दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी या ट्रिक्स येतील कामी

दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी या ट्रिक्स येतील कामी

उन्हाळ्याच्या या दिवसात स्वत:ला हायड्रेट ठेवणे हे फारच गरजेचे असते. जर शरीराल योग्य आणि मुबलक प्रमाणात हायड्रेशन नसेल तर शरीर थकल्यासारखे होते. काहीही करण्याची इच्छा राहात नाही. कामातून मन उडून गेल्यासारखे होते. अगदी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत काहीही करावे अशी इच्छा होत नाही. तुम्हालाही हा उन्हाळा काहीही करु नये असा झाला आहे. दिवसभर पडून राहावे असे तुम्हालाही वाटत असेल तर तुमच्या शरीराला हायड्रेशनची गरज आहे. हे हायड्रेशन तुम्हाला काही सोप्या सोप्या गोष्टीतून मिळवता येईल. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसात हायड्रेट राहण्यासाठी नेमक्या कोणत्या ट्रिक्स येतील कामी

गुलाबी ओठांसाठी करा DIY लिप स्क्रब

कलिंगड वर्गातील फळ

 कलिंगड, खरबूज अशी फळ या दिवसात बाजारात खूप येतात. ही फळ खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले पाणी मिळते. पाण्याने जी तहान भागत नाही ती तहान या फळांनी भागते त्यामुळे शरीराला उर्जा देण्याचे काम करते. दिवसातून ज्यावेळी तुम्हाला शक्य असेल त्यावेळी तुम्ही ही फळ खा. तुम्ही काही काळासाठी जेवण नाही केले तरी चालू शकते किंवा जेवण कमी केले तरी चालू शकेल. पण अशी फळ ही तुमचे पोट भरण्यासाठी आणि शीराराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेशी असतात. त्यामुळे तुम्ही ही अशी पाणीदार फळ खा आणि हायड्रेट राहा 

पाणी पिण्यासाठी लावा अलार्म

 तुम्ही दिवसातून किती पाणी पिता हे तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्ही जितके पाणी जास्त प्याल तितके तुमच्या शरीरासाठी चांगले असते.  पाणी पिण्याची खूप जणांना सवय नसते किंवा त्यांना तहान लागली आहे ही जाणीवही होत नाही. तुम्हीही या पैकीच एक असाल तर तुमच्या फोनमध्ये तुमच्या फायद्यासाठी पाण्याचे अॅप डाऊनलोड करुन घ्या. कारण अशा अॅपमधून तुम्हाला किती पाणी पिता याचा अंदाज येईल. या अॅपमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरात एकूण किती पाणी आहे हे कळेल. 

लिंबाचा रस

लिंबू हे व्हिटॅमिन C ने युक्त असे फळ फारच फायद्याचे असते शरीराला थकवा आला असेल किंवा पोटात बरे नसेल तर लिंबू खाण्याचा सल्ला दिला जातो. लिंबाच्या सेवनामुळे तुम्हाला लगेचच तरतरी येते. लिंबाचा रस हा उन्हाळ्यात एका अमृतासारखा आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला खूप बरे वाटेल. लिंबाच्या रसात पुदीना घातला तरी देखील तुम्हाला त्यापासून आराम मिळू शकते. जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि या दिवसात तुम्हाला व्यायाम करण्याची मुळीच इच्छा होत नसेल तर तुम्ही लिंबाचा रस मस्त पुदीना घालून प्या त्यामुळे तुम्हाला थोडी तरतरी येईल आणि काम करण्याची इच्छाही होईल.

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या महत्त्वाच्या खास आयुर्वेदिक टिप्स

या चुका टाळा

जर तुम्हाला या काळात काही टाळायचे असेल तर तळलेले आणि तिखट पदार्थांचे सेवन टाळा. असे पदार्थ पचण्यास हे फार कठीण असतात त्यामुळे असे पदार्थ अजिबात खाऊ नका. जर तुम्हाला नॉनव्हेज खायचे असेल तर तुम्ही त्यासोबत भरपूर सलाद घ्या त्यामुळे तुमच्या पोटाला नक्कीत आधार मिळेल. शिवाय तुम्हाला अन्न पचण्यासही मदत मिळेल.
उन्हाळ्यात काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला दिवसभर हायड्रेट राहत येईल.

उन्हाळ्यात सतत होत असेल डोकेदुखीचा त्रास, वापरा घरगुती उपाय