ADVERTISEMENT
home / आरोग्य
पायाच्या तळव्यांची होत असेल जळजळ तर करा हे घरगुती उपाय

पायाच्या तळव्यांची होत असेल जळजळ तर करा हे घरगुती उपाय

आजकाल अनेकांना घरात राहूनही अनेकांना सतत पायाच्या तळव्यांची जळजळ अथवा आग झाल्याची समस्या जाणवते. शरीरात जर कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स कमी असतील अथवा शरीरात जास्त प्रमाणात युरीक अॅसिड निर्माण झालं तर तुमच्या तळव्यांची आग होऊ शकते. बऱ्याचदा यामागचं कारण जास्त वेळ उन्हात काम करणं अथवा डिहायड्रेशन असू शकतं. काही आरोग्य समस्या अथवा अती कष्टदायक कामांमुळेही पायाचे तळवे दुखतात आणि त्यातून जळजळ जाणवते. समस्या अती गंभीर असेल तर यावर त्वरीत वैद्यकीय उपचार करावेत. मात्र काही घरगुती उपचारांमुळेही तुम्हाला चांगला आराम मिळु शकतो. यासाठीच जाणून घ्या पायाची जळजळ थांबण्यासाठी आणि शरीराला थंडावा मिळण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे.

या घरगुती उपचारांनी कमी करा तळव्यांची जळजळ

टाचा दुखणं अथवा तळव्याची जळजळ होणं ही सामान्य समस्या असती तरी त्यावर वेळीच वैद्यकीय उपचार करावेत. शिवाय काही घरगुती उपचार करूनही तुम्ही तळव्याची आग कमी करू शकता.

सैंधवचा करा वापर

सैंधव हा मीठाचा प्रकार जसा खाण्यासाठी आरोग्यदायी आहे तसाच तुम्ही त्याचा वापर तळव्यांची  जळजळ कमी करण्यासाठी करू शकता. कारण या मीठात मॅग्नेशिअम आणि सल्फेट भरपूर प्रमाणात असते. सहाजिकच त्यामुळे तुमच्या पायांच्या तळव्यांना चांगला आराम मिळतो. यासाठी एक टब गरम पाण्यात  चार ते पाच चमचे सैंधव टाका. पाणी कोमट झाल्यावर त्यात पाय बूडवून ठेवा. पंधरा ते वीस मिनीटे पाय या पाण्याच शेकवल्यामुळे तुमच्या पायांच्या टाचा आणि  तळव्यांचे स्नायू शिथील होतील. दिवसभरात दोन वेळा हा उपाय करा ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

थंड पाण्याने करा उपचार

जर तुमच्या घरात सैंधव नसेल तर तुम्ही तळव्यांना थंडावा मिळण्यासाठी थंड पाण्यात पाय बूडवून ठेवू शकता. थंड पाण्यात पंधरा ते वीस मिनीट पाय बूडवून ठेवल्यामुळे पायांच्या तळव्यांना चांगला आराम मिळेल. तुम्ही पाणी थंड करण्यासाठी साध्या पाण्यात बर्फ टाकू शकता. बर्फाचा शेक घेतल्यामुळेही पायाचे स्नायू शिथील होतील. मात्र हा उपचार करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा  सल्ला घ्या. 

ADVERTISEMENT

आल्याचा रस लावा

आल्याच्या रसामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. आल्याचा रस पायाच्या तळव्यांना लावण्यामुळे तुमच्या पायाचे रक्ताभिसरण सुधारते आणि तळव्यांची आग कमी होते. यासाठी कोमट नारळाच्या  तेलात काही थेंब ऑलिव्ह ऑईल आणि आल्याचा रस टाका. मिश्रण एकजीव करून ते पायाच्या तळव्यांना लावा. या तेलाने तुम्ही पायाच्या टाचा, तळवे आणि पोटऱ्यांना मालिश करू शकता. यासोबतच आल्याचा चहा घेतल्यामुळेही तुम्हाला बरे वाटेल.

हळदीचा करा वापर

हळदीमध्ये अॅंटि इनफ्लैमटरी आणि अॅंटि मायक्रोबिअल गुणधर्म असतात. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या पायावर होतो आणि पायाच्या तळव्यांची आग कमी होते. यासाठी नारळाच्या तेलात चिमूटभर हळद मिसळा ते गरम करा आणि कोमट झाल्यावर पायाच्या तळव्यांना लावा. या तेलाने तुम्ही पूर्ण पायाला मसाज करू शकता. यासोबतच हळदीचे दूध प्या ज्यामुळे तुमच्या पायातील वेदना नक्कीच कमी होत जातील. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

अचानक पाय मुरगळल्यास करावे हे सोपे उपाय

पायांच्या टाचांवरील भेगा कमी करण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

पायाच्या पोटऱ्या दुखतात घरगुती उपाय (Causes And Home Remedies For Foot Pain)

26 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT