हाताच्या बोटांचे साल निघत असेल तर वापरा सोप्या टिप्स

हाताच्या बोटांचे साल निघत असेल तर वापरा सोप्या टिप्स

हाताच्या बोटांचे साल तुमचेही निघतं का? बऱ्याचदा याचं नक्की काय करायचं कळत नाही. कारण यामुळे सुंदर हात खराब दिसतात. शिवाय जर हे साल ओढून काढलं तर त्यातून रक्तही येतं आणि त्रासही होतो. काही लोक तर याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करून चालणार नाही. कारण ही समस्या वाढूही शकते. तुम्हालाही जर हाताच्या बोटांचे साल निघण्याचा त्रास असेल तर काही सोप्या टिप्स आम्ही या लेखातून देत आहोत.  कारण असं झाल्यास काही जणांना दातांनी ही साल काढून टाकायची असते. तर काही जण नखाने ओढून काढतात. या सवयींमुळे बऱ्याचदा रक्त येते आणि सूजही आलेली पाहायला मिळते. पण तुम्हाला हा समस्येतून सोडविण्यासाठी घरगुती काही सोप्या टिप्सचा वापर करता येईल. अशा कोणत्या सोप्या टिप्स आहेत ते जाणून घ्या. 

केळ्याचा करा वापर

Shutterstock

केळ्यात असणारे अँटिऑक्सिडंट त्वचेला मॉईस्चराईज करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. केळ्याचा लेप तुम्ही तुमच्या हातांना लाऊ शकता. ही पेस्ट वापरल्याने सूज कमी होते. यामध्ये अँटिइन्फ्लेमेट्री गुण असल्याने याचा उपयोग होतो. 

कसे वापरावे 

 • एक चमचा केळ्याची पेस्ट आणि एक चमचा दूध घ्या
 • बाऊलमध्ये दूध आणि केळ्याची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या 
 • आता ही पेस्ट नखाजवळ निघालेल्या सालपटांवर लावा 
 • 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने हात धुवा 
 • या पेस्टचा रोज वापर केल्यास, हाताचा कोरडेपणा दूर होतो आणि हाताच्या बोटांचे सालही निघत नाही

मधाचा उपयोग करून घ्या

Shutterstock

मध हे त्वचेसाठी उत्तम ठरते. मधाचा वापर केल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तसंच साल निघाल्यास, येणारे रक्त थांबविण्यासाठी मधाची मदत होते. याचा वापर केला जाऊ शकतो. एखादी जखम त्वरीत भरण्यासाठी मधाचा उपयोग होतो. यामध्ये असणारे अँटिसेप्टिक हे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. 

कसे वापरावे 

 • एक लहान चमचा मध घ्या
 • आपल्या नखांजवळील त्वचेला लावा आणि साल निघाले असेल तिथे व्यवस्थित लावा 
 • 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग पाण्याने स्वच्छ धुवा 
 • तुम्हाला काही दिवसातच याचा परिणाम दिसून येईल. हाताची त्वचा व्यवस्थित होईपर्यंत तुम्ही हा प्रयोग रोज करावा 

दूध ठरते उपयुक्त

Shutterstock

दुधामध्ये असणारे लॅक्टिक अॅसिड त्वचेसाठी उपयुक्त ठरते. दुधाचा वापर केल्याने त्वचा अधिक मऊ आणि मुलायम तर होतेच. पण त्याशिवाय अधिक चमकदार होण्यास मदत मिळते. दुधाचा वापर केल्याने त्वचेवरील काळेपणाही निघून जातो. तसंच त्वचा भाजली तरीही याचा उपयोग करून घेता येतो

कसे वापरावे 

 • एका बाऊलमध्ये कच्चे दूध घ्या आणि त्यामध्ये एक चमचा गुलाबपाणी मिक्स करा 
 • हे मिश्रण तुम्ही तुमच्या बोटांना लावा 
 • त्यानंतर काही वेळाने हात स्वच्छ करा. दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही हे करा. यामुळे हातावच्या बोटाचे सालपट निघणं बंद होईल

विटामिन ई ऑईल

Shutterstock

त्वचेच्या काळजीसाठी विटामिन ई अत्यंत उपयुक्त ठरते. कोरड्या त्वचेसाठी विटामिन ई चा फायदा होतो. बोटाच्या आसपासची त्वचा जेव्हा निघते तेव्हा तुम्ही विटामिन ई ऑईलचा वापर करू शकता. 

कसे वापरावे 

 • विटामिन ई कॅप्सूल आणि एक चमचा नारळाचे तेल घ्या 
 • एका बाऊलमध्ये हे दोन्ही नीट मिक्स करा 
 • हे मिश्रण नखांच्या आसपास निघालेल्या त्वचेला लावा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे हाताला लावा आणि सकाळी उठल्यावर हात स्वच्छ धुवा. आठवडाभर तुम्ही हा प्रयोग केल्यास, तुम्हाला याचा योग्य परिणाम दिसून येईल. तुमचे हात अधिक मऊ आणि मुलायमही होतील

कोरफड जेलचा करा वापर

Beauty

Manish Malhotra Amla Moisturising Gel

INR 945 AT MyGlamm
Shutterstock

ऋतू बदलला की, त्वचा कोरडी होते. कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड जेल उपयुक्त ठरते. कोरफड जेलचा वापर करून त्वचा हायड्रेट ठेवता येते. 

कसे वापरावे 

 • ताजी कोरफड जेल घ्या आणि फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा 
 • दिवसातून दोन  वेळा ही थंड जेल तुम्ही बोटांच्या निघालेल्या सालपटांना लावा 
 • यामुळे तुम्ही त्वरीत आराम मिळेल आणि तुमची बोटांची त्वचा अधिक चांगली होण्यास मदत मिळते

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक