घरासाठी रंग निवडताना या गोष्टी घ्या विचारात

घरासाठी रंग निवडताना या गोष्टी घ्या विचारात

घरात रंगकाम करायचे म्हटले की, करण्याच्या आधी जितके रंग आपल्याला सुचतात तितके आपल्याला प्रत्यक्ष रंगकाम करायला घेतल्यावर सुचत नाही. घरात रंगकाम करण्याचा विचार असेल आणि कोणता रंग निवडू हे कळत नसेल तर काही गोष्टी जाणून घेणे या फार गरजेच्या आहेत. रंगाची निवड कशी आणि कोणत्या गोष्टी विचारात घेऊन करायची याची थोडीशी माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणजे घर नवीन असो किंवा जुने तुमचे घर नेहमीच छान आणि सुंदर दिसेल. 

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)

Instagram

खोलीचा आकार
रंग काम करताना किंवा रंग निवडताना सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे  खोलीचा आकार. खोलीचा आकार लहान असेल किंवा मोठा जर खोली प्रशस्त वाटायची असेल तर तुम्ही खोलीत फिकट रंग निवडा. कलर हा जितका लाईट असेल तितकी तुमची खोली अधिक चांगली दिसते. फिक्कट पिवळा,मोती रंग आणि शक्य असेल तर पांढरा रंग खोलीला छान उठून दिसतो. जर तुम्ही लाईट रंग निवडले तर खोलीचा आकार मोठा दिसू लागतो. कितीही लहान खोली असली तरी देखील त्याचा आकार हा प्रशस्त दिसतो. त्यामुळे खोलीचा आकार विचारात घ्या. 


खोलीतील सूर्यप्रकाश 

खोलीतील सूर्यप्रकाश हा देखील तितकाच महत्वाचा असतो.खोली अंधारी असेल आणि तुम्ही गडद रंग निवडू नका. कारण जर तुम्ही रंग गडद निवडला तर ती खोली अंधारी दिसू लागते. खोलीत सूर्यप्रकाश जास्त असेल तर तुम्ही हलका मोती रंग किंवा पांढरा रंग निवडा कारण असा रंग फार उठून दिसतो. त्यामुळे तुमची खोली दिवसभर प्रकाशित आणि सकारात्मक उर्जेने भरलेली दिसते. जर तुम्हाला एखादी भिंत गडद करायची असेल तर तुम्ही ती करु शकता. कारण सूर्यप्रकाश असलेल्या घरात एखादी भिंत अशी केली तरी चालू शकेल.

खोलीचा प्रकार 

तुम्हाला कोणत्या खोलीसाठी रंग निवडायचा आहे  हे देखील महत्वाचे आहे. कारण बरेचदा लिव्हिंग रुम, बेडरुम आणि किचन अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला रंग काम करायचे असते. अशावेळी तुम्हाला रंग नेमका कोणत्या खोलीला लावायचा आहे ही गोष्टही विचारात घ्यावी लागते. लिव्हिंग रुम हा घराचा मुख्य भाग आहे. या खोलीचा रंग हा कायम लाईट असावा. सुरुवातीलाच जर तुम्ही गुलाबी किंवा पिवळा असे काही रंग निवडले तर इतके खास दिसत नाही. जर तुम्हाला असे रंग आवडत असतील तर तुम्ही त्यामधील लाईट रंग निवडा. कारण असे रंग चांगले दिसतात. बेडरुम ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला  तुमच्या आवडीचा रंग निवडता येतो. कारण या खोलीत तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही जाण्याची जास्त शक्यता नसते. 

उशांमुळे घराला आणा वेगळा ‘लुक’


रंगाचा पोत 

हल्ली वेगवेगळे रंग मिळतात. काही रंग हे पीओपी केलेल्या भिंतींवर केले जातात. त्यामुळे ते नेहमीच क्रिमी आणि वेगळे दिसतात. जर तुमच्या वॉल पीओपी केलेल्या नसतील तर तुम्ही कोणताही रंग लावला तरी देखील तो क्रिमी आणि छान दिसत नाही. अशावेळी तुम्ही रंग काम करणाऱ्यांना काही महत्वाच्या गोष्टी विचारुन घ्या. म्हणजे तुम्ही केलेले रंगकाम उठून दिसेल 


आता रंग काम करताना या गोष्टी नक्की लक्षात घ्या.

वास्तू टीप्स: चूकून ही तुमच्या बेडजवळ ‘या’ वस्तू ठेऊ नका, होऊ शकतं नुकसान