ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
शॉर्ट ड्रेस घालायचा विचार करताय, सोप्या टिप्स करा फॉलो

शॉर्ट ड्रेस घालायचा विचार करताय, सोप्या टिप्स करा फॉलो

शॉर्ट ड्रेस (short dress) पाहिल्यावर आपण पण असा घालयला हवा असं बऱ्याच जणींना वाटत असतं. विशेषतः आपल्या आवडत्या अभिनेत्रीने घातल्यानंतर त्यांची फॅशन आपल्याला भावते. मग आपल्यालाही असा ड्रेस हवा असं मनात येणं साहजिक आहे. पण हे शॉर्ट ड्रेस घालताना नक्की काय काळजी घ्यायची. कुठे काही चुकीचं दिसणार नाही ना असे अनेक प्रश्न आपल्याला असतात. कारण शॉर्ट ड्रेसच्या आत नक्की काय घालायचं आणि तो कसा कॅरी करायचा हे बऱ्याच जणींना माहीत नसते. बऱ्याच अभिनेत्री या आपले फिगर फ्लॉंट करण्यासाठी रेड कारपेटपासून ते अगदी वेगवेगळ्या ठिकाणी जाताना स्किनफिट बॉडीकॉन ड्रेस घालतात. पण हे घालताना कुठेही त्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे असं वाटत नाही. मग तसंच जर तुम्हीही शॉर्ट ड्रेस घालायचा अथवा बॉडीकॉन घालायचा विचार करत असाल तर काही सोप्या टिप्स फॉलो करायला हव्या. याच सोप्या टिप्स तुम्हाला आम्ही या लेखातून देत आहोत. तुम्ही या टिप्स वापरून अगदी आत्मविश्वासाने (Confidence) बॉडीकॉन ड्रेस (Bodycon Dress) घालू शकता. तसंच कोणत्या उप्स मोमेंट्स (Oops moments) होणार नाहीत याची नक्की काळजी घेऊ शकता. 

उन्हाळ्यात कम्फर्टेबल लुकसाठी वापरा अशा ब्रा

बॉडीकॉन ड्रेससह वापरा बॉडी शेपवेअर

तुम्हाला तुमची फिगर दाखवायची असेल तर तुम्ही असा शॉर्ड बॉडीकॉन ड्रेस घालू शकता. बॉडीकॉन ड्रेसमध्ये तुमच्या शरीरातील थोडी जरी जाडी असेल तर ती दिसून येते. त्यामुळे बॉडीकॉन ड्रेस जेव्हा घालता तेव्हा तुम्ही शेपवेअर घालणं अत्यंत गरजेचे आहे. यामुळे अतिरिक्त चरबी दिसून येत नाही. तसंच फिगरचे कर्व्हज अगदी व्यवस्थित यामध्ये दिसून येतात. शॉर्ट ड्रेसमध्ये शेपवेअर घातल्याने आतील ब्रा अथवा अंडरवेअरचा आकारही दिसून येत नाही. त्यामुळे तुम्हाला सतत डोक्यात याबाबत शंका राहात नाही की, कोणता विचित्र आकार दिसत नाही ना? तुम्ही बिनधास्त वावरू शकता. 

अंडरगारमेंट्सचा रंग (Colour of undergarments)

शॉर्ट आणि टाईट फिटिंग ड्रेस असतो तेव्हा त्यामध्ये योग्य रंगाचे अंडरगारमेंट्स घालणे हे अत्यंत गरजेचे आहे. बॉलीवूड स्टाईल एक्सपर्ट आऊटफिट घालताना मॅचिंग अथवा न्यूड रंगाची अथवा स्किन कलरची अंडरगारमेंट्स घालण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे उठताना अथवा बसताना कोणत्या विचित्र मोमेंटचा तुम्हाला सामना करावा लागू नये. तसंच असे शॉर्ट ड्रेस घातल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वासाने आणि अगदी नेहमीप्रमाणे सोयीस्करपणे फिरता यावे यासाठीच तुम्ही ही काळजीही घेतली पाहिजे. वेगळ्या रंगाची चड्डी असेल तर कपड्यांमधून त्याचा रंग दिसण्याचा संभव असतो. त्यामुळे शक्यतो ही काळजी तुम्ही घ्या. 

ADVERTISEMENT

स्टिक ऑन ब्रा चे प्रकार आणि कशी घ्याल काळजी

सीमलेस अंडरगारमेंट्स

कोणतेही शॉर्ट अथवा बॉडीकॉन अथवा टाईट ड्रेस असतील तर त्यासह अनेक अभिनेत्री या सीमलेस अंडरगारमेंट्सचा वापर करतात. टाईट फिटिंग आऊटफिटमध्ये बॉडी कर्व्हसह अंडरगारमेंट्सच्या लाईन्स दिसून येण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी सीमलेस अंडरगारमेंट्सचा चांगलाच उपयोग होतो. अशा कपड्यांमध्ये तुम्ही लेजर कट, थाँग्ज, लेसच्या अंडरगारमेंट्स अथवा स्ट्रेपलेस बॉडीसूटचा वापर करू शकता. अभिनेत्री जेव्हा असे कपडे घालतात तेव्हा आपल्याला नेहमीच हा प्रश्न पडतो की आतमध्ये नक्की असे कोणते कपडे घातले जातात ज्यामुळे इतका चांगला लुक येतो. तुम्हीही याचा वापर करून शॉर्ट ड्रेस बिनधास्त घालू शकता. 

बॉडीकॉन ड्रेस वापरायचे असतील तर लक्षात ठेवा या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT