या राशीच्या व्यक्ती असतात फारच बोलक्या ( Talkative Zodiac Signs In Marathi)

या राशीच्या व्यक्ती असतात फारच बोलक्या ( Talkative Zodiac Signs In Marathi)

काही जणांना बोलण्यासाठी काहीही विषय लागत नाही. तुम्ही एखाद्या विषयावर बोलणे सुरु केले की,त्या आपोआपच एखादा विषय वाढवू लागतात. आपल्या बोलण्याने ते इतरांवर इतका प्रभाव पाडतात की, त्या व्यक्तीला आपण लगेचच त्यांना बोलक्या व्यक्ती बोलून मोकळे होतो. तर काहींना असे बोलणे कितीही केले तरी जमत नाही. तुमच्याही आजुबाजूला अशाच बोलक्या व्यक्ती आहेत का? अशा बोलक्या व्यक्ती या ठराविक राशींच्या असतात. एकूण 12 राशींपैकी 6 अशा राशी आहेत ज्यांना बोलायला खूप आवडते. आता या राशींना बोलायला जरी आवडत असले तरी देखील त्यांच्या बोलण्यामध्येही वेगवेगळे विषय आणि छटा असतात. यासाठीच आपण आज जाणून घेऊया अशाच काही बोलक्या राशी…

...म्हणून दाराबाहेर काढली जाते रांगोळी

बोलण्यात माहीर मिथुन 

मिथुन राशीच्या व्यक्ती या सगळ्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. कारण त्यांना बोलायला खूप आवडते. पण या व्यक्ती बोलायच्या म्हणून बोलत नाहीत. तर अशा व्यक्ती या हुशार असतात. त्यांना अगदी कोणताही विषय दिला तरी त्यांना त्यावर विचार करायची फारशी गरज नसते. अशा राशी या कोणत्याही नव्या विषयावर आणि अनोळखी माणसांसोबत कोणताही विचार न करता अगदी सहज बोलतात.  कितीही तास तुम्ही त्यांना बोलायला लावले तरी देखील त्या बोलू शकतात. 


बोलण्यात हात धरु शकत नाही अशी धनु

बोलायला आवडणे आणि विषयबद्ध बोलणे यामध्ये फार फरक आहे. धनु राशीच्या व्यक्ती यांना बोलायला फार आवडते. एखाद्याला सल्ला देण्यात त्या माहीर असतात. एखाद्याला समजून सांगण्याची त्यांची वृत्ती कमालीची वाखाणण्याजोगी असते. ते बोलताना त्यांना कोणीही अडवू शकत नाही. त्यांच्या फ्लो नुसार ते माहितीपर विषयांवर बोलत राहतात.

‘हिरा है सदा के लिए’ पण तो कोणी घालावा,जाणून घ्या


खंबीर विचार मेष 

मेष राशीच्या व्यक्ती या फारच ‘आली अंगावर घेतली शिंगावर’ अशा स्वभावाच्या असतात. त्यांना स्वत:चे असे विचार असतात. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी ते प्रसंगी इतरांचे लक्ष वेधून घेत. संवाद साधतात. पण त्यांचा मुद्दा पटत नाही तोवर त्या मुळीच थांबत नाहीत. इतरांना सल्ले देण्यात ते माहीर असतात. असे करताना ते समोरच्याचे ऐकतही नाहीत. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असे जाणवले की, मग मात्र त्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही. उलट आपला मुद्दा पटवून सांगतात.

केंद्रस्थानी राहणारे सिंह 

सिंह राशीच्या व्यक्तींनाही बोलायला खूप आवडते. सिंह राशीच्या व्यक्तींशी बोलताना तुम्हाला सतत तुम्ही मुलाखतीला आलात असे जाणवेल. कारण त्यांचे बोलणे कायम एकतर्फी असते. अशा व्यक्ती सतत अशा काही बोलतात की, त्यांच्या बोलण्यातून थोडी घमेंड झळकतेच. सिंह राशीसोबत बोलणाऱ्या व्यक्तीला त्याचं बोलणं संपण्याची वाट पाहावी लागते. 

 बोलण्याची संधी साधतात मीन 

मीन राशीच्या व्यक्ती या स्वभावाने फारच शांतच असतात. त्या फार बोलत नाहीत मग त्यांचे नाव इथे कसे  असे तुम्हाला नक्कीच वाटले असेल. पण असे मुळीच नाही. मेष राशीच्या व्यक्ती बोलायला लागल्या की, थांबायचे नाव घेत नाही. त्यांना समोरच्या व्यक्तींचे संपूर्ण ऐकून घ्यायला खूप आवडते.  पण त्यांना ज्यावेळी बोलायला मिळते त्यावेळी बऱ्याच गोष्टी ते बोलून जातात. 


विषय मिळाला सुटतात कुंभ 

कुंभ राशीच्या व्यक्ती या एकतर हसतमुख किंवा फार धीर गंभीर स्वरुपाच्या असतात. त्यांना बोलायला खूप आवडते. त्यांना इतरवेळी इतर विषयात बोलण्यात काहीच रस नसतो. पण जर त्यांना बोलायला मिळाले तर मात्र या राशीचे लोक इतके बोलतात की विचारता सोय नाही, 


मग या बडबड्यांमध्ये तुमचा नंबर लागतो का?

प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असतात वृश्चिक राशीच्या व्यक्ती, जाणून घ्या