अकाली टक्कल पडणे आणि केस गळतीच्या समस्यांमध्ये वाढ, तरूणाईपुढे पेच

अकाली टक्कल पडणे आणि केस गळतीच्या समस्यांमध्ये वाढ, तरूणाईपुढे पेच

अकाली टक्कल पडणे ही एक गंभीर समस्या असून दिवसेंदिवस अशा तक्रारींची वाढ होताना दिसून येत आहे. लॉकडाउनमध्ये  अशा समस्यांनी ग्रासलेली अनेक प्रकरण त्वचाविकार तज्ञांकडे उपचाराकरिता आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून केस गळतीसाठी सल्ला घेणार्‍या पुरुष आणि स्त्रियांमध्ये 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि गुगल सर्च ट्रेंडच्या एका वृत्तानुसार, ‘केस गळती’ सारखी समस्या गेल्या एका वर्षात 15 पटीने अधिक जास्त दिसून आली आहे. त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर सांगतात तरुण मुलांमध्ये टक्कल पडण्यामागचे तसेच लवकर केस गळण्यामागचे मूळ कारण म्हणजे वेळीच या समस्येकडे लक्ष न देणे होय. 25% पुरुषांमध्ये गुणसुत्र दोषांमुळे केस गळती सारखी समस्या आढळून येते. तर, 21 वय वर्षापूर्वीच ही केस गळतीची समस्या दिसून येते. काही किशोरवयीन मुलांमध्ये तर 15 ते 16 वयोगटतही केस गळण्यासारखी समस्या पहायला मिळते. 30 टक्के स्त्रियांमध्ये चाळीशीमध्ये टक्कल पडण्यासारखी समस्या दिसून येते तर बदलत्या जीवशैलीमुळे हल्ली विशीतील तरुणींमध्येही टक्कल पडण्यासारखी गंभीर समस्या आढळून आल्याचे वक्तव्य डॉक्टरांनी केले आहे. मात्र यावर QR678 थेरपी ठरतेय वरदान.

ताणतणाव आणि चुकीचा आहार मुख्य कारण

Shutterstock

डॉ. कपूर पुढे सांगितले की, हल्ली स्त्री-पुरुषांना वाढती स्पर्धा, भिती, चिंता, ताणतणाव आणि चूकीच्या आहार-विहाराच्या सवयी यामुळे केस गळतीची समस्या सारखी सतावत असल्याचे दिसून येते. तर थायरॉईड हार्मोन्सची पातळी कमी होणे किंवा विशिष्ट औषधांचा दुष्परिणाम, केसांच्या स्टायलिंग उत्पादनांचा अतिवापर, केस रंगविण्याकरिता रासायनिक उत्पादनांचा अति जास्त प्रमाणात वापर, जेल यांचा वापर आणि कौटुंबिक इतिहास पाहता अनुवंशिकरित्या देखील केस गळतीची समस्या उद्भवू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता उपचार सुरू करण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांना भेट देणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार अचूक उपचार करणे योग्य राहिल.

तरुणांमध्ये न्यूनगंड

गेल्या काही वर्षापासून सुरु असलेल्या वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे व्हर्च्युअल मिटींग्स, व्हिडिओ कॉल सारख्या पर्यायांचा वापर केला जातो. यावेळी आपल्या सहका-यांसोबत बोलताना विशेषतः व्हिडिओ कॉल दरम्यान दिसून येणारे टक्कल अनेक तरुणांमध्ये न्युनगंड निर्माण करत असून या साथीच्या काळात अनेक तरुण ही समस्या घेऊन त्वचारोग तज्ञांची भेट घेत असल्याचे आढळून आले. आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. आपले केस हे सौंदर्यात नेहमीच भर घालणारे ठरतात, मग अशा वेळी टक्कल पडण्यासारखी समस्या तुम्हाला चिंताग्रस्त करू शकते. मात्र अशा वेळी घाबरुन न जाता त्वचाविकार तज्ञांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचाराला सुरुवात केल्यास तुम्हाला टक्कल पडण्यासारख्या समस्येपासून दूर राहता येऊ शकते.

काय आहेत त्यामागची कारणे -

 - नियमितपणे केस न धुणे आणि टाळू स्वच्छ न ठेवणे

-    हेअर आहारात पोषणमुल्यांचा अभाव

-    गर्भधारणा

-    हार्मोनल असंतुलन

-    एंड्रोजेनेटिक अलोपेशिया म्हणजे आनुवंशिक कारणांमुळे अकाली टक्कल पडणे

-    तणावपूर्ण जीवनशैली

-    थायरॉईड आणि मधुमेह सारख्या दीर्घकालीन रोग

-    कर्करोग

-    स्टाईलिंग उत्पादनांचा अतिवापर

आवळा पावडरचा वापर करून थांबवा केसगळती

कशी होईल केसांची वाढ

Shutterstock

कोणत्याही धोकादायक प्रक्रियेविना केसांची वाढ कशी करता येईल याबाबत सविस्तर माहिती देताना डॉ. देबराज शोम, कॉस्मेटिक सर्जन अँड डायरेक्टर, द अ‍ॅस्थेटिक क्लिनिक सांगतात की, टक्कल पडणे थांबविणे, हेअर फोलिकल्स बरे करणे आणि केस गळती थांबविणे ही एक वेदनारहित पद्धत आहे. क्यूआर 678 पेप्टाइड्स, सजीवांच्या शरीरात निर्मार्ण होणारे द्रव्य, पोषकद्रव्ये आणि खनिजे यांचे मिश्रण आहे जे थेट टाळूमध्ये इंजेक्ट केले जाते. क्यूआर 678 हे फॉलिकल्सला आवश्यक पोषण देते आणि केसांच्या मुळांना घट्ट करून निरोगी केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. आपण काही थेरपीचेही वेदनारहित उपचार (प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी) केसांच्या मुळांना समृद्ध करण्यासाठी केसांच्या पेशीसमृद्धीसाठी रुग्णाच्या रक्तातील रिच प्लेटलेटचा वापर करते. 

आपण बाह्यरुग्ण प्रक्रिया म्हणून सहजपणे हे उपचार करू शकता आणि तात्काळ घरी जाऊ शकता. याकरिता तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील कामांमधून ब्रेक घेण्याची देखील गरज भासणार नाही. आपण आपल्या केसांची आवश्यकतेनुसार काळजी घेऊ शकता.

केसगळती रोखण्यासाठी घरच्या घरी बनवा शँपू, करा नैसर्गिक उपचार

या गोष्टी आवश्य करा-

Beauty

Tinted Perfection Brightening Banana Primer

INR 1,095 AT MyGlamm

-    आपले जीवन तणावमुक्त ठेवा

-    दररोज निरोगी आहार घेणे

-    आपल्या केसांच्या प्रकारानुसार आपले शैम्पू आणि कंडिशनर यांची निवड करा आणि नेहमीच आपले केस कोमट पाण्याने धुवा

-    आपल्या त्वचाविकार तज्ञास जीवनसत्त्वे, झिंक, बायोटिन आणि कोलेजेन असलेल्या पूरक घटकांसाठी विचारा

-    दररोज आपल्याला थोडासा सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करा

-    आपल्या केसांकरिता सौम्य उत्पादनांचा वापर करा आणि केसांमध्ये गुंता होण्यापासून रोखा

केसगळती थांबविण्यासाठी वापरा हॉट मलायकाच्या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक