फ्रुट स्मुदी प्या आणि वजन नियंत्रणात ठेवा

फ्रुट स्मुदी प्या आणि वजन नियंत्रणात ठेवा

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. डाएट करतो, गोडधोड पदार्थ टाळतो. पण असे करुनही कधीकधी वजनात फारसा फरक पडत नाही असे जाणवते. पण वजन कमी करण्यासोबतच शरीरात योग्य गोष्टी जाणे हे देखील तितकेच गरजेचे असते. पोटाला चिमटा काढण्यापेक्षा जर काही गोष्टी तुम्ही योग्य आहारात घेतल्या तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ लागतो. आता फळांचा आहारात समावेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आहारात स्मुदी हा प्रकार नक्की ट्राय करु शकता. एकावेळचे जेवण न घेता त्या जागी जर तुम्ही स्मुदी घेतली तर तुमच्या वजनात आणि शरीरात नक्कीच बदल झालेला जाणवेल.

उन्हाळ्यात या कारणासाठी टाळायला हवे नॉन व्हेज पदार्थ

स्मुदी म्हणजे काय?

Instagram

वेगवेगळ्या फळांचा गर घेऊन तो दुधात घालून मिक्सरमध्ये एकत्रित केला जातो. फळांच्या रसाच्या तुलनेत हा थोडा जाड असतो. कारण त्यामध्ये दूध आणि फळांचा गर असतो. फळांचा हा गर दुधातून घेतल्यामुळे तो पूर्णान्नासारखाच असतो. त्यामुळे तुमचे पोट जास्त काळासाठी भरलेले राहते. असे म्हणतात की, फळ आणि दूध एकत्र करु  नये त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. पण असे काही सिद्ध झालेले नाही. उलट अनेकदा डाएटिशन अशा प्रकारच्या स्मुदी पिण्याचा सल्ला देतात. 

हिरड्या निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

स्मुदी पिण्याचे फायदे

Instagram

  • स्मुदी या वेगवेगळ्या फळांपासून बनवल्या जातात. केळं, पपई,स्ट्रॉबेरीज, मलबेरीज अशा वेगवेगळ्या बेरीज आणि फळांचा उपयोग करुन या स्मुदी तयार केल्या जातात त्यामुळे तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात फळ जातात.
  •  शरीराला प्रोटीनसोबतच फायबरची मोठ्या प्रमाणात गरज असते. जर तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात फायबर गेले तर तुम्हाला सतत लागणारी भूक नियंत्रणात येते. पोट हे कायम भरलेले राहते.
  • वजन कमी करण्यासाठी खूप वेळा लिक्विड डाएट करण्याचा सल्ला दिला जातो. पण लिक्विड डाएट करायचा कितीही विचार केला तरी तो काही केल्या होत नाही. अशावेळी दिवसातून कोणतेही एक मील तुम्ही स्मुदी घेतली तर तुम्ही लिक्विड डाएट केल्याप्रमाणेच होते. शक्यतो रात्रीचे जेवण न करता तुम्ही स्मुदी करणे हे नेहमीच चांगले. 
  • जर तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तर फ्रुट स्मुदी तुमची गोड खाण्याची क्रेव्हिंग आपसुकच कमी करु शकतात. फळ ही गोड असल्यामुळे गोड खाण्याची इच्छा ही आपोआप कमी होते. यामध्ये तुम्ही साखर नाही घातली तर फार उत्तम 
  • महिनाभर तुम्ही हा प्रयोग करुन पाहा. वेगवेगळ्या फळांपासून तुम्ही स्मुदी तयार करा.  रोजच एक प्रकारची किंवा एका चवीची स्मुदी तुम्ही प्याल तर तुम्हाला कंटाळा येईल त्यापेक्षा रोज वेगवेगळ्या फळांच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने या स्मुदी प्या. 
  • जर तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये बदल करुन दुपारच्या जेवणात याचा समावेश करायचा असेल तरी देखील तुम्ही हा बदल करु शकता. कारण त्यामुळे तुमच्या शरीरात बदल जाणवेल. तुमचे वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळेल. 
  • फ्रुट स्मुदी या फ्रेश प्यायल्या हव्यात. म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तुम्ही स्मुदी तासनंसात ठेवून मग प्यायल्याने त्यावर प्रक्रिया होण्याची शक्यता असते. जी शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.


वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फ्रुट स्मुदी किती चांगल्या आहेत हे जाणून घेतल्यानंतर त्याचा आहारात नक्की समावेश करायला हवा. 

 

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांसाठी घरगुती फेसपॅक आणि हेअरमास्क