घराच्या सजावटीत असा करा आरशाचा उपयोग

घराच्या सजावटीत असा करा आरशाचा उपयोग

घराची सजावट हा सर्वांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण जगभरात कुठेही गेलं तरी हवा तसा निवांतपणा आपल्याला फक्त आपल्या घरातच मिळतो. त्यामुळे प्रत्येकाला आपलं घर आकर्षक आणि सुंदर दिसावं असं वाटत असतं. तुमचं घराचा आकार कसाही असला तरी फक्त अंतर्गत सजावटीने तुम्ही घराचा चेहरा मोहरा बदलू शकता. यासाठी घराच्या सजावटीत आरशाचा वापर करणं नक्कीच फायद्याचं ठरेल. जाणून घ्या घराच्या सजावटीत आरशाचा वापर नेमका कसा करावा. 

आरसा लावण्यासाठी योग्य जागा ठरवा

चेहरा पाहण्यासाठी, मेकअप करण्यासाठी, कपडे चेंज करताना, लुक ठरवण्याासाठी अशा अनेक गोंष्टींसाठी रूममधील आरशात आपण सतत डोकावत असतो. काहीही कारण नसताना दिवसभरात कितीतरी वेळा आरशात चेहरा पाहिला जातो. म्हणूनच घरात आरसा योग्य ठिकाणीच असायला हवा. तुमच्या ड्रेसिंग टेबल, बाथरूम अथवा वॉर्डरोबवरचा आरसादेखील योग्य ठिकाणी लावला तरच रूमला कॉम्पॅक्ट लुक मिळतो. तुम्ही बेडरूमप्रमाणेच तुमच्या लिव्हिंग रूम अथवा किचनमध्ये आरशाचा वापर करू शकता. रूमची  संपूर्ण भिंत आरशाची केल्यामुळे तुमचं घर लांबच लांब आणि आलिशान वाटू शकतं.

लिंव्हिंग रूममध्ये आरशाचा वापर करताना

घरात येणारी व्यक्ती सर्वात आधी हॉलमध्ये बसते. बऱ्याचदा लोक लिव्हिंग रूममधूनच घराबाहेर जातात. त्यामुळे तुमचं घर आतून नेमकं किती मोठं अथवा प्रशस्त आहे हे फारसं कुणी पाहत नाही. थोडक्यात घराच्या रचनेत तुमची लिव्हिंग रूम सर्वात महत्त्वाचा असते. जर तुमची लिव्हिंग रूम लहान असेल तर तुम्ही आरशाचा वापर करून तुम्ही ती मोठं आणि प्रशस्त करू शकता. काचेचा अथवा आरशाचा वापर केल्यामुळे घराला एक क्लासिक लुक मिळतो. घराच्या सजावटीत असा सुंदर बदल करण्यासाठी या टेकनिकचा जरूर वापर करायला हवा. यासाठी एखाद्या भिंतीला, सजावटीमध्ये अथवा एखाद्या फर्निचर युनिटवर आरशाचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. 

सिलिंगवर सुद्धा करू शकता आरशाचा वापर

बेडरूमच्या सिलिंगलादेखील तुम्ही आरसा लावू शकता. कारण बेडरूम ही प्रत्येकासाठी खास असते. त्यामुळे बेडरूममध्ये थोडं रोमॅंटिक वातावरण करण्यासाठी सजावटही खासच असायला हवी. सिलिंगमध्ये  काच आणि आरशाचा वापर केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील काही खास क्षण अधिक मनमोहक होऊ शकतात. मुंबईतील छोट्या छोट्या घरातही असं डेकोरेशन करून तुम्हाला एखाद्या मोठ्या आणि आलिशान बेडरूममध्ये राहण्याचा अनुभव मिळू शकतो.

आरसा... घर प्रकाशित करण्याचा सोपा मार्ग

आरसा लावण्याचा एक आणखी एक फायदा असा की आरशामध्ये प्रकाश किरणं परावर्तित करण्याची क्षमता असते. ज्यामुळे जरी तुमच्या घरात प्रकाश कमी येत असेल तरी तुम्ही आरसा लावल्यामुळे तुमचं घर प्रकाशित वाटू शकतं. खिडकी अथवा दरवाज्याच्या अगदी समोर सजावटीमध्ये आरशाचा वापर केल्यास दिवसभर तुमच्या घरात सुर्याची किरणं परावर्तित होऊ शकतात. आजकाल उंच उंच इमारतींमुळे पुरेशी सुर्यकिरणे घरात येत नाही. अशा वेळी ही टेकनिक वापरून तुम्ही तुमचं घर दिवसा प्रकाशित करू शकता. 

घराची सजावट करणारा तज्ञ्ज डिझायनर नेहमी घर प्रकाशित करण्यासाठी, घरात नाट्यमय वातावरण निर्माण करण्यासाठी, घराचा आकार वाढण्यासाठी आणि दोन गोष्टींना जोड देण्यासाठी आरशाचा वापर करतो. त्यामुळे घरात आरसा सजावटीसाठी वापरण्यापूर्वी अशा तज्ञ्जांची मदत घ्या. कारण चुकीच्या ठिकाणी आरसे लावण्यामुळे तुमच्या घराचा लुकच बदलू शकतो. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Spray

INR 199 AT MyGlamm