श्वासोच्छवास चांगला राहण्यासाठी हे करा उपाय

श्वासोच्छवास चांगला राहण्यासाठी हे करा उपाय

सध्या पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला घेतलं आहे. कोरोनाच्या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे श्वसनास होणारा त्रास. श्वसनासंदर्भात होणारे हे त्रास योग्य काळजीनिशी दूरही ठेवता येतात. सध्य परिस्थितीचा विचार करता श्वासोच्छवास चांगला असेल तर तुमची प्रकृती सुदृढ राहण्यास मदत मिळेल. श्वासोच्छवास चांगला राहण्यासाठीच काही सोपे उपाय आम्ही शोधून काढले आहेत. हे उपाय केले तर तुम्हाला श्वसनासंदर्भात त्रास होणार नाही. शिवाय तुमची प्रतिकारशक्तीही चांगली राहील.

चालताना अथवा धावताना धाप लागत असेल तर या टिप्स करा फॉलो

 

श्वास आहे महत्वाचा

प्रत्येक सजीव जीवांसाठी श्वास हा महत्वाचा आहे. शरीरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन असेल तर शरीराच्या तक्रारी जाणवत नाहीत. शरीरात प्रतिकारशक्ती चांगली राहते. ऑक्सिजनच्या योग्य प्रमाणामुळे शरीरातील प्रत्येक अवयव हे निरोगी राहतात. शरीरात श्वासाचे प्रमाणे चांगले असेल तर आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी आपल्याला जाणवत नाहीत. पण त्यासाठी श्वास हा फारच महत्वाचा आहे. त्यामुळे श्वासोच्छवास सुरळीत होण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 नियमित करा प्राणायाम आणि मिळवा अफलातून फायदे (Pranayam Benefits In Marathi)

श्वासोच्छवास चांगला राहण्यासाठी काही सोपे उपाय

श्वासोच्छवास चांगला राहण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय घरीच तुम्हाला करता येतील.जे फारच सोपे आहेत

  • श्वासोच्छवास चांगल्या राहण्यासाठी प्राणायाम हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे श्वास कसा घ्यावा हे कळतं. जितका दीर्घ आणि कमीत कमी श्वास घ्याल तितके आयुष्य वाढते असे म्हणतात. प्राणायाम हा श्वासावर नियंत्रण आणण्यास मदत करतो. 
  • कापूर हे देखील श्वासासाठी खूप चांगले आहे. कापराचा वास घेतल्यामुळे श्वासास आलेला अडथळा दूर होतो. तुम्हाला श्वासा संदर्भात काही विकार असतील तर तुम्ही कापराचा वास अधून मधून वास घ्या. हल्ली कापराने भरलेले एअर फ्रेशनर मिळतात जे तुम्हाला घरी कुठेही लावता येतात.
  •  वाफ घेणेही आरोग्यासाठी खूपच चांगले. जर छातीत जर कफ साचला असेल तर वाफ घ्या त्यामुळे श्वसनाचा मार्ग मोकळा होतो.
  •  आल्याचे सेवन हे देखील श्वसनासाठी फारच फायदेशीर असते. आल्यामुळे शरीरात पुरेसा श्वास खेळता राहतो. त्यामुळे आल्याचे सेवन करा. आलं कुटून ते असलेले पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन मिळतो.
  •  काकडी खाल्ल्यामुळेही शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे आवर्जून काकडीचे सेवन करा. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे शरीरात ऑक्सिजन खेळता राहतो

'या' कारणांमुळे लागते उचकी

घाबरु नका

सध्याच्या दिवसात श्वास घेण्यास त्रास होणे हे अनेकांना धोक्याचे वाटते. पण तुम्ही घाबरुन जाऊ नका. त्याऐवजी फिटनेसकडे अधिक भर द्या.  कारण घाबरुन जाऊन तुम्हाला आणखी त्रास होण्याची शक्यता असते. त्या ऐवजी थोडं निवांत राहा आणि आरोग्याची काळजी घ्या. वरील घरगुती उपाय करताना तुम्हाला काही त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. 

 

आता हे घरगुती उपाय करा आणि श्वासवर नियंत्रण मिळवत शरीर निरोगी ठेवा.