...म्हणून दाराबाहेर काढली जाते रांगोळी

...म्हणून दाराबाहेर काढली जाते रांगोळी

आनंदाच्या प्रसंगी किंवा सणासुदीला दाराबाहेर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळी ही सणांना आवर्जून काढली जाते. वेगवेगळ्या डिझाईन्स काढून त्यात रंग भरले जातात. त्यामुळे घराची आणि दाराची शोभा वाढते. भारताच्या वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढली जाते. गावाकडे अंगण, तुळशी वृदांवन असल्यामुळे तुळशीशेजारी आणि अंगणात रांगोळी काढली जाते. पण शहरांमध्ये रांगोळी काढण्याची फारशी पद्धत नाही. पण संस्कृतीचा मान राखत हल्ली अनेक जण उंबऱ्यावर का होईना एखादे स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावले काढतात. या रांगोळी काढण्यामागेही एक श्रद्धा असते. दाराबाहेर नेमकी रांगोळी का काढली जाते. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया रांगोळी काढण्याचे नेमके कारण…

रांगोळीचे विविध प्रकार आणि साध्या डिझाईन्स (Simple Rangoli Designs In Marathi)

शक्ती आणि उदारता

Instagram

संस्कृतात रांगोळीला ‘रंगवली’ असे म्हणतात. सौंदर्य आणि मंगलसिद्धीचे प्रतीक रांगोळी मानली जाते. रांगोळीच्या विशिष्ट दगडांचा बुक्की करुन त्यापासून वेगवेगळे आकार तयार केले जातात. रांगोळी हे शक्ती आणि उदारतेचे प्रतीक आहे. रांगोळी काढण्यामागे शक्ती, उदारपणा आणि नशीब फळफळवणे हा हेतू असतो. शिवाय मांगल्याचे लक्षण म्हणून रांगोळी काढली जाते. अशुभनिवारक अशी ही रांगोळी असल्यामुळे सगळ्या नकारात्मक उर्जांना दूर करुन सकारात्मक उर्जा आणते. ज्यामुळे घरात आनंदी आनंद राहतो असे मानतात. हिंदू धर्मातच नाही तर पारशी धर्मातही रांगोळी ही याच कारणांसाठी काढली जाते.

गुढीपाडव्यासाठी‌ ‌खास‌ ‌रांगोळी‌ ‌डिझाईन्स‌

रांगोळीची प्रतीके

Instagram

रांगोळी काढत असाल तर तुम्हाला रांगोळीच्या काही ठराविक डिझाईन्स नक्कीच माहीत असतील. यामध्ये मुख्यत्वे शंख, फुलं, पानं,कमळ, चंद्र, सूर्य, तारे,चक्र अशा डिझाईन्स असतात. या नुसत्या डिझाईन्स नसून देवी देवतांशी निगडीत अशा या गोष्टी आहेत. या सगळ्यांना हिंदू धर्मात फार महत्व आहे. त्यामुळे अशी प्रतीक चिन्ह काढून आपण हा आनंद रेखात असतो. आता रांगोळीच्या वेगवेगळ्या आता काढल्या जात असल्या तरी देखील त्यामध्येही अशी प्रतीक काढली जातात जी तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येतात. घराबाहेर रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या गोष्टी गुंफून काही डिझाईन्स बनवू शकता.

घरातील देवघर सजवा सोप्या पद्धतीने, दिसेल अधिक सुंदर

रांगोळी आणि प्रकार

वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढली जाते. सर्वसाधारणपणे डेलोमाईट या दगडाला भाजून त्याची पूड केली जाते. रवाळ अशी ही पूड रांगोळी नावाने ओळखली जाते आणि ती रांगोळी घातली जाते. याशिवाय तांदूळाची पिठी वापरुनही रांगोळी करण्याची पद्धत खूप ठिकाणी आहे. पांढऱ्या रांगोळीला रंगीत करण्यासाठी हळदी- कुंकू,गुलाल याचा वापर केला जातो. पण या शिवाय आता बाजारात रंगीत अशा रांगोळीचे रंगही मिळतात. 


रांगोळी का काढतात याचे फायदे जाणून घेतल्यानंतर घरात मंगलमयी वातावरण राहण्यासाठी तुम्ही दररोज रांगोळी काढण्यास काहीच हरकत नाही. 

यासाठी भारतीय संस्कृतीत नारळाला आहे ‘श्रीफळाचा मान’