Easy Hacks - पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी वापरा सोपी पद्धत

Easy Hacks - पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी वापरा सोपी पद्धत

घरातील स्वच्छता करायची म्हटली की कंबर कसायला लागते. तेदेखील रोज हाताखाली बेडरूम, स्वयंपाकघर, हॉल याची स्वच्छता सहजतेने होते. पण जेव्हा घरातील पाण्याची टाकी स्वच्छ करायची वेळ येते तेव्हा मात्र नक्कीच डोक्याला ताप होतो. पण पाण्याची टाकी कितीही मोठी असली तरीही ती स्वच्छ करायची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही या पद्धतीने टाकी स्वच्छ केली तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. पाण्याची टाकीदेखील इतर घराप्रमाणे व्यवस्थित स्वच्छ करायला हवी. नियमित याची स्वच्छता करायला हवी. बऱ्याचदा पाण्याची टाकी स्वच्छ करताना त्रास होतो म्हणून बरेच महिने स्वच्छ केली जात नाही. पण हे योग्य नाही. कारण तुम्ही जे पाणी पिता ते तुम्हाला स्वच्छ करूनच प्यायला हवे. टाकी स्वच्छ न केल्यास, त्याच्या तळाशी घाण साचते आणि त्याशिवाय टाकीच्या तळाशी शेवाळं साचून पाणीही घाण होते. त्यामुळे नियमित स्वच्छता करणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याची टाकी कशी सोप्या पद्धतीने स्वच्छ करायची ते तुम्ही या लेखातून जाणून घ्या.

सर्वात पहिले पाण्याचा सप्लाय बंद करा

freepik

पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासााठी सर्वात पहिले आणि आवश्यक काम आहे ते म्हणजे पाण्याचा सप्लाय बंद करणे. जेव्हा तुम्ही पाण्याचा सप्लाय बंद कराल तेव्हा टाकीमध्ये असलेले सर्व पाणी हे वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये अथवा अन्य टाकीमध्ये भरा. टाकीमधून पाणी काढून टाकल्यानंतर खाली असलेले अतिरिक्त पाणीही तुम्ही कपड्याने स्वच्छ करून घ्या. जोपर्यंत टाकीमध्ये पाणी साठून राहील तोपर्यंत तुम्ही टाकी व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाही. त्यामुळे टाकी पूर्ण स्वच्छ होईल याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. 

घरातील जुन्या काचेच्या भांड्याना द्या अशी चमक, घरगुती उपाय

अॅसिडचा करा वापर

जास्त दिवस टाकीची स्वच्छता न केल्यास टाकीमध्ये घाण आणि माती जमा होते. अशावेळी माती स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करू शकता. तुरटीच्या जागी तुम्ही तुम्ही अॅसिडचा वापरही करू शकता. त्यासाठी तुम्ही थोडेसे पाणी ग्या आणि त्यात अॅसिड मिक्स करून टाकीमध्ये पसरवा. काही वेळ हे तसंच राहू द्या. यामुळे मातीची परत बसली असेल तर त्वरीत निघण्यास मदत मिळते. त्यानंतर काही वेळाने पाण्याने पुन्हा एकदा तुम्ही स्वच्छ करून घ्या. 

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

ब्लिचिंग पावडर आहे उत्तम

Shutterstock

पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो हे तुम्ही नेहमीच ऐकले असले. जर नसेल तर ब्लिचिंग पावडरच्या मदतीने तुम्ही पाण्याची टाकी आणि त्यातील पाणी स्वच्छ करून घेऊ शकता हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यासाठी तुम्ही पाणी बाहेर काढण्याचीही गरज नाही. तुम्ही पाणी टाकीत तसंच ठेऊनही ब्लिचिंग पावडरचा वापर करू शकता. साधारण 100 लीटरच्या पाण्याच्या टाकीमध्ये तीन ते चार चमचे ब्लिचिंग पावडर तुम्ही घाला. यामध्ये पाण्यातील घाण तळाशी जाऊन बसते आणि पाणी स्वच्छ होते. 

जाणून घ्या किचन साफसफाईची योग्य पद्धत

घरातील लहान मुलाची घ्या मदत

Freepik

पाण्याच्या टाकीमध्ये नक्कीच घरातील मोठी माणसं आत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे स्वच्छता नीट करता येत नाही. अशावेळी तुम्ही घरातील लहान मुलाची मदत घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच बेकिंग सोड्याचा वापर करून पाणी स्वच्छ करून घ्या. नंतर तुमच्या मार्गदर्शनाखाली मुलाला टाकीत उतरवा आणि कपड्याने टाकी स्वच्छ करून घ्या. टाकी स्वच्छ केल्यानंतर काही वेळ गच्चीवर उन्हात ठेवा अथवा खाली उन्हात ठेवा. यामुळे टाकी लवकर स्वच्छ होण्यास मदत मिळते. याशिवाय पाण्याच्या जोरदार फवाऱ्यानेही तुम्ही टाकी स्वच्छ करून त्यातील माती पटकन काढू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक