लग्नासाठी निवडा सोन्याच्या लेटेस्ट नेकलेस डिझाईन्स

लग्नासाठी निवडा सोन्याच्या लेटेस्ट नेकलेस डिझाईन्स

लग्न म्हटले की, दागिन्यांची खरेदी आलीच. विशेषत:मुलीचे लग्न असेल तर तिच्या अंगावर घालण्यासाठी सोन्याचे दागिने हे लग्नाच्या काही काळ आधी घडवायला घेतले जातात. तुमचेही लग्न येत्या काही महिन्यात होणारे असेल आणि तुम्हालाही काही हटके आणि लेटेस्ट असे नेकलेस किंवा हारांच्या डिझाईन्स बनवायच्या असतील. तर आम्ही अशा काही हटके आणि पारंपरिक डिझाईन्स शोधून काढल्या आहेत ज्या कधीही जुन्या होणार नाहीत आणि आऊट ऑफ फॅशनही जाणार नाहीत. चला तर जाणून घेऊया सोन्याच्या हारात घडवता येतील अशा काही सोन्याच्या लेटेस्ट नेकलेस डिझाईन्स

लग्नात सुंदर दिसण्यासाठी सर्व नववधूंनी फॉलो कराव्यात या हेल्थ टिप्स

ठुशी
ठुशी ही अशी चोकर डिझाईन आहे जी कधीच जुनी होऊ शकत नाही. सोन्याचे मणी ओवून हा हार केला जातो. गळ्यालगत असलेला हार तुमच्या पारंपरिक साडीवर किंवा एखाद्या वेस्टर्न आऊटफिटवर चांगलाच उठून दिसतो. जर तुम्हाला काहीतरी वेगळं पण तरीही पारंपरिक असं काही बनवायचं असेल तर तुम्ही असा हा नेकलेस बनवू शकता. यामध्येही तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतील. तुम्ही जर हार गुंफून घेणार असेल तर तुम्हाला तो जरा महाग पडेल. कारण सोन्याचे मोती बनवून ते गुंफले जातात. त्यामुळे ते थोडे कलाकुसरीचे आणि मेहनतीचे असे काम असते. साधारण 10 ग्रॅमपर्यंत हाराचा हा असा प्रकार तुम्हाला करता येऊ शकतो. 

 शाही हार 

शाही हार हा हाराचा खरंच शाही असा प्रकार आहे. जो तुमच्या दागिन्यांची शान वाढवू शकतो. हा हार तुम्ही अगदी १० ग्रॅमपासून ते ४० ग्रॅमपर्यंत बनवता येतात. जर तुम्हाला शाही हाराच्या वेगवेगळ्या डिझाईन्स हव्या असतील तर तुम्हाला त्यामध्ये कमळ, गुलाब आणि मोती असे वेगवेगळे प्रकार वापरुन एखादी लेटेस्ट डिझाईन करता येऊ शकेल. तुमचे बजेट पाहून तुम्ही या हाराची डिझाईन निवडा. 

लग्नसराईसाठी खास कानातले डिझाईन - कानातले झुमके डिझाईन

 

लक्ष्मी हार  

आता हा हार फार टिपिकल राहिलेला नाही. तुम्हाला लक्ष्मी किंवा सरस्वती डिझाईन असलेल्या वेगवेगळ्या हारांच्या डिझाईन मिळतात. ज्यांच्यामध्ये तुम्हाला चोकर किंवा  लांब नेकलेस बनवता येतात. आता वेगवेगळ्या रेंजनुसार तुम्हाला हे हार बनवता येतात. बसलेल्या लक्ष्मी या चोकरमध्ये खूप चांगल्या दिसतात. गळ्यालगत असलेले हे दागिने तुम्ही हमखास घालायला हवे. कारण ते तुमच्या कोणत्याही साडीवर खूप चांगले उठून दिसतात.

नववधूसाठी परफेक्ट आहेत हे स्टायलिश 'ब्रायडल फुटवेअर' (Footwear For Bride In Marathi)