धूम्रपानामुळे कर्करोगासह प्रजनन क्षमता घटण्याच्या प्रमाणातही वाढ – डॉक्टरांचा इशारा

धूम्रपानामुळे कर्करोगासह प्रजनन क्षमता घटण्याच्या प्रमाणातही वाढ – डॉक्टरांचा इशारा

धूम्रपान केल्याने आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. फुफ्फुस, अन्ननलिका, तोंड, घसा, पोट आणि गुदाशय आणि वंध्यत्वासारख्या समस्या उद्भवतात. विविध प्रकारच्या कर्करोगासह हृदय रोग, स्ट्रोक तसेच फुफ्फुसीय आजाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कर्करोगाचा त्रास होऊ नये व प्रजनन क्षमता वाढावी याकरिता धूम्रपान सोडणे ही काळाची गरज आहे. धूम्रपान करणार्‍यांची संख्या वाढत चालली असून ही वाढ चिंताजनक ठरत आहे. लोक बर्‍याचदा त्याच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करतात आणि भविष्यात त्याबद्दल खेद करतात. धूम्रपान केल्याने शरीराच्या जवळजवळ सर्व अवयवांवर वाईट परिणाम होतो. धुम्रपान हे हृदयरोगा व्यतिरिक्त, स्ट्रोक, फुफ्फुसाचे रोग, मधुमेह आणि एम्फिसीमा आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटीससह क्रॉनिक अवरोधक फुफ्फुसीय रोग (सीओपीडी) तसेच कर्करोगास देखील आमंत्रण देते.

#WorldCancerDay - महिलांमध्ये वाढतोय स्तनांचा कर्करोग

अनेक आजारांना आमंत्रण

freepik.com

धुम्रपानाच्या व्यसनामुळे फुफ्फुसाचा, अन्ननलिका, स्वरयंत्र, तोंड, डोके आणि मान, घसा, मूत्रपिंड, मूत्राशय, यकृत, स्वादुपिंड, पोट, गर्भाशय,  गुदाशय कर्करोगाचा सामना करावा लागू शकतो. कारण तंबाखूच्या धुरामध्ये एसीटाल्हाइड, सुगंधित अमाईन, आर्सेनिक आणि रसायने असतात. तसेच कॅडमियम ज्यामुळे अकाली मृत्यू देखील. या सा-या आजारांपासून लांब रहायचे असल्यास तसेच निरोगी आयुष्याकरिता धूम्रपानाचे व्यसन सोडण्याशिवाय कोणताच उपाय नाही अशी प्रतिक्रिया डॉ. शिवप्रकाश मेहता, सल्लागार ईएनटी आणि हेड नेक कॅन्सर सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा पुणे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. मेहता सांगतात की निरोगी जीवनशैली स्वीकारणे आणि धूम्रपानासारखे व्यसन सोडणे ही काळाची गरज आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा समावेश असलेल्या धूम्रपान न करणार्‍या थेरपीची निवड करा जी एखाद्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरते आणि जी विकृती आणि मृत्यु दर कमी करते. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे किंवा केमोथेरपी आणि इतर उपचार घेत आहेत त्यांनाही धूम्रपान सोडण्याचा फायदा होईल कारण यामुळे कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका कमी होऊ शकतो.

रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचे प्रमाण अधिक

बाळ होण्यास येतात अडथळे

Beauty

WIPEOUT Sanitizing Spray

INR 199 AT MyGlamm

पुणे येथील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. निशा पानसरे यांनी सांगितले की, धूम्रपान केल्याने एखाद्याच्या पुनरुत्पादक प्रणालीला त्रास होतो. हे पुरुष आणि स्त्रिया दोन्हीमधील प्रजननक्षमतेस हानीकारक ठरते. ज्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. जे नियमितपणे धूम्रपान करतात त्यांच्यामध्ये गरोदरपणातील गुंतागुंत दिसून येते. सिगारेटच्या धुरामध्ये निकोटीन, सायनाइड आणि कार्बन मोनोऑक्साइड सारख्या इतर रसायने देखील असतात ज्यामुळे अंड्यांचा नाश होण्याची शक्यता असते. बर्‍याच स्त्रियांना रजोनिवृत्ती आणि गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग होऊ शकतो. धूम्रपान केल्याने गर्भपात, एक्टोपिक गर्भधारणा, बाळांचे कमी वजन, जन्माजात दोष आणि क्रोमोसोमल विकृती, अकाली प्रसूती आणि अचानक मृत्यू होण्याचा धोका वाढतो. ज्या स्त्रिया धूम्रपान करतात त्यांना आयव्हीएफ उपचारांचा पर्याय निवडता येतो. धूम्रपान केल्याने शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी करून पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. तसेच एखाद्याला इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सध्या इतर कारणांसह मुलं न होण्यासाठी हेदेखील एक महत्वाचे कारण मानले जात आहे. तुम्ही वेळीच याकडे लक्ष देऊन धुम्रपानाची सवय असल्यास, ती मोडायला हवी. 

लॉकडाऊनच्या काळात गर्भवती महिलांनी अशी घ्या फिटनेसची काळजी, तज्ज्ञांचा सल्ला

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक