गोड पदार्थांत का केला जातो सुकामेव्याचा वापर

गोड पदार्थांत का केला जातो सुकामेव्याचा वापर

दिवाळीचा फराळ तयार करायला सगळीकडे  सुरूवात झाली आहे. सणसमारंभात गोड पदार्थ आवर्जून केले जातात. दिवाळीतील लाडू, करंजी असो किंवा नेहमीची खीर, बासुंदी, हलवा, बालुशाहीची रेसिपी असो या गोड पदार्थांमध्ये सुकामेवा मुक्तहस्ताने वापरला जातो. सुकामेव्याने या पदार्थांची सजावटही केली जाते. सुकामेवा हा गोड पदार्थांमध्ये वापरल्यामुळे त्या पदार्थातील पौष्टिक मुल्ये वाढतात. बदाम, काजू, पिस्ता, मनुका हा सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. शिवाय दिवाळी ही नेहमी थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजेच हिवाळ्यात येते. या मौसमात सुकामेवा खाण्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. दिवाळीत एकमेकांना फराळाप्रमाणेच सुकामेवादेखील भेट स्वरूपात दिला जातो. यासाठीच जाणून घ्या सुकामेव्याचे हे आश्चर्यकारक फायदे

बदाम -

बदाम हा सुकामेव्यातील असा प्रकार आहे जो तुम्ही खाणं मुळीच टाळू शकत नाही. कारण  याचे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चांगलेच फायदे मिळतात. बदामात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.  ज्याचा परिणामुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य सुरळीत चालते. शिवाय वजन नियंत्रणात राहण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दररोज बदाम खायलाच हवे. गोड पदार्थांत बदामाचा वापर केल्यामुळे तुम्हाला हे फायदेदेखील मिळतात.

बदामाचा उपयोग कराल तर मिळेल सुंदर त्वचा आणि निरोगी आरोग्य (Benefits Of Almond In Marathi)

Shutterstock

काजू-

काजू हा सुकामेव्याचा प्रकार कोणाला आवडणार नाही असं मुळीच होणार नाही. कारण ते पाहताच दोन-चार तोंडात आपोआप जातातच. काजू  थोडेसे उष्ण असल्यामुळे ते बेतानेच खावेत. मात्र प्रमाणात खाल्यास त्याचे चांगले फायदे नक्कीच मिळू शकतात. हिवाळ्यात गोड पदार्थांमध्ये काजू आवर्जून वापरले जातात. कारण त्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. भरपूर प्रोटिन्स आणि व्हिटॅमिन बी असल्यामुळे ते ह्रदयाच्या आरोग्यासाठी नक्कीच उत्तम आहेत. 

Shutterstock

पिस्ता -

पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, अॅंटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी, शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, मधूमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, त्वचेचा  पोत सुधारण्यासाठी, पचनशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, इंन्स्टंट उर्जा मिळण्यासाठी तुम्ही पिस्ता जरूर खायला हवा. पिस्त्याचा रंगदेखील सुरेख असल्यामुळे पदार्थांचा रंग आणि सजावट करणे सोपे जाते. यासाठी दिवाळीच्या गोड पदार्थांमध्ये पिस्ता आवर्जून वापरला जातो. 

पिस्त्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहित हवेत - Health Benefits Of Pistachios (Pista) In Marathi

Shutterstock

मनुका -

मनुकांचा वापर आपण नेहमी गोडाधोडाच्या अन्नपदार्थात करतो. शिरा आणि लाडू यांमध्ये  मनुका आवर्जून वापरल्या जातात. कारण मनुकांमध्ये आरोग्यदायी गुणधर्म असतात. द्राक्ष सुकवून मनुका तयार केल्या जातात. त्यामुळे या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात लोह, व्हिटॅमिन्स, मिनरल्स  हे पोषक घटक असतात. आर्युवेदानुसार रात्री मूठभर काळ्या मनुका पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी चावून खा असं सांगितलं जातं.

अक्रोड -

अक्रोड केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिममध्ये केला जातो. अक्रोडामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते. याशिवाय अक्रोडामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. याशिवाय अक्रोडाचे तेलदेखील त्वचा आणि केसांचे सौदर्य वाढविण्यासाठी वापरले जाते. तसंच अक्रोडाच्या कच्चा फळापासून मुंरबा, चटणी, सरबत तयार केले जाते. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याामुळे अनेक आरोग्य समस्या कमी होतात. ह्रदयाच्या आरोग्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदू तल्लख राहण्यासाठी, केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही दररोज अक्रोड खाणे आरोग्यासाठी हिताचे आहे. 

फक्त खाण्यासाठीच नाहीतर अक्रोड आहे सौंदर्यदायी (Benefits Of Walnut In Marathi)

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.