तेलाप्रमाणेच 'या' गोष्टीदेखील देतात केसांना मऊपणा आणि पोषण

तेलाप्रमाणेच 'या' गोष्टीदेखील देतात केसांना मऊपणा आणि पोषण

त्वचेप्रमाणे तुमच्या केसांनाही पोषणाची तितकीच गरज असते. केसांचे योग्य पोषण झाले की केस नैसर्गिक पद्धतीने मऊ आणि चमकदार दिसू लागतात. धुळ, माती, प्रदूषण, हेअरस्टाईल, केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट यांचा सतत तुमच्या केसांवर दुष्परिणाम होत असतो. ज्यामुळे केस निस्तेज होतात आणि तुटून गळू लागतात. केस गळणे ही आजकाल अनेकांची डोकेदुखी झालेली आहे. यासाठीच केसांचे पोषण होण्यासाठी नियमित तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. पण फक्त तेलानेच केस मऊ होतात असे नाही. केसांच्या योग्य पोषणासाठी आणि केस मुलायम होण्यासाठी केसांना तेलाप्रमाणेच आणखी काही गोष्टींचीदेखील गरज असते. यासाठी जाणून घ्या तेलाप्रमाणेच आणखी अशा कोणत्या गोष्टी अथवा नैसर्गिक घटक आहेत ज्या तुमच्या केसांचे पोषण करण्यासाठी उपयुक्त आहेत.

अंडे -

केस मऊ आणि मुलायम करण्यासाठी तुम्ही केसांवर अंड्याचा वापर करू शकता. कारण अंड्यामुळे केसांचे पोषण होते, केस गळणे कमी होते आणि स्काल्पवरचा कोरडेपणा कमी होतो. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन आणि बायोटिन असते. ज्यामुळे केस आणि स्काल्पचे योग्य पोषण होते. केसांची योग्य वाढ होण्यासाठी, केस मजबूत होण्यासाठी आणि केसांचे टेक्चर सुधारण्यासाठी केसांना भरपूर प्रमाणात प्रोटिनची गरज असते. 

pexels

दही -

दही हे प्रोटिन आणि कॅल्शियमयुक्त असते. दह्यात व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमही भरपूर असते. केसांच्या वाढीसाठी आणि केसांना मऊपणा येण्यासाठी या सर्व घटकांची गरज असते. सहाजिकच दह्यामुळे केसांचे पुरेसे पोषण होते आणि केस मऊ आणि चमकदार होतात. शिवाय दह्यात अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

अॅव्होकॅडो -

केसांचे योग्य पोषण करणारा आणखी एक घटक म्हणजे अॅव्होकॅडो. कारण अॅव्होकॅडोमध्ये  भरपूर फॅटि अॅसिड असतात. ज्यामुळे केसांचे चांगले कंडिनशनिंग होते. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी, केस चमकदार करण्यासाठी केसांवर अॅव्होकॅडो लावणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. 

pexels

केळं -

केळ्यामध्ये अनेक पोषक घटकांसोबत नैसर्गिक तेलही असते. व्हिटॅमिन आणि कॅल्शिअमयुक्त केळ्याच्या गरामुळे केसांचे योग्य पोषण होते. केसांना फाटे फुटणे, केसांचा कोरडेपणा यामुळे कमी होतो आणि केस मऊ , मुलायम होतात. प्रदुषणामुळे केस खराब झालेले केस केळ्याच्या हेअर मास्कमुळे पुन्हा मऊ आणि मुलायम होऊ शकतात.

मध -

मध त्वचेप्रमाणेच केसांनाही मऊपणा देण्यासाठी वापरले जाते. मधामुळे हेअर फॉलिकल्स चमकदार आणि मजबूत होतात. केसांचे योग्य पोषण करण्यासाठी हेअर प्रॉडक्टमध्ये मधाचा वापर केला जातो. केसांची योग्य वाढ होण्यासाठी आणि कोंड्यासारख्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही केसांना मध लावू शकता.

थोडक्यात तेलाप्रमाणेच या पाच गोष्टी वापरून तुम्ही तुमचे केस मऊ आणि मुलायम करू शकता. तेल केसांचे पोषण आणि संरक्षण करण्यासाठी गरजेचं आहेच. मात्र तेलाप्रमाणेच या पाच गोष्टीदेखील तुमच्या केसांना मऊ आणि मुलायम करू शकतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा या नैसर्गिक घटकांचा वापर करून केसांना मॉईस्चराईझ करा. 

Beauty

Makeup Blender

INR 700 AT MyGlamm