ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
प्लेन साडीवर शिवा हेवी ब्लाऊज, अशी करा निवड

प्लेन साडीवर शिवा हेवी ब्लाऊज, अशी करा निवड

सणवार सोडून कुठेतरी नेसता येईल अशा विचाराने आपण बरेचदा प्लेन किंवा सिल्क प्रकारातील रॉयल लुक देणारी साडी घेतो. या साड्या घेताना त्या आपल्याला रिच आणि रॉयल वाटतात. पण कालांतराने अशा साड्या आपल्याला उगाचच घेतल्या असे वाटू लागतात. या साड्या चारचौघात नेसल्यानंतर अगदीच फिक्या पडतात असे वाटल्यामुळे या साड्या नेमक्या कशा नेसाव्यात असा विचार आपण करु लागतो. या साड्या महाग असूनही या खूप वेळा टाळून दुसऱ्या साड्या नेसल्या जातात. पण आता असे करण्याचे काहीच कारण नाही. कारण अशा साड्यांवर योग्य ब्लाऊजचा प्रकार निवडला तर या साड्या फारच सुंदर दिसतात. म्हणूनच ब्लाऊजचे काही प्रकार आम्ही शोधून काढले आहेत. कॉटन, सिल्क अशा प्रकारातील हे ब्लाऊज तुम्ही अगदी तुमच्या कोणत्याही साड्यांव मिस-मॅच करुन नेसू शकता.

रेडिमेड ब्लाऊज विकत घेताना या गोष्टींची घ्या काळजी

कलमकारी ब्लाऊज ( Kalamkari Blouse)

कलमकारी ब्लाऊज

Instagram

ADVERTISEMENT

कलमकारी ही सध्या सगळ्यांनाच आवडेल अशी डिझाईन आहे. कलमकारीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये देवीदेवतांची, प्राण्याची, पानाफुलांची गुतंलेली अशी डिझाईन मिळते. वेगवेगळ्या रंगामध्ये हा कपडा मिळतो. तुमच्या साडीचा रंग जर फिका असेल तर तुम्ही गडद रंगाचा कलमकारी ब्लाऊज निवडा. जर तुमच्या साडीचा रंग गडद असेल तर त्याला उठाव देईल असा लाईट रंगाचा ब्लाऊज निवडा. त्यामुळे तुमची साडी अधिक उठून दिसेल .

मुनियार पैठणी ब्लाऊज (Muniyar Paithani Blouse)

मुनियार पैठणी ब्लाऊज

Instagram

पैठणी आपण आतापर्यंत सगळ्यांनीच पाहिल्या आहेत. पण मुनियार पैठणी या फारच सुंदर दिसतात. जर तुमची साडी एखादी प्लेन कॉटन किंवा सिल्क असेल तर अशा साडीवर तुम्हाला मुनियार पैठणीचे मिळणारे खास ब्लाऊजही वापरता येतात.  मुनियार काठ ही पैठणीच्या रेग्युलर काठ सारखी नसते. गोल्डन किंवा सिल्व्हर काठांवर एखादी उभी लाईन असते. यामध्येही तुम्हाला पोपट, मोर अशा डिझाईन्स मिळतात. ज्या तुम्हाला ब्लाऊजच्या  पाठीवर शिवता येतात. हे ब्लाऊजही तुमच्या साध्या साडीला एक वेगळा लुक देतात. 

ADVERTISEMENT

ब्लाऊज बॅक डिझाईननववधूसाठी बेस्ट ब्रायडल ब्लाऊज डिझाईन्स (Bridal Blouse Design In Marathi)

इकत ब्लाऊज ( Ikkat Blouse)

इकत ब्लाऊज

Instagram

इकतचा प्रकार सध्या खूपच चलतीत आहे. जर तुम्हाला इलिगंट आणि रिच लुक हवा असेल तर इकतचा ब्लाऊज खूपच सुंदर दिसतो. हल्ली इतक डिझाईन्स या कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही प्रकारात मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या प्रकारामध्ये यामध्ये पॅटर्न आणि रंग निवडू शकता. इकत या प्रकारातील ब्लाऊज स्लिव्हलेस किंवा फुलहँड प्रकारामध्येही निवडता येतील. इकत ब्लाऊज हे कॉटनमध्ये अधिक सुंदर दिसतात. 

ADVERTISEMENT

खण ब्लाऊज ( Khunn Blouse)

खण ब्लाऊज

Instagram

तुमच्या अगदी कोणत्याही प्रकारच्या साडीला जर तुम्हाला अगदी ट्रेडिशनल आणि मराठमोळा लुक द्यायचा असेल तर तुम्हाला खणाचे ब्लाऊज हे फारच सुंदर दिसतात. खण हा सध्याचा ट्रेंड आहे. खण या प्रकारात हल्ली अनेक डिझाईन्स आणि पॅटर्न मिळतात. नथीचा नखरा दाखवणारा नथ हा प्रकार देखील यामध्ये सध्या पाहायला मिळतो. एखादी कॉटन किंवा सिल्क प्लेन साडी असेल तर तुम्ही या प्रकारातले ब्लाऊज शिवू शकता. 

बनारसी ब्लाऊज (Banarasi Blouse)

बनारसी ब्लाऊज

ADVERTISEMENT

Instagram

एखाद्या साध्या साडीला तुम्हाला एकदम टिपटॉप लुक द्याया असेल तर तुम्ही बनारसी कपड्याचा ब्लाऊज शिवू शकता. बनारसी या प्रकारात ब्लाऊज पीसचे हल्ली वेगवेगळे प्रकार मिळतात. जर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची स्टायलिंग करायला आवडत असेल तर यामधील वेगवेगळे पॅटर्न आणि गडद रंग तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच ते वापरायला हवेत. 

आता तुमच्या कपाटातील अशा काही साड्या काढा आणि त्यांना नवा लुक देण्यासाठी हे ब्लाऊज पीसचे पॅटर्न निवडा.

साड्यांवरऑफशोल्डर ब्लाऊज निवडताना

ADVERTISEMENT
18 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT