कांदा आणि बटाट्याला मोड येऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स

कांदा आणि बटाट्याला मोड येऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स

भारतीय खाद्यसंस्कृतीत कांदे आणि बटाटे या घटकांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. भाजी, डाळ, थालिपीठ, पराठे, धपाटे, भजी असे अनेक पदार्थ कांदे बटाटे न घालता करताच येऊ शकत नाही. सहाजिकच आठवडाभरासाठी अथवा महिनाभर पुरतील एवढ्या प्रमाणात घरात कांदेबटाटे  भरून ठेवले जातात. मोठे कुटुंब असेल तर बऱ्याचदा पावसाळ्याची तरतूद म्हणून वीस ते तीस किलो कांदे स्वयंपाक घरात साठवले जातात. मात्र कांदे आणि बटाटे घरातील उबदार वातावरणात लगेच खराब होतात. काही दिवसांमध्येच त्यांना मोड येऊ लागतात. जर तुम्ही या समस्येने त्रस्त होत असाल तर या टिप्स फॉलो करा. ज्यामुळे तुमच्या किचनमधील कांदे बटाटे लवकर खराब होणार नाहीत. 

कांदेबटाटे उबदार जागी साठवून ठेवू नका

घरातील वातावरण उबदार असेल तर कांदे बटाटे लवकर खराब होतात. त्यामुळे घरात ज्या ठिकाणी फार उष्णता अथवा फार गारवा नसेल अशा जागी कांदे बटाटे साठवून ठेवावे. उन्हाळ्यात शक्य असल्यास माळा, बाल्कनी अशा हवेशीर ठिकाणी कांदे बटाटे एखाद्या चादरीवर पसरून ठेवावे. जागेची कमतरता असल्यास तुम्ही एखाद्या जाळीदार बास्केटमध्ये कांदे बटाटे भरून ते बाल्कनी अथवा खिडकीजवळ ठेवू शकता. ज्यामुळे साठवून ठेवल्यावरही कांदे बटाट्यांना मोड येणार नाहीत.

instagram

कांदेबटाटे साठवण्यासाठी पेपरचा करा वापर

कांदे बटाटे जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्ही ते कसे साठवता हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की कांदे बटाटे साठवण्यासाठी पेपर कशाला वापरायचा? तर याचं  उत्तर असं की, पेपरमध्ये हवा खेळती राहत असल्यामुळे कांदे बटाटे खराब होत नाहीत. जर तुम्ही कमी प्रमाणात कांदे बटाटे साठवून ठेवत असाल तर ते दोन मोठ्या पेपरबॅगमध्ये ठेवा. अगदीच शक्य नसेल तर तुम्ही बास्केटमध्ये कांदे बटाटे ठेवताना त्याखाली पेपर ठेवू शकता.

कापडाचा वापर करणे राहील योग्य

बाजारात कांदे बटाटे खरेदी केल्यावर ते प्लास्टिकच्या पिशवीतून दिले जातात. बऱ्याचदा तुम्ही ते तसेच त्या पिशवीत साठवून ठेवता. मात्र प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे शक्य असल्यास कांदे बटाटे खरेदी करण्यासाठी सुती कापडी पिशवी वापरा. याचा फायदा असा की यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होणार नाही शिवाय तुम्ही विकत घेतलेल्या कांदे बटाट्यांना मोडदेखील येणार नाहीत. सुती कापडामध्ये हवा खेळती राहते आणि कांदे बटाटे खराब होत नाहीत. 

instagram

फळांसोबत ठेवू नका कधीच ठेवू नका कांदेबटाटे

काही जणांना कांदे बटाटे आणि फळं एकत्र स्टोरेज रूममध्ये ठेवण्याची सवय असते. असं केलं तर तुमचे कांदे बटाटे लवकर खराब होतील. कारण फळं पिकण्याच्या प्रोसेसमध्ये असल्यामुळे त्यांच्यासोबत कांदे बटाट्यांमध्येही रासायनिक क्रिया या घडून त्यांना मोड येऊ लागतात.

कांदेबटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका

कांद्या बटाट्यांना मोड येऊ नयेत म्हणून ते फ्रीजमध्ये साठवून ठेवू नका. कारण फ्रीजमध्ये ओलावा असल्यामुळे तिथे कांदे बटाटे लगेच खराब होऊ शकतात. ओलाव्यामुळे ते अकुंरित होतात आणि लवकर खराब होतात. फ्रीजमध्ये कापलेले, अन्न शिजवताना उरलेले कांदे बटाटेदेखील मुळीच ठेवू नका. कारण असे साठवलेले कांदे बटाटे खाणं आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. 

Lifestyle

WIPEOUT Sanitizing Wipes

INR 69 AT MyGlamm