आज नाही.. उद्या डाएट करेन म्हणत म्हणत वजन कमी करण्यासाठी करु पाहणारे डाएट आपल्याकडून काही होत नाही. पण निरोगी आरोग्य आणि परफेक्ट फिटिंगचे कपडे हवे असतील तर डाएट हे करायलाच हवे तरच तुम्ही करत असलेल्या जीमचा तुम्हाला योग्य फायदा मिळतो. तुम्हीही जीमची मोठ्ठी फी भरली असेल किंवा फिटनेस मनावर घ्यायचे ठरवले असेल तर तुम्हाला डाएटची सुरुवात मनावर घ्यायला हवी. डाएची सुरुवात करताना नेमक्या काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्यादेखील जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला डाएट सुरु केल्याची जाणीवही होणार नाही आणि तुम्हाला भूकही लागणार नाही.
डाएटची सुरुवात ही मिल्सच्या विभाजनातून होत असते. सकाळचा नाश्ता, दुसरा ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचे जेवण या चार मिल्समध्ये तुम्ही तुमचे जीवन विभागून घ्या. म्हणजे तुम्हाला आपोआपोच योग्य खाण्याची सवय लागेल. अशा पद्धतीने जर तुम्ही जेवणाचे विभाजन करा त्यामुळे तुम्ही आपोआप डाएट सुरु करत आहात हे लक्षात येईल. तुम्हाला सकाळच्या नाश्त्यानंतर एकदम सगळे जेवण्याची सवय असेल तर ही सवय वजनवाढीसाठी हानिकारक ठरु शकते. पण असे जेवणाचे नियोजन हे एक प्रकारे डाएट असते.
वजन वाढण्यासाठी कारणीभूत असलेली गोष्ट म्हणजे साखर. जर तुम्ही साखर नियंत्रणात आणली तर तुम्हाला वजन कमी करणे आणि डाएट करणे सोपे जाईल. अनेकदा डाएटमध्ये साखर किंवा गोड पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. असा सल्ला दिल्यानंतर लगेचच तो पाळला जाईल याची शाश्वती नसते. त्यामुळेच हळुहळू तुम्ही साखर काढून कमी करा. चहा, कॉफी, बिस्कीट, चॉकलेट तुम्ही थोडे थोडे कमी करा. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही.
स्नॅक्स हे जरी डाएटमध्ये खाल्लेले चालत नसले तरी देखील त्याची चव तोंडावर रेंगाळत राहते. अशावेळी जर पोट रिकामे राहिले तर मात्र तुम्हाला ते खाण्याची इच्छा होऊ लागते. फायबर हे पोटभरीचे असते. पोट भरलेले असेल तर तुम्ही डाएट केले असे मुळीच जाणवत नाही. फायबरचे प्रमाण शरीरात हवे असेल तर तुम्ही डोसा, फळ यांचा समावेश डाएटमध्ये करा. त्यामुळेही तुम्हाला भूक लागणार नाही.
पाणी पिणे हे शरीरासाठी चांगले असते. वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भरपूर पाणी प्या. जर तुम्हाला चुकिचे काही खायची इच्छा झाली असेल तर अशावेळी एक ग्लास पाणी प्या. एकदम भूक जाणार नाही. पण थोड्यावेळाने तुम्हाला सवय होईल. जर तुम्हाला पाणी प्यायचे नसेल तर तुम्ही नारळाचे पाणी प्या. त्यासोबत असलेली शहाळी देखील पोट भरीचे काम करतात आणि वजन कमी करण्यासोबतच त्वचा चांगली करण्याचे काम करते.
वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे गोलो डाएट
अगदी पहिल्यादिवशी डाएट होईलच असे शक्य नाही. कारण डाएटमध्ये रुळायला फार वेळ लागतो. तुमच्याकडून डाएट का होत नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही जितकं जमेल तेवढ डाएट करा. आधी एक मिल आणि त्यानंतर आणखी दुसरे किंवा दिवसभरातील वेगवेगळे मिल फॉलो करायचा प्रयत्न करा.तुम्हाला नक्कीच त्याचा परिणाम जाणवेल.
आता डाएट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला डाएट करणे बरे पडेल.