ADVERTISEMENT
home / मेकअप
काजळ पसरल्यामुळे लुक खराब होत असेल तर वापरा सोपी पद्धत

काजळ पसरल्यामुळे लुक खराब होत असेल तर वापरा सोपी पद्धत

इतर कोणताही मेकअप केला नाही केवळ डोळ्यात काजळ (kajal) लावलं तरीही एक वेगळा लुक मिळतो. सुंदर दिसण्यासाठी नेहमीच अनेक महिला काजळाचा वापर करतात. पण अनेकदा विशेषतः उन्हाळ्यात काजळ पसरण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. काजळ लावल्यानंतर काही तासातच काजळ पसरते. त्यामुळे तुमचा मेकअप आणि लुक दोन्ही खराब दिसू लागते. डोळ्याच्या बाहेर काजळ येऊन तुम्ही अधिक खराब दिसू शकता. त्यामुळे काजळ पसरू नये यासाठी तुम्हाला आम्ही काही सोप्या टिप्स देत आहोत. तुम्ही या टिप्सचा वापर करून काजळ पसरल्यामुळे जर लुक खराब होत असेल तर अधिक चांगल्या रितीने लावू शकता. काजळ अधिक काळ कसे टिकेल आणि पसरणार नाही याच्या काही सोप्या टिप्स तुम्ही या लेखातून जाणून घ्या आणि त्याचा वापर करून तुमचा लुक अधिक चांगला टिकवा. 

काजळ पसरण्याची कारणे

काजळ पसरण्याची कारणे

freepik

काजळ पसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऑईली अर्थात तेलकट स्किन (oily skin). तुमची त्वचा जर तेलकट असेल तर काजळ पटकन पसरते आणि सर्व मेकअप आणि लुक खराब होतो. असं असेल तर काजळ लावण्यापूर्वी तुम्ही डोळ्यांच्या आसपासचा भाग अधिक चांगला स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसा आणि मगच काजळ लावा. यामुळे तेलकट त्वचा राहत नाही आणि काजळ पसरण्याची शक्यता कमी असते. 

ADVERTISEMENT

फेस पावडरचा करा वापर

तुम्हाला काजळ लावल्यानंतर चेहऱ्यावर घाम येत असेल. तर तुम्ही काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांवर मॉईस्चराईजरचा वापर करू नका. तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांनी काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या आजूबाजूला फेस पावडरचा वापर करा. आधी फेस पावडर लावा. यामुळे काजळ जास्त काळ टिकण्यास आणि न पसरण्यास मदत मिळते. तसंच घामामुळे काजळ पसरत नाही. पावडरमुळे व्यवस्थित टिकून राहते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात याचा वापर केल्यास, काजळ न पसरण्यास मदत मिळते. तसंच काजळ जास्त काळ टिकून राहण्यास उपयोग होतो. 

लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

चांगल्या ब्रँडचा उपयोग करा

बाजारामध्ये वेगवेगळे काजळ उपलब्ध आहेत. पण सगळ्या कंपनीचे काजळ चांगले नसते. त्यामुळे जे काजळ जास्त काळ टिकते अशा ब्रँडेड काजळाचा वापर करा. तसंच चांगल्या कंपनीचे काजळ हे पसरत नाही. त्यामुळे ते किमान बारा तास डोळ्यांमध्ये राहते आणि पसरत नाही. त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. कोणते काजळ चांगले आहे याचे निरीक्षण करून आणि त्याचे परीक्षण वाचून मगच त्याची खरेदी करा. चांगल्या ब्रँडचे काजळ हे अधिक गडद आणि टिकाऊ असते. 

तुमच्यासाठी बेस्ट आहेत या 5 काजळ पेन्सिल (5 Best kajal pencil)

ADVERTISEMENT

आयशॅडोचा वापर करा

डोळ्यांखाली काजळ पसरते तर तुम्ही वॉटरलाईनवर काजळाच्या जागी आयशॅडो पावडर अथवा साध्या पावडरचा वापर करा. काजळ लावताना डोळ्यांच्या कोपऱ्यावर लावले जाणार नाही याची काळजी घ्या. कारण डोळ्यांच्या कोपऱ्यावर लावलेले काजळ पटकन पसरते आणि मग दिसायला चांगले दिसत नाही. घाम डोळ्यांच्या कोपऱ्यावर येतो. त्यामुळे काजळ पसरण्यास त्याचा हातभार लागतो. मग अशावेळी आयशॅडो पावडरचा वापर केला असेल तर घाम पटकन येत नाही आणि काजळही पसरत नाही. 

डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी यामी गौतमचा फंडा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT