ही दोस्ती तुटायची नाय...मैत्रीसाठी ठेवा खास स्टेटस (Friendship Status In Marathi)

Dosti Status In Marathi

मैत्रीवर अनेक गाणी आहेत. मैत्री ही अशी गोष्ट आहे जी आपण स्वतः निवडतो आणि जपतो. नातेवाईकांशीपेक्षाही जीवाला जीव लावणारे मित्रमैत्रिणी आपल्याला अधिक जवळचे असतात. ही दोस्ती तुटायची नाय...अशी वचनं देत आपण ती नेहमी निभावतो. पण कधी कधी आपण खूपच गृहीत धरतो मित्रमैत्रिणींना. तर कधी कधी त्यांच्यासाठी असणाऱ्या मनातल्या भावना शब्दात उतरवणंही गरजेचं असतं. प्रत्येकवेळी त्यांच्यासाठी Friendship Day ची वाट पाहायची गरज नसते. तर त्यांच्यासाठी कधीही आपण स्टेटस ठेऊनही (dosti status in marathi) ती भावना व्यक्त करू शकतो. दोस्तीचे अर्थात मैत्रीचे कोट्सही (dosti quotes in marathi) आपल्याला त्यांच्याबद्दल अधिक प्रेम व्यक्त करण्यासाठी मदत करतात. असेच काही मैत्री - दोस्ती स्टेटस मराठीमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. असेच काही मैत्रीचे स्टेटस (friendship status in marathi) तुम्हाला तुमच्या खास मित्रांसाठी ठेवायचे असतील तर तुम्हाला हा लेख नक्कीच मदत करेल.

Table of Contents

  मैत्री - दोस्ती स्टेटस मराठीमध्ये (Dosti Status In Marathi)

  Friendship Status In Marathi

  मैत्री म्हटलं की राग रुसवा, प्रेम, मजा, मस्करी सगळ्याच भावना आल्या. कोणत्याही नात्यापेक्षा कधी कधी मैत्री अधिक जवळची म्हटली जाते. अशाच मित्रांसाठी काही खास दोस्ती स्टेटस. फ्रेंडशिप डे साठी अनेक स्टेटस लिहिले जातात. पण असेच कधीही मैत्रीसाठी कविता आणि स्टेटस ठेवणं नक्कीच मित्रांनाही अधिक आपलंसं करतात. 

  • डोळ्यात कितीही पाणी असल्यावरही
   त्यांचा फोन आल्यावर मूड बनतोच...ते मित्र
   आई-बाबांच्या रागापासून 
   खोटं बोलून वाचवतात ...ते मित्र
   कधी मुद्दाम मार खायला लावतात
   पण तरीही हळवेपणाने जवळ घेतात...ते मित्र
   कठीण प्रसंगीही खांद्याला खांदा देऊन उभे राहतात
   पण आपण काहीतरी मोठं केलंय हे कधीच जाणवू देत नाहीत...ते मित्र
   वेळ नाही कारण देणारे 
   पण वेळ आली की सगळं सोडून समोर उभे राहणारे...ते मित्र
   नको त्या गोष्टीवर वाद घालणारे
   पण राग कधीही न धरून बसणारे ...ते मित्र
   तुझं ते माझं आणि माझं ते पण माझंच
   अशाही स्वभावाचे...ते मित्र
   तुमच्याशिवाय जगच अपूर्ण - दिपाली नाफडे
  • अनोळखी अनोळखी म्हणत
   अचानक एकत्र होणं म्हणजे मैत्री
  • प्रेमामध्ये त्रास होतो असं म्हणतात 
   पण त्याहीपेक्षा त्रास मित्राने दुखावल्यास जास्त होतो
   मैत्री ही प्रेमापेक्षाही मोठी भासते 
  • शब्दापेक्षाही सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
   म्हणून मैत्रीचे खरं समाधान खांद्यावर ठेवलेल्या हातांमध्ये असतं 
  • जेव्हा कुणी हात आणि साथ 
   दोन्ही सोडून देतं 
   तेव्हा रस्ता दाखवणारी व्यक्ती
   म्हणजेच मैत्री 
  • मैत्री दोस्ती तुझी माझी
   राहो अशीच न्यारी 
  • मनातलं ओझं कमी करण्यासाठी 
   हक्काचं आहे एकच ठिकाण 
   मैत्री तुझी नि माझी 
   कायस्वरूपी राहू दे मनात
  • कोणतरी एकदा विचारलं 
   मित्र कसा असावा 
   म्हटलं उत्तर आहे सोपं
   अगदी आरशासारखा 
   गुण आणि दोष दोन्ही दाखवणारा 
  • मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही
   कारण दुःख असो वा सुख ते आपल्याला एकटे कधीच सोडत नाही
  • डचणीच्या काळात एकटं न सोडता
   खांद्याला खांदा देऊन उभं राहणारं नातं म्हणजे मैत्री 

  मराठी माजातील दोस्ती स्टेटस (Dosti Status In Marathi Attitude)

  Dosti Status In Marathi Attitude

  मैत्री - दोस्तीमधील माज काही वेगळाच असतो. सरळ एकमेकांशी ते काय बोलणार. एकमेकांना त्रास देणार आणि तितकाच जीवाला जीव लावणार तेच मित्र. मराठी माजातील असेच काही दोस्तीचे स्टेटस खास तुमच्यासाठी. खरे मित्र नक्की कसे ओळखायचे असाही प्रश्न असतो. अशाच खऱ्या मित्रांसाठी खास स्टेटस.

  • माहीत नाही लोकांना कसे काय चांगले मित्र सापडतात
   मला तर सगळेच नमुने सापडले आहेत 
  • आमची दोस्ती गणिताच्या शून्यासारखी आहे
   ज्याच्यासोबत राहिल्याने आमची किंमत वाढते 
  • स्टाईल अशी करा की लोक बघत राहतील
   आणि दोस्ती अशी करा की लोक जळत राहतील
  • आमच्या हातातली नशिबाची रेषा खूपच खास आहे
   म्हणून तर तुमच्यासारख्या मित्रांची साथ आहे
  • जीवनात एखाद्या चांगल्या मित्राची साथ लाभणं कठीण आहे
   पण या बाबतीत मी नशिबवान आहे
  • शत्रुला कधीच नाही भीत 
   पण मित्राच्या रूसण्याला मात्र घाबरतो आम्ही 
   रूसल्यावर काढायची आहे समजून हे खरं
   पण तरीही भाव खातो आपण 
   यालाच तर म्हणतात मैत्री 
  • दोस्ती कधी स्पेशल लोकांसोबत होत नाही
   ज्याच्यासोबत होते तेच स्पेशल होऊन जातात
  • वेळेपुरती दोस्ती तर सगळेच करतात
   मज्जा तर तेव्हा येते जेव्हा 
   वेळ बदलली तरीही दोस्त बदलत नाहीत
  • आपला तर कोणी मित्र नाही
   जे आहेत ते सगळे काळजाचे तुकडे आहेत
  • चांगला दोस्त चिडला तर त्याला कधीच वाऱ्यावर सोडू नका
   कारण तो असा हरामी असतो ज्याला आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात

  वाचा - दोस्ती यारीमध्ये इमोशनल करणारे कोट्स

  जीवलग मैत्री स्टेटस मराठीमध्ये (Best Friendship Status In Marathi)

  Best Friendship Status In Marathi

  काही मित्रमैत्रिणी असे असतात जे जीवाला अगदी जीव लावतात. त्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याला काहीही अर्थ नसतो. प्रत्येक गोष्ट त्यांच्याशिवाय नकोशीच वाटते. अशाच जीवलग मैत्रीसाठी काही स्टेटस मराठीमध्ये. मैत्रीवरील चारोळ्याही असतात ज्या पाठवून मित्रांवरील प्रेम व्यक्त करता येते.

  • आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल
   आणि जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला वेड लागेल
  • दोस्ती इतकी कट्टर पाहिजे 
   की लोकांची बघूनच जळाली पाहिजे 
  • हजारो नातेवाईकांपेक्षा जो मोठा असतो 
   तोच खरा मित्र 
  • चांगल्या काळात हात धरणं 
   म्हणजे मैत्री नव्हे 
   तर वाईट काळातही हात न सोडणं 
   म्हणजे मैत्री आणि ती तू कायम निभावली आहेस 
  • सगळी नाती ही जन्माच्या आधीपासूनच तयार असतात
   पण जन्मल्यानंतर एकच नातं आहे जे स्वतःला तयार करता येतं
   ते म्हणजे मैत्री आणि मी भाग्यवान आहे की, तू माझ्या आयुष्यात आहेस 
  • आजकाल जळणारे खूप वाढलेत
   त्यांना जळू द्या 
   आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
   हे त्यांना कळू द्या
  • तुझी मैत्री म्हणजे वजन तर आहे 
   पण त्याचं ओझ कधीच नाही 
  • प्रश्न पाण्याचा नाही तर तहानेचा आहे
   प्रश्न मृत्यूचा नाही तर श्वासाचा आहे
   दोस्त तर खूप आहेत दुनियेमध्ये 
   पण प्रश्न दोस्तीचा नाही तर विश्वासाचा आहे
  • चुका होतील आपल्या मैत्रीत 
   पण विश्वासघात कधीच होणार नाही
  • जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील
   एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
   कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते
   आज आहे तसेच उद्या राहील

  मजेशीर मैत्री - दोस्ती स्टेटस मराठीमध्ये (Funny Friendship Status In Marathi)

  Funny Friendship Status In Marathi

  मजेशिवाय तर मैत्री होत नाही. दुःखी असलो तरीही सुख देणारी व्यक्ती म्हणजे मैत्री. अशाच मित्रमैत्रिणींसाठी काही मजेशीर स्टेटस. मैत्रीतील कोट्स आणि स्टेटस

  • आम्ही एवढे handsome नाही की
   आमच्यावर पोरी फिदा होतील 
   पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर 
   माझे मित्र फिदा आहे
  • दुनियेतील सर्वात अवघड काम म्हणजे
   बिनडोक्याचे मित्र सांभाळणे 
  • तुझी आठवण आली की वाटतं एका 
   दगडावर miss u लिहावं आणि तो 
   दगड तुझ्या डोक्यात घालावा 
   म्हणजे तुला पण 
   माझी आठवण येईल
  • UR पोळी; IM तवा,
   UR खीर; IM रवा,
   UR पेढा; IMखवा,
   UR श्वास; IMहवा,
   अरे माझ्या मैत्रीच्या जिवा, 
   आठवण काढीत जा कवाकवा!!!!
  • हरामी मित्राला सांभाळणं
   म्हणजे एखादया बॉम्बला सांभाळणं
   म्हणजे कधी, कुठे आणि कसा फुटेल याचा नेम नाही
  • तुम्हाला माहितीये का माझे मित्र
   कोण आहेत..?
   डेटॉलच्या जाहिरातीमध्ये सगळं धुतल्यावर
   जे 2 जंतू राहतात ना तेच आहेत माझे मित्र
  • त्याचा आईला वाटत "मी सभ्य आहे"
   माझ्या आईला वाटत "तो सभ्य आहे"
   म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे
  • तुम्ही प्यायल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
   बोलणं जो समजून घेतो
   तोच खरा तुमचा Best Friend असतो
  • मी कितीही शेण खाल्लं तरीही
   शेणासकट मला स्वीकारतो आणि मला सुधारतो तो मित्र
  • वय कितीही होवो 
   शेवटच्या श्वासापर्यंत 
   खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं 
   एकच असतं ते म्हणजे "मैत्री"

  वाचा - दोस्ती यारीचं समीकरण मांडणारे

  मैत्रीतील दुःखाचे स्टेटस (Friendship Sad Status In Marathi)

  Friendship Sad Status In Marathi

  कधी कधी मैत्रीतही दुरावा येतो. तेव्हा मन उदास होते. रागावलेल्या मित्रमैत्रिणींसाठी नक्की काय करायचं कळत नाही. मग अशावेळी कामी येतात ते स्टेटस. असेच मैत्रीतील दुःखाचे स्टेटस

  • मित्र गरज म्हणून नाही
   तर सवय म्हणून जोडा 
   कारण गरज संपली जाते 
   पण "सवयी" कधीच सुटत नाही
  • मला नाही माहीत की मी एक 
   चांगला मित्र आहे की नाही परंतु
   मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
   राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!
  • आमची मैत्री पण अशी आहे
   तुझं माझे जमेना आणि 
   तुझ्या विना करमेना
  • कितीही दुखावलं असेल 
   तर हक्कापोटी बोलणं झालंय
   समजून घे आणि आपल्या मैत्रीला जाग 
  • दुरावा आला असला तरीही
   प्रेम काही कमी नाही झालंय
   कधीतरी तुला हे नक्की कळेल
   मैत्रीला नक्की जप
  • भांडण तर होणारच
   पण म्हणून एकमेकांना शिक्षा देण्यासाठी 
   इतका दुरावा योग्य नाही 
  • तुला माझ्यावर जितकं रागावायचं आहे 
   नक्की रागाव
   पण माझ्यापासून दूर नको जाऊ
  • एकवेळ मी पुन्हा कधीच चूक करणार नाही
   पण तू दूर नको जाऊस
  • चल झाली माझी चूक
   पण इतकी मोठी शिक्षा नको देऊ
   आपल्या मैत्रीचा कर विचार
   आणि परत ये
  • तू जी शिक्षा देशील आहे मान्य मला
   पण तुझ्याच मैत्रीचा आधार आहे मला

  जिगरी मैत्रीचे कोट्स मराठीमध्ये (Best Friendship Quotes In Marathi)

  Friendship Status In Marathi

  जिवाभावाची आणि जिगरी मैत्री ही अशी असते की कितीही काहीही झालं तरी ती तुटत नाही. रूसवा, फुगवा, भांडणं काहीही असलं तरीही असे मित्र असतात जे कायम एकत्र राहतात. अशाच जिगरी मैत्रीसाठी कोट्स 

  • जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
   पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात 
   घर करून राहिलेली असते,
   आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.
  • मैत्री हसवणारी असावी
   मैत्री चिडवणारी असावी
   प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
   एक वेळेस ती भांडणारी असावी
   पण कधीच बदलणारी नसावी
  • मैत्री म्हणजे थोडं घेणं
   मैत्री म्हणजे खूप देणं
   मैत्री म्हणजे देता देता 
   समोरच्याच होऊन जाणं
  • जीवनात कितीही मित्र भेटू द्या
   पण आपल्या शाळेतल्या
   मित्रांना कधीच विसरता येत नाही
  • मैत्री तुझी माझी
   रोज आठवण न यावी असे होतच नाही,
   रोज भेट घ्यावी यालाही काहीच 
   हरकत नाही,  मी तुला विसरणार नाही याला "विश्वास" म्हणतात आणि
   तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात
  • मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय 
   जे कधी तिरस्कार करत नाही,
   एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही
   एक भास जो कधीही दुखावत नाही आणि
   एक गोड नातं जे कधी संपतच नाही
  • कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
   जर निभावणारे कट्टर असतील ना
   तर सारी दुनिया सलाम करते
  • कुठलंही नातं नसताना 
   आयुष्यभर साथ देते ती मैत्री 
  • मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे 
   बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
   मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री
  • मैत्री म्हणजे दिलासा 
   आणि मैत्री म्हणजे आपुलकी
   मैत्री म्हणजे श्वास 
   मैत्री म्हणजे आठवण

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक