अशा प्रकारे झाली सत्यशोधक समाजाची स्थापना

अशा प्रकारे झाली सत्यशोधक समाजाची स्थापना

जाती प्रथा, पौरोहित्यवाद, स्त्री-पुरूष असमानता आणि अंधविश्वासासोबत भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक-सामाजिक आणि सांस्कृतिक तफावत होतीच. ज्याविरोधात सामाजिक परिवर्तनाची अनेक शतकांपासून गरज होती. हेच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आधुनिक युगात सार्थ, सशक्त आणि काही प्रमाणात यशस्वी आंदोलन चालवण्याचं श्रेय पहिल्यांदा ज्योतिराव फुले यांना जातं. त्यांना ज्योतिबा फुले या नावानेही ओळखले जात असे. व्यक्तीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी सुरू केलेल्या त्यांच्या आंदोलनामुळेच त्यांना आधुनिक भारताचा पहिला शिल्पकारही मानलं जातं. ही बाब महत्त्वपूर्ण आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही बुद्ध आणि कबीर यांच्यासोबत ज्योतिबा फुले यांना गुरू मानले होते.

सत्यशोधक समाजाची ऐतिहासिक भूमिका (Historian move by Saty Shodhak Samaj)

ज्योतिबा फुले यांच्या आंदोलनात त्यांच्याद्वारे स्थापन केलेल्या सत्य शोधक समाजाची खूप मोठी भूमिका होती. ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचं कार्य पुढे नेलं. समाजशास्त्रज्ञ गेल ऑम्वेट आणि रोजालिंड ऑ हॆनलॉन यांनीही याबाबत विस्ताराने लिखाण केलं आहे. ज्यामुळे याची चर्चा जगभरात झाली. इंटरनेट ज्योतिबा फुले यांचं संपूर्ण कार्य आणि माहिती मिळते.  

समाजपरिवर्तन घडताना जातीव्यवस्थेतील धार्मिक आणि आध्यात्मिकतेला आधार देणाऱ्या हिंदू धर्माच्या संकल्पनांना न बसणं असंभव होते. नेमक तेच ज्योतिबा फुले यांनी केलं आणि थेट हिंदू धर्मालाच आव्हान केलं. हजारो वर्ष लोकांसाठी पुराणातील दाखले आणि कथांनी शास्त्राचं काम केलं आहे. हे पाहता गुलामगिरी या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांमधील प्रचलित जुन्या चालीरीतींना निशाणा बनवलं. यामुळे एका अशा प्रेरणेला बळ मिळालं की, ज्यामुळे देशभरातील विविध जातीवादविरोधी आंदोलनांना चालना मिळाली.

सत्यशोधक समाजाची स्थापना (Establishment of Satya Shodhak Samaj)

समाजपरिवर्तनाच्या आंदोलनाला संघटीत करण्याच्या हेतूने त्यांनी 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यावेळी अनेक समाजसुधारणा करण्याच्या दावा करणाऱ्या संघटना काम करत होत्या. ज्यामध्ये ब्रम्हसमाज, प्रार्थना समाज, पुणे सार्वजनिक सभा हे प्रमुख होते. पण संघटनाचं स्वरूप मर्यादित होतं. त्यांच्या कल्पनेमध्ये पूर्ण भारतीय समाज नव्हता. त्यांच्यामते समाजात जाती असाव्यात पण त्यांचं रूप क्रूर किंवा अमानवीय नसावं. यामध्ये 1875 साली स्थापना झालेल्या आर्यसमाजाचं नावंही येतं. जे वेदांचे पुरस्कर्ते होते.

सत्यशोधक समाजाची स्थापना (Establishment of Satya Shodhak Samaj)

सत्यशोधक समाजाचा प्रमुख उद्देश होता. समाजातील वंचितांना सामाजिक-सांस्कृतिक जोखडातून मुक्ती मिळवून देणे. जेणेकरून शोषण करणाऱ्या घटकांपासून त्यांचं संरक्षण होईल. सामाजिक हिताच्या दृष्टीने एकोपा निर्माण होईल. धार्मिक किंवा जातीवर आधारित शोषणातून मुक्ती मिळवून देणे आणि याच वर्गातील युवापिढीला शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळवून देणे. एकूणच हा सामाजिक परिवर्तनाच्या घोषणापत्र लागू करण्याचा कार्यक्रम होता.

सत्यशोधक समाजाची स्थापना (Establishment of Satya Shodhak Samaj)

समाजातील वंचित वर्गाचा ज्योतिबांवर विश्वास होता. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं योगदान हे होतं. त्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला पाठिंबा दिला. काही काळातच त्याच्या शाखा मुंबई, पुणे आणि ग्रामीण भागात सुरू झाल्या. एक दशकाच्या आतच संपूर्ण महाराष्ट्रात जम बसला. सत्यशोधक समाजाची सदस्यता सर्वांसाठी खुली होती. त्यामुळे सर्व जातीधर्मातील लोकं याच्याशी जोडले जाऊ लागले. 

सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ज्योतिबा फुले यांनी वंचितांना आपल्या विकास आणि मान-प्रतिष्ठा मिळवून देण्याचा जो रस्ता 146 वर्ष आधी दाखवला होता. तो सामाजिक न्यायाच्या संदर्भात आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ज्योतिबांचे विचार आणि कार्य आजही मानले जाते.