घरच्या घरी बनवा अशी थंडगार मलई कुल्फी

घरच्या घरी बनवा अशी थंडगार मलई कुल्फी


गारेगार मटका कुल्फी अथवा मलई कुल्फी अनेकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये असते. उन्हाळ्याच्या असह्य दिवसांमध्ये मध्यरात्री उठून कुल्फी खाण्याची अनेकांना सवय असते. पूर्वी उन्हाळ्यात रात्री उशीरापर्यंत आईस्क्रीम पार्लर सुरु असायचे. रात्री उशीरापर्यंत मुंबईत रस्त्यावर कुल्फीच्या गाड्या लागायच्या. मात्र आता कोरोनामुळे निर्बंध कडक करण्यात आल्यामुळे हवं तेव्हा आईस्क्रिम अथवा कुल्फी खाणं नक्कीच शक्य नाही.  मात्र असं असलं तरी घरच्या घरी कुल्फी करणं कठीण नक्कीच नाही. मात्र यासाठी तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

साहित्याचे प्रमाण आहे महत्त्वाचं

तुम्ही घरी आईस्क्रिम बनवा अथवा मलई कुल्फी त्यासाठी लागणारं साहित्य योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा अनेकांचा कुल्फी बनवण्याचा बेत फसतो कारण ते दूधाचे प्रमाण जास्त घेतात आणि साखरेचं प्रमाण कमी करतात. असं केलं तर तुमची मलई  कुल्फी बाजारातील कुल्फीच्या चवीप्रमाणे नक्कीच लागणार नाही. किंवा अती दुधामुळे तुमची कुल्फी बर्फाप्रमाणे कडक होऊ शकते.  म्हणूनच कुल्फी बनवताना प्रमाण अचूक असायला हवं. अर्धा लीटर दुधासाठी साखरेचं प्रमाण कमीत कमी शंभर ते दोनशे ग्रॅम असायला हवं. साखर दुधात जितकी विरघळेल तितकीच तुमची  कुल्फी अधिक मलईदार होईल. 

कुल्फीचे साचे वापरताना काय काळजी घ्याल

आजकाल बाजारात विविध प्रकारचे कुल्फीचे साचे विकत मिळतात. अॅल्युमिनियम, प्लास्टिक, सिलिकॉन अशा विविध मटेरिअलमध्ये ते असतात. पारंपरिक अॅल्युमिनिअमचा साचा आणि कुल्लडमध्ये सर्वात बेस्ट मलई कुल्फी तयार होते. मात्र जर तुम्हाला योग्य शेप हवा असेल तर तुम्ही इतर प्रकारच्या साच्यांचा वापर करू शकता. साचे वापरताना लक्षात ठेवा कुल्फीचे साहित्य अतिप्रमाणात साच्यात भरू नका. साच्यापेक्षा थोडे कमी साहित्य भरा. याचं कारण कुल्फी तयार होताना फ्रीजमध्ये ती घट्ट झाल्यामुळे आकारमान वाढते. ज्यामुळे जर तुम्ही अधिकप्रमाणात साहित्य भरलं तर तुमची कुल्फी व्यवस्थित होत नाही. 

फ्रीजमध्ये कुल्फी कशी सेट करावी

बऱ्याचजणी कुल्फीचे साचे भरून लगेच ते फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवतात. मात्र असं करणं योग्य नाही. जर तुम्ही साच्यामध्ये कुल्फीसाठी वापरण्यात आलेलं गरम दूध भरलं असेल तर ते आधी सामान्य तापमानावर सेट होऊ द्या. त्यानंतरच साचे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. कुल्फी सेट झाल्यावर साचे काढून काही सेकंद पाण्यात बूडवा. ज्यामुळे साच्यामधून सहज कुल्फी बाहेर पडेल. 

instagram

मलई कुल्फी बनवण्याची पद्धत

साहित्य - दूध, मिल्क पावडर, साखर , मावा, मावा इसेन्स


एक लिटर दूध आटवून त्याचे अर्धा लीटर दूध करा. मंद गॅसवर ठेवून त्यात साखर मिल्क पावडर आणि कॉर्न पावडर मिक्स करा. गॅस बंद करा थंड झाल्यावर त्यात मावा इसेन्स  आणि ताजा मावा टाकून सेट करा. कुल्फी सेट करण्यासाठी कमीत कमी चोविस तास लागतात. त्यामुळे ज्या दिवशी कुल्फी खायची असेल त्याच्या आधी एक दिवस कुल्फी करण्याचा बेत आखा. कुल्फी तुम्ही कुल्फीसाठी मिळणाऱ्या कुल्फीचे साचे, मोल्ड अथवा छोट्या छोट्या मातीच्या मटक्यांमध्ये सेट करू शकता. कुल्फी सेट करताना कुल्लड अॅल्युमिनीयम फॉईलने बंद करा. थंडगार कुल्फीवर किसलेल्या बदाम- पिस्ताचे काप टाकून सर्व्ह करा.

महत्त्वाच्या सूचना -

कुल्फी नीट सेट व्हायला हवी असेल तर या टिप्स फॉलो करा.

  • कुल्फी साठी वापरण्यात येणारे दूध घट्ट करण्यासाठ कंडेन्स मिल्क वापरा
  • कुल्फीत चांगली सेट होण्यासाठी त्यात पिठीसाखर वापरा
  • दोन निरनिराळ्या प्रकारच्या कुल्फी सेट करण्यासाठी निरनिराळे साचे वापरा
  • कुल्फीत ड्रायफ्रूटस वापरताना ते नेहमी क्रश करून टाका