लाँग शर्ट आहे सध्याचा नवा ट्रेंड, अशी करा स्टायलिंग

लाँग शर्ट आहे सध्याचा नवा ट्रेंड, अशी करा स्टायलिंग

उन्हाळा आला की बाजारात समर सीझनचे कपडे यायला सुरुवात होते. वॉर्डरोब अपडेट करण्याचा तुमचा विचार असेल तर यंदा तुम्ही लाँग शर्टचा पर्याय निवडा. कॉटन मटेरिअलमध्ये असलेले हे ओव्हरसाईज शर्ट दिसायला फारच चांगले दिसतात. तुमची शरीरयष्टी कशीही असली तरी देखील तुम्हाला हा शर्ट चांगला दिसू शकतो. लाँग शर्टची स्टाईल तुम्हाला नेमकी कशी करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घेऊया या काही सोप्या स्टायलिंग टिप्स

लग्नासाठी निवडा सोन्याच्या लेटेस्ट नेकलेस डिझाईन्स

लाँग शर्ट निवडताना

Instagram

लाँग शर्ट हे कॉटन, लिनन आणि सिथेंटिक अशा वेगवेगळ्या फॅबरीकमध्ये मिळतात. खास उन्हाळ्यासाठी यामध्ये तुम्हाला पांढरे, स्काय ब्लू, गुलाबी असे लाईट आणि पेस्टल रंग मिळतात.जर तुम्ही खास उन्हाळ्यासाठी हे घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने लाईट आणि पेस्टल रंग निवडू शकता. जे दिसायला फारच सुंदर आणि उत्तम दिसतात. लाँग शर्टमध्ये वेगवेगळ्या साईज येतात. त्यामध्ये लाँग आणि शॉर्ट असे वेगवेगळे प्रकार येतात. जे तुम्ही ट्राय करु शकता. 

डीप नेक ब्लाऊजची फॅशन करायची असेल तर जाणून घ्या महत्वाच्या टीप्स

स्टायलिंग टिप्स

वेगवेगळ्या शरीरयष्टीनुसार लाँग शर्टची फॅशन करणे हे गरजेचे असते. त्यामुळे वेगवेगळ्या शरीरयष्टीनुसार कशापद्धतीने स्टायलिंग करता येईल ते वाचा.

 उंची कमी असणाऱ्यांसाठी
उंची कमी असणाऱ्यांना बरेचदा खूप लांब शर्ट घालता येत नाही. जर तुम्हाला असे लाँग शर्ट घातल्यामुळे उंची जास्त वाढली असेल वाटत असेल तर तुम्ही लाँग शर्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने घालू शकता. तुम्हाला लाँग शर्टचा उपयोग हा वनपीस म्हणूनही करता येऊ शकतो. त्यामुळे नुसता एक बेल्ट घालून तुम्ही हा ड्रेस म्हणून घालू शकता. जर तुम्हाला जीन्ससोबत हा शर्ट घालायचा असल तर तुम्ही त्याखाली टाईट जीन्स घाला. नॅरो बॉटम असलेल्या जीन्सवर त्या अधिक चांगल्या दिसतात. 

 जाड असणाऱ्यांसाठी
तुम्ही जाड असलात तर तुमच्यासाठी ही फॅशन कॅरी करावी अशी आहे. लुझ आणि हे लाँग शर्ट तुमची पर्सनॅलिटी खुलवण्यास मदत करतात. त्यामुळे तुमची जाडी दिसू येत नाही. तुम्हाला स्ट्रेट फिट बॉटम असलेल्या पँटसोबत त्या चांगल्या दिसतात. लाँग स्लिव्हजमध्ये तुम्हाला अधिक चांगले आणि आकर्षक दिसायचे असेल तर तुम्ही लाँग स्लिव्हज फोल्ड करु शकता. गळ्यात नेकलाईन नजीक असलेल्या चेन घातल्या की त्या अधिक चांगल्या दिसतात. 

 

Instagram

बारीक मुलींसाठी
बारीक मुलींना हा शर्ट कॅरी करताना फार विचार करायची गरज नाही असे वाटत असेल तर असे मुळीच नाही. कारण जर तुम्ही खूप बारीक असाल तर तुम्हाला असे ओव्हरसाईज शर्ट खूप मोठे दिसू लागतात. त्यामुळे तुम्ही ते घालताना खूप सैल निवडू नका. लांब निवडले तर चालू शकेल. त्याचा वनपीस करुनही तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला तसे करायचे नसेल तर तुम्ही टाईट जीन्स घाला.  त्यामुळे तो तुम्हाला चांगला दिसू शकतो. 

उंच मुलींसाठी 
जर तुम्ही उंच असाल तर तुम्हाला ही फॅशन करताना फार टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण तुम्ही अगदी सहज ही फॅशन करु शकता. ही लो बॉटम किंवा बेलबॉटम अशापद्धतीच्या पँटही तुम्ही निवडू शकता. ज्या तुम्हाला अधिक उठून दिसतील. 


आता लाँँग शर्टची खरेदी करा आणि यंदाचा समर मस्त स्टायलिस्ट घालवा.

ऋतू कोणताही असो 'या' गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या

Beauty

Makeup Blender

INR 700 AT MyGlamm