ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
ओठांचा काळेपणा घालविण्यासाठी वापरा तिळाचे तेल

ओठांचा काळेपणा घालविण्यासाठी वापरा तिळाचे तेल

त्वचेच्या काळजीसह आपल्या ओठांची काळजी घेणेही तितकंच गरजेचे आहे. कोणताही ऋतू असो ओठांची काळजी प्रत्येक हंगामात घ्यावी लागते. विशेषतः कोरडेपणा आणि सनटॅनपासून वाचणं अत्यंत गरजेचे आहे. ओठांची काळजी नीट घेतली गेली नाही तर ओठ काळे पडतात. ओठांच्या काळजीसाठी अनेक महिला ओठांवर लिप बामचा वापर करतात. पण या लिप बाममध्ये अनेक केमिकल्स मिक्स असतात आणि त्यामुळे ओठ अधिक काळे पडतात. तुमचेही ओठ काळे पडले असतील तर यावर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे तिळाचे तेल (sesame oil). तिळाच्या तेलाचा कसा उपयोग करायचा आणि ओठांचा काळेपणा जाण्यासाठी तिळाच्या तेलाचे नक्की कसा फायदा होतो हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

हळद आणि तिळाच्या तेलाचा लिप मास्क (Turmeric and Sesame oil Lip Mask)

हळद आणि तिळाच्या तेलाचा लिप मास्क (Turmeric and Sesame oil Lip Mask)

Shutterstock

साहित्य 

ADVERTISEMENT
  • अर्धा चमचा तिळाचे तेल
  • चिमूटभर हळद

कृती 

  • एका बाऊलमध्ये तिळाचे तेल आणि हळद मिक्स करून घ्या
  • हा घरगुती लिप मास्क ओठांवर लावा
  • अर्धा तास तसंच ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने ओठ स्वच्छ करा
  • टॅनिंगमुळे ओठ काळे झाले असतील तर या लिप मास्कने ओठांचा नैसर्गिक रंग परत येईल. तुमचे ओठ गुलाबी होतील आणि त्याशिवाय मऊ आणि मुलायम राहतील

गुलाबी रंगाचे ओठ हवे असतील तर करा घरीच Lip Balm तयार

तीळ आणि नारळाच्या तेलाचा लिप बाम (Sesame Oil and Coconut Oil Lip Balm)

तीळ आणि नारळाच्या तेलाचा लिप बाम (Sesame Oil and Coconut Oil Lip Balm)

Shutterstock

ADVERTISEMENT

साहित्य 

  • एक लहान चमचा तिळाचे तेल
  • अर्धा चमचा नारळाचे तेल

कृती 

  • एका बाऊलमध्ये दोन्ही तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या
  • आता हे मिश्रण ओठांना लावा
  • या मिश्रणाने आपल्या ओठांना दिवसातून दोन वेळा मसाज करा
  • यामुळे ओठांचा काळेपणा दूर होतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ओठांवर हा लिप मास्क नक्कीच लावा. याचा नियमित वापर केल्याने तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहण्यास मदत मिळते

गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर

लिप स्क्रब

लिप स्क्रब

ADVERTISEMENT

Freepik

लिप स्क्रब बनविण्यासाठी एक लहान चमचा साखर आणि अर्धा चमचा तिळाचे तेल मिक्स करा. पण हे मिक्स करण्यापूर्वी साखर तुम्ही क्रश करून घ्या. त्यामध्ये तेल मिक्स करा. या मिश्रणाचा वापर तुमच्या ओठावर करून हलक्या हाताने स्क्रब करा. 1 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने ओठ धुवा. आठवड्यातून 3 वेळा तुम्ही या लिप स्क्रबचा वापर करू शकता.

आकर्षक ओठ करणारी ‘लिप ब्लशिंग’ ट्रिटमेंट नक्की काय आहे

तिळाच्या तेलाचा फायदा

तिळाच्या तेलामध्ये सेसमोल आणि सेसमिनोल आढळते जे ओठांना अधिक मऊ आणि मुलायम बनवते. तेलामध्ये अँटिऑक्सिडंट असते. त्वचेवरील सूज कमी करण्यासाठी तिळाचे तेल अतिशय परिणामकारक ठरते. तसंच हिवाळ्यातही त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करता येतो. हिवाळ्यात त्वचा अधिक फाटते. यावेळी तिळाच्या तेलाचा चांगला वापर करता येऊ शकतो. तिळाचे तेल हे मॉईस्चराईजरप्रमाणे काम करते. तिळाच्या तेलामध्ये हिलिंग घटकही असतात. त्यामुळे फाटलेल्या ओठांवर याचा चांगला परिणाम होतो. यामध्ये आढळणारे विटामिन ई हे सनबर्न कमी करण्यास मदत करते. केवळ ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी तिळाच्या तेलाचा खूपच चांगला फायदा होतो. त्यामुळे नियमित याचा वापर करावा.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT