मालिश करण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत असतील. कारण कामाची दगदग अथवा चिंता काळजीमुळे थकवा आल्यास डोक्यावर तेल लावून मालिश केल्यास चांगला फायदा होतो. बऱ्याचदा अंगाला तेल लावून मालिश केल्यामुळेही थकवा कमी होऊन चांगला आराम मिळतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का तुम्ही फक्त कानाला मालिश केलं तरी तुमच्या अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या कानाला मालिश अथवा कानाच्या पाळीवर मसाज करण्याचे अफलातून फायदे.
मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी अनेकांनी अनुभवली असेल. कारण आजकाल मायग्रेनचा त्रास बऱ्याचजणांना होतो. मायग्रेन ही एक गंभीर डोकेदुखी असून त्यामुळे डोक्यातून असह्य वेदना जाणवतात. यासाठीच वेळीच या समस्येवर उपाय करणं गरजेचं आहे. काही लोक या त्रासातून वाचण्यासाठी सतत गोळ्या घेतात. मात्र लक्षात ठेवा पेनकिलर अथवा गोळ्या सारखं घेणं नक्कीच योग्य नाही. तुम्ही तुमच्या कानाला मालिश करून तुमची डोकेदुखी कमी करू शकता. यासाठी तेलाने कानावर हलक्या हाताने मालिश करा.
आजकालचे धावपळीचे जग आणि सतत कामाची चिंता यामुळे ताणतणावात वाढच होताना दिसते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टींचे टेन्शन असेल तर ते कमी करण्यासाठी आणि ताणातून काही वेळ आराम मिळवण्यासाठी तुम्ही ही टेकनिक वापरू शकता. यासाठी कानाच्या पाळीच्या वरील भागावर सर्क्युलर मोशनमध्ये मालिश करा. अशा प्रकारे मालिश केल्यामुळे तुम्हाला निवांत वाटू लागते आणि सगळ्या चिंता काळजी पासून काही काळ मुक्ती मिळते.
मालिशमुळे वजन कमी करण्यास नक्कीच मदत होते. मात्र तुम्ही फक्त तुमच्या कानाला मालिश करूनही तुमचं वजन कमी करू शकता. अर्थात यासोबत तुम्हाला योग्य आहार आणि व्यायाम करायलाच हवा. मात्र कानाला मालिश करण्याचाही चांगला फायदा नक्कीच होतो. कारण कानावर शरीरातील विविध अवयवांना बूस्ट करणारे पॉईंट असतात. मालिश केल्यामुळे हे पॉईंट कार्यांन्वित होतात. वजन कमी करण्याचा हा एक सोपा आणि लाभदायक मार्ग आहे.
झोप कमी येण्याची अथवा अनिद्रेची कारणं अनेक असू शकतात. चिंता, काळजी, उशीरा काम करणं, आरोग्य समस्या, एखादी मोठी जबाबदारी अशी काही कारणं यामागे असू शकतात. मात्र जेव्हा तुम्हाला झोप येत नसेल तेव्हा झोपेची औषधे घेण्याऐवजी हा उपाय करा. कानाला मालिश केल्यामुळे तुमचे कानाजवळचे आणि डोक्याजवळचे स्नायू शिथील होतात. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते. कानाला मालिश केल्यामुळे तुमचे संपूर्ण शरीरच रिलॅक्स होते.
अंगदुखीची कारणंही अनेक असू शकतात. त्यामुळे तुमचे संपूर्ण अंग का दुखत आहे यासाठी तज्ञ्जांचा योग्य सल्ला अवश्य घ्या. सोबतच कानाला मालिश करण्याचा पर्यायही निवडा. कारण कानाची पाळी रगडल्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व मांसपेशी उत्तेजित होतात. याचं कारण असं केल्यामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचं हॉर्मोन्स रिलीज होतं. ज्यामुळे तुमचं अंग दुखणं नक्कीच कमी होऊ शकतं. कानाला मालिश केल्यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरणही सुधारतं. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या शरीरावर जाणवतो.