सोशल मीडियावर मेकअप टुटोरिअलचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये मेकअपचे विविध प्रकार तर असतातच पण सध्या सेलिब्रेटी स्टाईल मेकअप खूप ट्रेंडमध्ये आहे. एखाद्या सेलिब्रेटींचा लुक हुबेहुब कसा तयार करायचा हे यामध्ये दाखवलं जातं. तुम्हालाही असा सेलिब्रेटी स्टाईल मेकअप करायचा असेल तर त्याआधी त्वचेला त्याप्रमाणे तयार करायला हवं. कारण सेलिब्रेटी स्टाईल मेकअपसाठी बऱ्याचदा फुल कव्हरेज देणाऱ्या मेकअप प्रॉडक्टचा वापर केला जातो. असा मेकअर त्वचेवर जास्त काळ टिकतो. त्यामुळे मेकअपचा प्रॉडक्टचा संबध तुमच्या त्वचेसोबत बराच काळ येतो. यासाठीच असा मेकअप करण्यापूर्वी त्वचेची योग्य निगा राखायला हवी. म्हणूनच या टिप्स फॉलो करा, त्वचेची काळजी घ्या आणि बिनधास्त करा सेलिब्रेटी स्टाईल मेकअप
कोणताही मेकअप करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ असणं गरजेचं आहे. नाहीतर मेकअप प्रॉडक्ट सोबत तुमच्या त्ववचेवरील धुळ, माती, प्रदूषणही तुमच्या त्वचेत मुरू शकतं. यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश अथवा क्लिंझर निवडा. नाहीतर तुमची त्वचा मेकअप करण्याआधीच अधिक तेलकट अथवा अधिक कोरडी होऊ शकते.
मेकअप करण्याआधी त्वचेवर नेहमी बर्फ चोळावा. पंधरा मिनिटं आधी बर्फाने त्वचेला मालिश केल्यामुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स योग्य पद्धतीने बंद होतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेत मेकअपचे प्रॉडक्ट मुरत नाहीत. शिवाय स्किन पोअर्स बंद झाल्यामुळे त्वचेवरील मेकअपही जास्त काळ टिकण्यास मदत होते. अती घाम अथवा कोरडेपणामुळेही तुमचा मेकअप खराब होऊ शकतो.
सेलिब्रेटी स्टाईल अथवा कोणताही हेव्ही मेकअप करण्यापूर्वी तुमची त्वचा हायड्रेट असणं गरजेचं आहे. कारण मेकअप केल्यावर त्वचेतील ओलावा कमी झाला तर तुमचा मेकअप खराब होतो आणि त्वचेचंही नुकसान होतं. यासाठीच दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्या. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राही आणि त्वचेतील पीएचचं संतुलन बिघडणार नाही.
जर तुम्ही हेव्ही मेकअप करणार असाल तर त्याआधी तुमची त्वचा मॉईश्चरायझर असणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे मेकअप केल्यावरही त्वचेचं नुकसान होणार नाही. यासाठी मेकअप करण्याआधी त्वचा स्वच्छ केल्यावर चांगलं मॉईस्चराईझर त्वचेला लावा. त्वचेवर हलक्या हाताने मालिश करून ते तुमच्या त्वचेत मुरवा. ज्यामुळे तुमच्या त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारेल आणि त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळेल. यामुळे मेकअप केल्यावरही तुमच्या त्वचेचा नैसर्गिक ग्लो कमी होणार नाही.
मेकअपसाठी त्वचेची योग्य ती काळजी घेतल्यावर सर्वात आधी प्रायमर लावा आणि मगच मेकअपला सुरूवात करा. कारण प्रायमर मुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स बंद होतात, त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स झाकले जातात. शिवाय प्रायमर च्या लेअर मुळे मेकअपचा तुमच्या त्वचेचं वाईट परिणाम होत नाही.
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या मेकअप टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला नेमका काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्यासोबत सेलिब्रेटी स्टाईल मेकअपसाठी ट्राय करा मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट