जाणून घ्या 1 मे ला साजरा केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र दिनाबाबत

जाणून घ्या 1 मे ला साजरा केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र दिनाबाबत

1 मे ला आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा मे डे म्हणून ओळखलं जातं. पण मराठी जनतेसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. कारण हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ही आवर्जून दिल्या जातात. महाराष्ट्र दिवसाला भारतात महाराष्ट्र दिन असं म्हटलं जातं. याच दिवशी भारतात महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची स्थापना झाली होती. असं म्हणतात की, भारताच्या स्वांतत्र्याच्या वेळी हे राज्य बॉम्बे प्रदेशचा भाग होते. एक मे ला महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. आधी महाराष्ट्र आणि गुजरात हे राज्य वेगवेगळे नव्हते. 

सुरूवातीला बॉम्बे प्रदेशमध्ये मराठी आणि गुजराती भाषा बोलणारे लोक सर्वात जास्त होते. ज्यावेळी बॉम्बे या दोन भाषा सामावून होता. त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषिक हे आपापल्या लोकांसाठी वेगवेगळ्या राज्याची मागणी करत होते.

भाषावार राज्याची स्थापना

अधिनियम 1956 राज्यांच्या स्थापनेतंर्गत अनेक राज्याची स्थापना करण्यात आली. तेव्हा कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक राज्य बनवण्यात आलं आणि त्यासोबत तेलुगु भाषिकांसाठी आंध्रप्रदेश आणि मल्याळम भाषिकांसाठी केरळ तर तामिळ भाषिकांसाठी तामिळनाडू राज्याची स्थापना करण्यात आली. पण त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषिकांना वेगवेगळं राज्य नाही मिळालं. बॉम्बे पुर्नस्थापने दरम्यान अधिनियम 1960 महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना दोन वेगवेगळ्या राज्यांना विभागण्यात आलं. दोन राज्यांमध्ये मुंबईबाबत अनेक विवाद होते आणि त्यानंतर बॉम्बे ही राज्याची महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ

स्वातंत्र्यानंतर जेव्हा बॉम्बे प्रदेशातून महाराष्ट्र आणि गुजरातच्या स्थापनेचा प्रस्ताव आला. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईला वेगळा केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे महाराष्ट्रात विद्रोहाची ठिणगी पडली. मुंबईला महाराष्ट्रात ठेवण्यासाठी आंदोलन सुरू झालं. हे आंदोलन होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळ. ज्यात अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. शेवटी सर्व मराठी भाषिकांनी एकत्रितपणे एक राज्य बनवण्याबाबत मोठ आंदोलन केलं आणि 1 मे 1960 रोजी बॉम्बे पुर्नस्थापन अधिनियमांतर्गत कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्वांना जोडून एक नवीन राज्य म्हणजेच महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले.

महाराष्ट्राबाबतच्या महत्त्वपूर्ण गोष्टी

  • देशातलं सर्वात मोठं राज्य - महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्र 307713 किलोमीटर इतकं पसरलेलं आहे. भारताच्या राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या आधारावर महाराष्ट्राचा तिसरा नंबर आहे. या राज्याआधी भारतात राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्य ही क्षेत्राच्या आधारावर सर्वात मोठी राज्य आहे. 
  • महाराष्ट्राची शेजारी राज्य - महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे. तर दक्षिण पूर्वेला आंध्रप्रदेश आणि गोवा राज्याच्या सीमा लागून आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या सीमा या मध्यप्रदेश राज्याशी जोडलेल्या आहेत आणि राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
  • महाराष्ट्राची राजधानी - महाराष्ट्राची हिवाळी राजधानी नागपूर असून उन्हाळी राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत.

महाराष्ट्र दिवस आणि कार्यक्रम

1 मे ला महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने या दिवशी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सगळ्या शाळा, कॉलेज, न्यायालयीन कामकाज आणि ऑफिसेस या दिवशी सुट्टी असते. महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्क, दादर येथे परेड काढण्यात येते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भाषण करतात. या दिवसाचं औचित्य साधून अनेक नव्या योजना आणि प्रकल्पांची घोषणा केली जाते. महाराष्ट्रात या दिवशी ड्राय डे असतो.