प्लस साईज फॅशनबाबत तुमच्या मनात असू शकतात हे गैरसमज

प्लस साईज फॅशनबाबत तुमच्या मनात असू शकतात हे गैरसमज

बॉडीशेप ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा बॉडीशेप हा निरनिराळा असू शकतो. तुमचा बॉडीशेप कसाही असला तरी तुम्ही निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र अनेकांना त्यांचा बॉडीशेप आवडत नाही. कारण बऱ्याचदा बॉडीशेपवरून त्यांना अनेकांच्या टोमणे आणि नकारात्मक बोलण्याला सामोरं जावं लागतं. ज्यामुळे स्वतःच्या शरीराकडे  पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनच बदलतो. आज जगभरात बॉडीशेमिंगची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. यासाठीच सोशल मीडियावर #bodypositivity चा मेसेज पोहचण्याचे काम केले जात आहे.  या चळवळीत अनेक चांगल्या पद्धतीने जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला हवं आणि जो बॉडीशेप आहे तो स्वीकारत त्याला साजेशी फॅशन करायला हवी.   यासाठीच जाणून घेऊ या प्लस साईज बाबत अजूनही अनेकांच्या मनात कोणते गैससमज असू शकतात. 

तुम्ही क्रॉप टॉप कधीच घालू शकत नाही -

हा एक खूप मोठा गैरसमज आहे की प्लस साईजच्या मुली क्रॉप टॉप घालू शकत नाहीत. खरंतर क्रॉप टॉप हा एक कूल स्टायलिंग प्रकार आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पोटाच्या आकाराची लाज वाटत नसेल तर बिनधास्त क्रॉप टॉप घाला. फक्त याबाबत एकच गोष्ट लक्षात ठेवा क्रॉप टॉपसोबत नेहमी चांगली बॉटम पेअर करा. खरंतर एखाद्या ब्रंचसाठी डेनिम, लेदर स्कर्टसोबत क्रॉप टॉप कॅरी करणं हा एक छान पर्याय ठरू शकतो. पिकनिकला जाणार असाल तर मात्र क्रॉप टॉपसोबत शॉर्ट कॅरी करा. 

तुमच्या वॉर्डरोबसाठी ट्रेंडी क्रॉप टॉप्स - Trendy Crop Top Designs

instagram

जाडेपणा लपवण्यासाठी काळे कपडे घालायला हवे -

खरंतर जर तुम्हाला तुमच्या शरीरावर प्रेम असेल तर अशा टिप्स फॉलो करायची मुळीच गरज नाही. प्लस साईज मुलींना नेहमी काळ्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा लपवला जाऊ शकतो. मात्र तुम्हाला काळा रंग आवडत नसेल तर असं करू नका. काळा रंग आवडत असेल तर बिनधास्त काळ्या रंगाचे कपडे वापरा. पण जर असं नसेल तर कोणताही तुमच्या आवडीचा  रंग परिधान  करा. कारण तुमच्या आवडीचे कपडे घातले तरच तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी व्हाल. सुंदर दिसण्यासाठी मनातून आनंदी असणं जास्त गरजेचं आहे. 

काळा रंग नेहमीच का असतो ट्रेंडमध्ये, स्टायलिश दिसण्यासाठी जाणून घ्या कारण

instagram

सैल कपडेच प्लस साईजला सूट करतात -

आपण नेहमी अशा अनेक प्लस साईज मुलींना पाहतो ज्या अंग झाकण्यासाठी मुद्दाम सैल कपडे अथवा ओव्हर क्लोदिंग करतात. असं केल्यामुळे त्यांचा लठ्ठपणा लपवता येईल असं त्यांना वाटतं. मात्र तुम्हाला असं करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या साईझनुसार फिटिंगच्या कपड्यांमध्येही तितक्याच सुंदर दिसाल. फक्त ते व्यवस्थित फिटिंग केलेले असावेत. त्यामुळे वनपीस असो वा पार्टीवेअर तुमच्या साईझनुसार फिटिंगचे कपडे घाला. 

फेस्टिव्ह सीझनसाठी ट्राय करा जान्हवी कपूरचे हे देसी लुक

instagram

तुम्ही नवा ट्रेंड फॉलो करू शकत नाही -

कोणताही फॅशन ट्रेंड हा खास बॉडीशेपसाठी तयार केला जात नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास सध्या  सीक्वेन्सचा जमाना आहे. त्यामुळे कोणीही सीक्वेनची फॅशन करू शकतं. या फॅशन टेंडचा आणि बॉडीशेपचा काहीच संबध नाही. मात्र कोणताही नवा ट्रेंड आला की प्लस साईजच्या लोकांना वाटतं की हा आपल्यासाठी नाही. हे  चुकीचं आहे तुम्ही तुम्हाला आवडेला प्रत्येक फॅशन ट्रेंड ट्राय करायला हवा. फॅशन ट्रेंड हे फक्त सुडौल लोकांसाठी असतात असं नाही. तुम्ही त्या ट्रेंडला तुमच्या पर्सनल स्टाईलमध्ये ब्लेंड करू शकता. कारण तुम्हाला काय चांगलं दिसेल हे फक्त तुम्हीच ठरवू शकता इतर नाही. 

instagram

प्लस साईजच्या मुली बिकिनी घालू शकत नाही -

एकतर बिकिनी कोणी परिधान करावी आणि कोणी नाही हा प्रत्येकीचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकांनी उगाचच बिकिनी आऊटफिट फक्त सुडौल लोकांनी घालावा असा एक समज करून ठेवलेला आहे. तुमच्या शरीरावर  आणि पर्यायाने फॅशनवर फक्त तुमचाच हक्क आहे. त्यामुळे जर तुम्हाला बिकिनीमध्ये आरामदायक वाटत असेल तर बिचवर पिकनिकसाठी गेल्यावर बिनधास्त बिकिनी घाला. कारण फॅशनबल दिसण्यासाठी फक्त तुम्हाला काय वाटतं, काय आवडतं आणि तुम्हाला किती आरामदायक वाटतं हे गरजेचं आहे. लोक काय म्हणतात हे मुळीच नाही. 

Beauty

Tinted Perfection Brightening Banana Primer

INR 1,095 AT MyGlamm

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम