नेलपॉलिश शेडचं तुमच्याकडे चांगलं कलेक्शन असू शकतं. शिवाय आजकाल बाजारात तर विविध रंगाच्या शेड उपलब्ध असतात. मात्र असं असूनही बऱ्याचदा हवी तेव्हा हवी तशी शेड तुम्हाला मिळेलच असं नाही. मात्र काळजी करू नका कारण एखाद्या ड्रेसवर तुम्हाला अगदी हवी तशी नेलपॉलिश शेड हवी असेल तर ती तुम्ही घरी देखील तयार करू शकता. तुमच्याकडे असलेल्या साहित्यापासूनच तुम्ही तुमची फेव्हरेट नेलपेंट शेड तयार करू शकता. शिवाय एकदा तुम्हाला ही टेकनिक समजली की तुम्हाला हव्या असलेल्या शेडसाठी मार्केटमध्ये ब्युटी सेंटरमध्ये चक्कर मारण्याची अथवा ऑनलाईन सर्च करण्याचीही गरज नाही. जाणून घ्या या सोप्या टिप्स आणि घरीच बनवा तुमची फेव्हरेट नेलपॉलिशची शेड.
pexels
होममेड नेलपॉलिश कशी बनवावी -
घरच्या घरी नेलपॉलिश तयार करण्याचे साहित्य -
क्लिअर नेलपॉलिश अथवा व्हाईल नेलपेंट
तुम्हाला हवा असलेल्या रंगाची आयशॅडो
कॉटन इअर बड
पेपर
तुमच्या फेव्हरेट शेडची नेलपेंट कशी तयार कराल -
क्लिअर नेलपेंट अथवा व्हाईट नेलपॉलिशची बॉटल थोडी रिकामी करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या शेडची नेलपेंट त्यात तुम्हाला तयार करता येईल.