कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना संक्रमितांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी यासाठीच योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र सर्व काळजी घेऊनही जर तुम्हाला कोरोनाची लागण झालीच तर घाबरू नका. कारण अशा परिस्थितीत कोणालाही कोरोना होऊ शकतो. कोरोनाची भीती न बाळगता त्यावर मात करणं सध्या गरजेचं आहे. शिवाय जर तुमची लक्षणं सौम्य असतील तर तुम्ही घरीदेखील आयसोलेशनमध्ये कोरोनातून पूर्ण बरे होऊ शकता. मात्र लक्षात ठेवा कोरोनाची लक्षणं दिसताच कुटुंबापासून लगेच वेगळे व्हा आणि स्वतःला आयसोलेट करा. कारण तुमच्या कोरोना टेस्टचा रिझल्ट यायला दोन दिवस लागू शकतात. या दरम्यान जर तुम्ही कोरोना संक्रमित असाल तर तुमच्यामुळे तुमच्या घरच्यांना कोरोना होण्याची शक्यता वाढू शकते. आयसोलेट झाल्यापासून स्वतःला कोरोना झाला आहे असं समजून योग्य ती काळजी घ्या आणि या काळात सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स नीट फॉलो करा.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय (What is Mucormycosis)
घरात राहून कसं व्हाल कोरोनामुक्त (How to Treat Coronavirus at Home )
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. जसं की ताप येणे, घसा खवखवणे, खोकला, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे असे त्रास आढळल्यास तुम्ही स्वतःला कोरोना झाला आहे असं समजून स्वतःला आयसोलेट करायला हवं. अशी लक्षणं आढळल्यास कोरोनाची टेस्ट करावी आणि योग्य ते उपचार घेण्यास सुरुवात करावी. दोन दिवसांमध्ये तुमच्या कोरोना टेस्टचा रिझल्ट मिळतो. जर या काळात तुमची ऑक्सिजनची पातळी खूप कमी झाली असेल तर तुम्हाला त्वरीत वैद्यकीय उपचारांची गरज आहे. मात्र असं नसेल तर तु्म्ही घरी राहूनही कोरोनातून बरे होऊ शकता.
कोरोना झाल्यावर घरात राहून अशी घ्या स्वतःची काळजी –
कोरोना संक्रमित झाल्यास होम आयसोलशनच्या काळात अशी घ्या काळजी
- कोरोनाची लक्षणं आढळल्यापासून पुढचे 14 दिवस खोलीतून बाहेर पडू नका. स्वतंत्र टॉयलेट असलेल्या खोलीत आयसोलेट व्हा.
- खोलीचा दरवाजा उघडताना तुम्ही तुमचे नाक आणि तोंड व्यवस्थित झाकून घ्या. त्याचप्रमाणे घरात राहणाऱ्या इतर लोकांनी N-95 सारखे तीन लेअरचे चांगले मास्क घालायला हवेत.
- होम आयसोलेशनच्या काळात तुमच्या खोलीत वेंटिलेशन चांगले असायला हवे. यासाठी घरातील खिडक्या उघड्या ठेवाव्या.
- घरात आणि विशेषतः कोरोना संक्रमित व्यक्ती असलेल्या खोलीत स्वच्छता असावी. रोज लिक्विड सॅनिटायझरने घर स्वच्छ करावे. घरातील इतर लोक जर रूग्णांच्या संपर्कात येणार असतील तर त्यांनी डबल मास्क लावावा आणि लगेच स्वतःला चांगल्या सॅनिटायझरने निर्जंतूक करावे.
- कोरोना संक्रमित व्यक्तीने दिवसातून कमीत कमी तीन वेळा स्वतःचे तापमान, ऑक्सिजन आणि शक्य असल्यास ब्लड प्रेशर तपासावे
- होम आयसोलेशनच्या काळात फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार सुरू करावे.
- सौम्य लक्षणे असलेल्या लोकांना घरगुती उपचार करूनही चांगला आराम मिळू शकतो. यासाठी नियमित वाफ घ्या, मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा सर्दी खोकल्यावरील घरगुती औषधे घ्या.
- कोरोना संक्रमित व्यक्तीने नियमित अंघोळ करणे आणि स्वच्छतेचे नित्यनेम करावे.
- मना शांत करण्यासाठी नामस्मरण, प्राणायम, मेडिटेशन करावे
- मनाला विरंगुळा मिळण्यासाठी टिव्ही, मोबाईल पाहावा अथवा व्हिडिओ कॉलवर घरातील लोक अथवा मित्रमंडळीसोबत बोलावे.
- होम आयसोलेशनच्या काळात भरपूर पाणी प्यावे. पोषक आहार आणि शक्य असल्यास गरम पाणी प्यावे.
अधिक वाचा –
कोरोना झाल्यावर किती दिवस असतात शरीरात अॅंटि बॉडीज