गुढीपाडवा 2021: जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

गुढीपाडवा 2021: जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार आणि हिंदू संस्कृतीनुसार वर्षाचा पहिला महिना असतो तो चैत्र. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांगाला सुरूवात होते आणि हाच असतो गुढीपाडवा अर्थात हिंदू वर्षाचा नवा दिवस. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरूवात होते. गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत जोरदार करण्यात येते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा दिवस गुढीपाडवा असल्यानेआपल्याकडे गुढीपाडव्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी कोणतेही चांगले कार्य करायचे असल्यास, मुहूर्त पहावा लागत नाही. अगदी सोने खरेदी करण्यापासून ते लग्न ठरविण्यापर्यंत अनेक चांगल्या कार्याची सुरूवात या दिवशी करता येते. आपल्या जवळच्या व्यक्तींना गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. तसंच या दिवसापासून चैत्र नवरात्रालाही सुरूवात होते. चैत्र नवरात्री हे चैत्र शुद्ध नवमीपर्यंत चालू राहते. गुढीपाडवा हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो आणि त्यामुळेच यावर्षी 2021 मध्ये गुढीपूजनचा मुहूर्त काय आहे आणि कसा असावा पूजाविधी हे जाणून घेऊया.  

गुढीपूजनाचा मुहूर्त

Freepik

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे याला विशेष असा मुहूर्त नसतो. सूर्योदयपासून कधीही गुढीचे पूजन करता येते. 

चैत्र प्रतिपदा शुभारंभ - मंगळवार, 13 एप्रिल, 2021 सकाळी 10 वाजून 16 मिनिटे प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके 1943 प्रारंभ 

सूर्योदय - सकाळी 6 वाजून 24 मिनिटे

सूर्यास्त - संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटे 

गुढीपाडव्याचा विधी

पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे आणि अंगाला उटणे आणि सुगंधित तेल लाऊन अभ्यंगस्नान करावे. दरवाजाला ताज्या फुलांचे तोरण बांधावे. एका वेळूच्या काठीला तेल लावा आणि त्याला स्नान घाला. नंतर त्या काठीच्या टोकाला एक केशरी वस्त्र बांधावे. कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे, त्यावर स्वस्तिक काढावे आणि गजरा बांधावा. नंतर कलश उपडा ठेवावा. काठीला आंब्याचे डाहाळी, कडिलिंबाचा पाला, फुलांची माळ, बत्ताशांची माळ घातली जाते. घरातून उजव्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने गुढी उभारावी. हळद कुंकू वाहावे. धूप - दीप अगरबत्ती दाखवून पूजा करावी. त्यानंतर नेवैद्य दाखवून गुढीला नमस्कार करावा. गुढीपाडव्याच्या दिवशीच पंचांग वाचन आणि पूजनही केले जाते. सरस्वती देवीचे पूजन ककरून शालेय साहित्य, पाटी, वह्या सर्व पूजण्याचीही प्रथा आहे. आपण नियमित वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करावी. 

गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू

तांब्याच्या धातूची गुढी का?

Freepik

गुढीपाडव्याला ब्रम्हांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात असा समज आहे. या लहरी खेचून घेण्याचे काम गुढी करते. तांब्याचा धातू हा प्रजापती लहरींना आकर्षिक करतो. तांब्याचे मुख हे खालच्या बाजूने असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात आणि या तांब्यातून पाणी वर्षभर प्यायल्याने चांगले आरोग्य लाभते असाही समज आहे. म्हणूनच तांब्याच्या धातूची गुढी उभारली जाते. यामुळे शरीरातील सतोगुण वाढतात असाही समज आहे. त्यामुळेच काठीला तांबे धातू असणारा तांब्या बांधला जातो आणि गुढी उभारण्यात येते. 

गुढीपाडव्यासाठी करा घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड

कडुलिंबाचा आरोग्यावर चांगला प्रभाव

कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावली जातात. त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो आणि कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहाते. कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट आहेत. वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे कडूलिंबाचा उपयोग केला जातो. यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नवसंजीवनीही मिळते. त्यामुळेच याचा उपयोग गुढीपाडव्याला केला जातो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक