श्रीरामाचा जन्म रामनवमीला झाला त्यामुळे या दिवशी रामजन्माचा आनंद साजरा केला जातो. या खास दिवसानिमित्त जाणून घ्या भारतातील श्रीरामाची प्रसिद्ध मंदिरे आणि द्या सर्व भक्तगणांना द्या रामनवमीच्या शुभेच्छा आणि श्रीरामाचा परमभक्त हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

अयोध्या राम मंदिर (Ayodhya Ram Mandir, Uttar Pradesh)

भारतातील अयोध्या मंदिर भारतातील एक प्राचीन राम मंदिर आहे. असं म्हणतात की, अयोध्या ही श्रीरामाची जन्मभूमी आहे. ज्यामुळे अयोध्यामधील राम मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या या प्राचीन शहरातील सरयू नदीच्या काठी हे राममंदीर वसलेले आहे. भारतीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तीर्थक्षेत्रापैकी एक हे मंदिर आहे. ज्यामुळे आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रामभक्तांची गर्दी असते. आता या मंदिराच्या पुर्ननिर्मितीचं काम सुरू असून लवकरच भव्य दिव्य श्रीराम मंदिराची निर्मिती केली जाणार आहे.

instagram

राम राजा मंदिर (Ram Raja Mandir, Madhya Pradesh)

भारतातील आणखी एक प्रसिद्ध राम मंदिर मध्य प्रदेशच्या ओरछा या शहरात आहे. हे मंदिर झाशी रेल्वेस्टेशनपासून फक्त तेरा किलोमीटरवर आहे. बेतवा नदीच्या काठी ते वसलेलं आहे. राजा राम मंदिर भारतातील एकमेव असं एक मंदिर आहे जिथे श्रीरामाची एक राजाच्या रूपात पूजा केली जाते. रामनवमी हा या शहरातील एक प्रमुख सण आहे. त्यामुळे रामनवमीला या शहराचं रूप पाहण्यासारखं असतं. या मंदिरा श्रीरामाप्रमाणेच सीतामाता, लक्ष्मण आणि महाराज सुग्रीव आणि भगवान नरसिंह, भगवान हनुमान आणि जामवंताच्या मुर्तीचीही मनोभावे पूजा केली जाते.

instagram

काळाराम मंदिर (Kalaram Mandir, Nashik, Maharashtra)

भारतातील एक प्रसिद्ध राममंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्यात आहे. काळाराम मंदिर नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात श्रीरामाची वर्षानूवर्षे मनोभावे  पूजा केली जाते. नाशिकमधील पंचवटीमध्ये आजही भगवान श्रीरामाच्या असित्वाच्या खुणा सापडतात. काळाराम मंदिराची निर्मिती 1782 साली सरदार रंगराव ओढेकर यांनी केली. पूर्वी या मंदिराची बांधणी लाकडीची होती. मात्र काळ्या दगडात हे मंदिर बांधण्यात आले. मंदिरातील श्रीरामाची मुर्तीदेखील काळ्या दगडाची असल्याने या मंदिराला काळाराम मंदिर अशी ओळख मिळाली. असं म्हणतात की ही श्रीरामाची मुर्ती गोदावरीत सापडली आहे. रामनवमीला हजारो भक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये दाखल होतात. यासोबतच जाणून घ्या महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे- Maharashtra Famous Mandir In Marathi

instagram

रामटेक मंदिर (Ramtek Mandir, Nagpur, Maharashra)

रामटेक हे भारतातील आणखी एक असे राममंदिर आहे जे महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. नागपूर रेल्वेस्टेशनपासून जवळजवळ ५७ किलोमीटरवर हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराची ख्याती आहे. असं म्हणतात की, पावसाळ्यामध्ये जवळजवळ चार महिने श्रीराम  या ठिकाणी वास्तव्यास होते. अशीही आख्यायिका आहे की या ठिकाणी साधना केल्यामुळे श्रीरामाला अध्यात्मिक ज्ञान आणि ब्रम्हास्त्राचे ज्ञान अवगत झाले होते. त्यामुळे या स्थळाला एक दैवी महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजही रामनवमीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर भक्त श्रीरामाच्या दर्शनाच्या दर्शनासाठी येतात. 

instagram

रघुनाथ मंदिर (Raghunath Mandir, Jammu)

रघुनाथ मंदिर हे जम्मू काश्मिरमध्ये असून भारतातील ते एक प्रसिद्ध राममंदिर आहे. रघुनाथ मंदिर ही संपूर्ण जम्मू काश्मिरची एक ओळख मानली जाते. या राममंदिराची निर्मिती १८३५ साली महाराजा गुलाब सिंह यांनी सुरू केली पुढे महाराजा रणजीत सिंह यांच्या काळात हे मंदिर बांधून पूर्ण झाले. रघुनाथ मंदिराची खासियत इथली वास्तुकला आहे. शिवाय या मंदिरातील आतील भिंतींना सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. या मंदिरातील सात ऐतिहासिक धार्मिक स्थळे असल्यामुळे ती पाहण्यासाठी लाखों पर्यंटकांची गर्दी मंदिरात होत असते. या मंदिरातील रामनवमीचा उत्सव पाहण्यासारखा असतो. 

instagram

रामास्वामी मंदिर (Ramaswamy Mandir, Tamil Nadu)

रामास्वामी मंदिर हे भारतातील प्रमुख राममंदिरांपैकी असून ते १६ व्या शतकातील आहे. या मंदिराचे बांधकाम सुबक आणि लक्षणीय आहे. तामिळनाडूमधील कुंभकोणममध्ये श्रीरामाचे हे मंदिर आहे.  शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं हे मंदिर आजही सुस्थित असून या मंदिराची रचना आजही अनेक पर्यटकांना अंचबित करते. या मंदिरातही रामनवमीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात केला जातो. 

instagram

भुवनेश्वर राममंदिर (Ram Mandir, Bhubaneswar, Odisha)

ओडीसामधील भुवनेशवरच्या खारावेलमध्ये हे राममंदिर आहे. शहराच्या अदगी मध्यभागी वसलेलं हे राममंदीर भारतातील प्रसिद्ध राम मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामातेच्या सुंदर मुर्ती आहेत. हे मंदिर एका खाजगी ट्रस्टद्वारे बांधण्यात आलेलं असून त्याची देखभालही याच ट्र्स्टद्वारे घेण्यात येते. मात्र दरवर्षी रामनवमीला भक्तांचा प्रंचड ओघ इथे सुरू असतो. 

instagram

सीता रामचंद्रस्वामी मंदिर (Sita Ramachandraswamy Mandir, Telangana)

सीता रामचंद्र मंदिर भारताच्या  तेलंगणा राज्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भारतातील प्रसिद्ध श्रीरामाच्या मंदिरांपैकी एक असून ते गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे. सीता रामचंद्रस्वामी मंदिर हैदराबादपासून तीनशे किलोमीटरवर आहे. सीतारामस्वामी मंदिर एक प्राचीन मंदिर असून त्यामध्ये चारशे वर्षांचा इतिहास दडलेला आहे. या मंदिरात रामनवमी आणि व्यंकटा एकादशी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. 

instagram

त्रिपायर श्रीराममंदिर (Triprayar Sri Ram Mandir, Kerala)

भारतातील आणखी एक प्रसिद्ध राममंदिर केरळमधील त्रिशूरमध्ये आहे. त्रिपायर नदीच्या काठी त्रिपायरमध्ये श्रीराम मंदिर कोडुन्गल्लुर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. केरळला देवभूमी समजले जाते. त्यामुळे हे स्त्रोतत्रिपायर श्रीराममंदिर भारतातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा त्रिप्रयारप्पन म्हणजेच त्रिपायर थेवरच्या रूपात केली जाते. केरळमधील अनेक सुंदर मंदिरांच्या यादीत या मंदिराचा समावेश होतो. या मंदिरातील अरट्टूपुझा पूरम उत्सव प्रसिद्ध आहे. 

instagram

कोदंडारामस्वामी मंदिर (Kodandarama Mandir, Karnataka)

कोदंडारामस्वामी मंदिर हे भारतात कर्नाटकमधील चिक्कमगलुरू या हिलस्टेशनवर वसलेलं आहे. बॅंगलोरपासून ते जवळजवळ २५० किलोमीटरवर आहे. या मंदिरामध्ये धर्नुधारी श्रीराम आणि लक्ष्मणाची मुर्ती आहे. श्रीरामाच्या धनुष्याला कोदंडा असं म्हणतात म्हणून या मंदिराचे नाव कोदंडारामस्वामी असं असावं. या मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात चोल राजांनी केली. असं म्हणतात लंकेवरून परतल्यावर श्रीरामस लक्ष्मण आणि सीतामाता या ठिकाणी थांबले होते.  

 

instagram

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम