लग्न ठरलंय तर त्वचेची घ्या आधीपासूनच काळजी (Pre wedding skin care)

लग्न ठरलंय तर त्वचेची घ्या आधीपासूनच काळजी (Pre wedding skin care)

मे महिना आला की आजूबाजूला आपल्याला लगीनघाई सुरू झालेली दिसते. पण लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी नवरा आणि नवरीने अगदी आधीपासूनच आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी. लग्नात आपली त्वचा कशी दिसेल, त्वचा चमकदार दिसेल की नाही अथवा चेहरा उजळेल की नाही अशा अनेक चिंता असतात. आपण आपल्या लग्नात तयार होण्यासाठी उत्तम मेकअप आर्टिस्ट तर नक्कीच निवडू शकतो. पण तरीही तुम्ही आधीपासूनच त्वचेची काळजी घेतली (Pre wedding skin care) तर तुमची त्वचा निरोगी तर राहतेच शिवाय त्वचेवर मुरूमं, काळे डाग राहात नाहीत. लग्नाचे दिवस जसजसे जवळ येतात तसंतसं चेहऱ्यावर मुरूमं येण्याचं प्रमाण ताणामुळे वाढतं. त्यामुळे व्यवस्थित झोप घेणे, नियमित सतत पाणी पिणे, अँटिऑक्सिडंट्सने उपयुक्त व्यवस्थित डाएट पाळणे, नियमित स्पा आणि व्यायाम करणे तसंच योग्य स्किनेकेअर प्रॉडक्ट्सचा वापर करणे हा तुमच्या स्किन केअर रूटिनचा (Skin care routine) एक भाग असायला हवा. नक्की कशी ठेवावी त्वचा याची माहिती खास तुमच्यासाठी.

प्री वेडिंग स्किन केअर का आहे गरजेचे

प्री वेडिंग डाएट आणि फिटनेस प्लॅनप्रमाणे नवरी आणि अगदी नवऱ्यानेही प्री - वेडिंग स्किन केअर रूटीन पहिल्या दिवसापासून फॉलो करायला हवे. जेणेकरून लग्नाच्या दिवशी त्यांना चेहऱ्याबाबत कोणतीही तक्रार असू नये. हे रूटीन तुम्ही लग्न जर एक वर्ष आधी ठरलं असेल तर अगदी तिथपासूनच सुरू करायला हवे. त्यामुळे हे रूटिन नक्की कसं असावं याबाबत काही टिप्स (tips for pre wedding skin care) आपण जाणून घेऊया.

लग्नापूर्वी एक वर्ष

Freepik.com

लग्न ठरल्यानंतर जर एक वर्षाचा गॅप असेल तर तुम्ही तेव्हापासूनच आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्वचेच्या समस्या जसे मुरूमं, रॅश, सुरकुत्या अथवा कोरडेपणा या सगळ्यापासून तुम्हाला सुटका मिळते. या समस्या सुटण्यासाठी बराच काळ जावा लागतो. त्यामुळे अगदी एक वर्षापासून तुम्ही स्किनकेअर रूटीन पाळायला हवे. तुम्हाला सनस्क्रिन, आयक्रिम इत्यादी उत्पादनांचा वापर यासाठी करता येईल. याशिवाय नियमित स्वरूपात शरीराची मालिश करणे हादेखील त्वचेची काळजी घेण्याचा एक भाग आहे. 

5 मेकअप उत्पादने जे घेतात तुमच्या त्वचेची काळजी, वापरणे योग्य

लग्नाच्या 9 महिने आधी

लग्नाच्या नऊ महिने आधी, तुम्हाला तुमची जीवनशैली आणि तुमच्या सवयी नीट करून घ्यायला हव्यात. आपल्या खाण्याच्या सवयींचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. त्यामुळे योग्य आहार निवडावा जेणेकरून त्याचा योग्य परिणाम त्वचेवर होतो. योग्य डाएट चार्ट बनवा आणि याचे पालन करा. तुम्ही यासाठी हवं तर डाएटिशियनची मदतही घेऊ शकता. डाएटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि विटामिनसारखी पोषक तत्व समाविष्ट करून घ्या. त्वचा अधिक तरूण आणि निरोगी दिसण्यासाठी याची मदत होते.

संवेदनशील त्वचेसाठी ब्युटी टिप्स, अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

लग्नाआधी 6 महिने

Shutterstock

लग्नाच्या आधी सहा महिने असे असतात जेव्हा त्वचेला तणावमुक्त करण्यावर तुम्हाला भर द्यावा लागतो. डिस्ट्रेसिंगपासून ते ब्रेकआऊट्स नियंत्रित करण्यासाठी मदत मिळेल. तणावामुळे मुरूमं आणि त्वचा तसंच केसांच्या समस्या होतात. त्यामुळे नियमित स्पा आणि मालिश करत राहणं योग्य आहे. बाहेर जाऊन तुम्हाला हे करणे जमत नसेल तर तुम्ही घरच्या घरीही स्वतःसाठी थोडा वेळ काढून करायलाच हवे. 

लग्नाच्या 3 महिने आधी

लग्नाच्या तीन महिने आधी फेशियल करून घ्या. तुम्ही यावेळी लेजर हेअर रिमूव्हल, डर्मा रोलिंग, पील, मास्क आणि एक्सफोलिएशनसारख्या उपचारांचा विचार करू शकता आणि करून घेऊ शकता. तीन महिन्यांपूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेला अधिक काळजीपूर्वक हाताळायला सुरूवात करा. 

घरगुती सौंदर्यप्रसाधन वापरून घ्या त्वचेची काळजी - तज्ज्ञांचा सल्ला

Beauty

GLOW Iridescent Brightening Sheet Mask

INR 199 AT MyGlamm

लग्नाच्या एक महिना आधी

Shutterstock

आता मेकअप आणि हेअरस्टाईलची वेळ असते. नियमित स्वरूपात हेअर स्पा करणे गरजेचे आहे. रोज जास्तीत जास्त पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा आणि ताजेतवाने दिसण्यासाठी नियमित किमान 8 तास झोपणे अत्यंत आवश्यक आहे. 

लग्नाच्या दिवशी

लग्नाच्या दिवशी तणाव मेकअप या दोन्हीसाठी आपल्या मनाची तयारी असायला हवी. पण या दिवशी कोणतीही अलर्जी होणार नाही यासाठी आधीपासून त्वचेची काळजी घेत सर्व नीट पाहून घ्यायला हवे. या दिवशी सर्वात सुंदर दिसण्यासाठी वर्षभरापासून घेतलेली त्वचेची काळजी नक्की कामी येते.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक