ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Mothers Day 2021 : मोठ्या पडद्यावरील अविस्मरणीय ‘आई’च्या भूमिका

Mothers Day 2021 : मोठ्या पडद्यावरील अविस्मरणीय ‘आई’च्या भूमिका

माँ, आई, अम्मी, अम्मा, mummy, Mumma, माई… नावं अनेक पण भावना एकच असते. अशी व्यक्ती जी आपल्याआधी आपल्याला काय हवं आहे ते ओळखते. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आई. आपलं आयुष्य आपली आई. आपल्या मुलांवर निर्व्याज प्रेम करणारी आई. अशी व्यक्ती जिच्यासोबत आपण सर्वात जास्त कंफर्टेबल असतो. आपल्या आयुष्याचा केंद्रबिदू असणारी आई. जिच्यामुळे आपण या जगात आलो. आपली पहिली मैत्रीण, पहिली शिक्षिका आणि अशी प्रत्येक भूमिका जी तिने आपल्याला वाढवण्यासाठी स्वीकारली. जी आपल्याला चांगल्या मार्गावर ठेवण्यासाठी सतत झटत असते. आपल्या यशात स्वतःच यश मानते अशी आपली आई. खरंतर तिच्यासाठी प्रत्येक दिवस आहे. पण जगभरात मदर्स डे च्या निमित्ताने तिच्यासाठी खास सेलिब्रेशन केलं जातं. 

बॉलीवूड याला विरळा नाही. आईचं प्रेम हे बॉलीवूड असो वा मराठी चित्रपट असो अगदी हुबेहुब नाही किंबहुना लार्जर दॅन लाईफच दाखवण्यात येतात. आईच्या प्रेमावरील अनेक सिनेमा बॉलीवूडमध्ये अविस्मरणीय झाले. ज्यामध्ये आईचा मुलांसाठीचा संघर्ष ते त्यांच्यावरील प्रेम असं सर्व दाखवण्यात आलं आहे. पडद्यावर आईच्या भूमिकेला अजरामर करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांना आजही त्यांच्या आईच्या भूमिकेमुळे आठवलं जातं. मदर्स डे साठी कविता करणाच्या निमित्ताने आपल्या आईला मदर्स डे च्या शुभेच्छा (mother day quotes in marathi) तर नक्की द्या आणि तुमच्या आईसोबत बॉलीवूडमधील हे चित्रपटही पाहा. ज्या चित्रपटातील भूमिका आजही आपल्या मनावर कोरलेल्या आहेत.

मदर इंडिया (Mother India)

मदर इंडिया या चित्रपटाच्या नावातच सगळं सामावलं आहे. या चित्रपटात आईची मुख्य भूमिका अभिनेत्री नर्गिस ने साकारली होती. या चित्रपटात गावातली एक गरीब आई दाखवण्यात आली होती. एक मुलगी, पत्नी आणि आई असा तिचा प्रवास व त्यातील संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी वणवण करणारी आई नर्गिसने अगदी अजरामर केली आहे. या चित्रपटातील काही दृष्य अक्षरशः अंगावर येतात. या चित्रपटातील आगीच्या सीनबाबतही मोठी कॉट्रोव्हर्सी झाली होती. मुख्य पात्र, कथानक, गाणी अशा सर्व पातळ्यांवर हा सिनेमा गाजला. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर या मदर्स डे ला नक्की पाहा.

दीवार (Deewar)

आज मेरे पास बंगला, गाडी, शौहरत सब कुछ है। तुम्हारे पास क्या है? मेरे पास माँ है….

ADVERTISEMENT

हा संवाद आजही बॉलीवूडच्या फॅन्सच्या टॉप लिस्टमध्ये आहे. 1975 साली आलेल्या अमिताभ बच्चनच्या मल्टीस्टारर दीवार चित्रपटातील हा डायलॉग आहे. या चित्रपटातील आईची भूमिका अभिनेत्री निरूपा रॉयने केली होती. या चित्रपटात निरूपा रॉयचं नाव सुमित्रा देवी होतं. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या आईच्या भूमिकेत निरूपा रॉय होत्या. एक मुलगा इन्सपेक्टर आणि दुसरा मुलगा वाईट मार्गावर गेलेला या दोघांच्यात आईवरून होणारा संघर्ष दाखवला आहे. एक आई जी आपल्या वाईट मार्गावर गेलेल्या मुलाला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करते. एका आईवरून झालेला दोघां मुलांमधील हा संवाद बॉलीवूडच्या प्रसिद्ध डायलॉग्ज्सपैकी एक आहे.

करण अर्जुन (Karan-Arjun)

मेरे करण-अर्जुन आयेंगे….असा दुर्दम्य आत्मविश्वास संपूर्ण चित्रपटात दाखवणारी आईची भूमिका अभिनेत्री राखीने करण-अर्जुनमध्ये साकारली होती. या चित्रपटात राखीने दुर्गा सिंगची भूमिका केली होती. जिची दोन्ही मुलं करण-अर्जुन मारली जातात. पण तरीही तिचा देवीवरील अतूट विश्वास कायम राहतो आणि आपली दोन्ही मुलं परत येतील असं तिला वाटतं. अखेर तिच्या मुलांचा पुनर्जन्म होतो आणि ती येतात. आईचा अतुट विश्वास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. चित्रपटात राखीच्या मुलांच्या भूमिकेत शाहरूख खान आणि सलमान खान दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट तेव्हा फार गाजला होता.

हम साथ साथ है (Hum Saath Saath Hai)

बॉलीवूड निर्माते सूरज बडजात्या यांचे चित्रपट म्हणजे फॅमिली चित्रपट असतात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे हम साथ साथ है ज्यामध्ये कुटुंबातील एकता दाखवण्यात आली आहे. पण या चित्रपटाच्या कथेची प्रेरणा रामायण आहे. या चित्रपटातील कैकेयी म्हणजेच आईची भूमिका साकारली होती अभिनेत्री रीमा लागू ने. या चित्रपटात मुलांवरील संस्कारच त्यांना चांगला माणूस बनवतात हे दाखवण्यात आलं आहे.

मॉम (MOM)

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात श्रीदेवीने साकारलेली देवकी सबरवालची भूमिका सगळ्यांसाठी जणू एक आदर्श आहे. या चित्रपटातील आई आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करताना दाखवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

इंग्लिश विंग्लीश (English Vinglish)

अभिनेत्री श्रीदेवीच्या अभिनयाने सजलेला हा अजून एक आईवरचा चित्रपट आहे. एक स्त्री, बायको आणि आई जी स्वतःला इंग्लीश समजत आणि येत नाही म्हणून धडपडताना दिसते आणि ती भाषा शिकण्याचं ठरवते. एक आई जी आपल्या मुलांना आपलं महत्त्व पटावं यासाठी संघर्ष करताना दिसते. पण हे जास्त गंभीरपणे न दाखवता कथेत छान गुंफल आहे. आई जेव्हा काही करायचं ठरवतं तेव्हा ती करूनच दाखवते अशी या चित्रपटाची थीम आहे. एका आईचा प्रवास जी सगळ्या गोष्टींवर मात करून, तिला चिडवलं गेल्यावरही आपल्या कुटुंबाला आपलं मह्त्त्व एकापेक्षा जास्त आहे हे पटवून देते. ही फक्त एका आईची कथा नसून समाजात आपलं स्थान निर्माण करणारी स्त्री आहे.

सिक्रेट सुपरस्टार (Secret Superstar)

आपल्या मुलीचं गायिका होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी आई सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात आई नजमा स्वतःचे दागिने विकून मुलगी इन्शियासाठी लॅपटॉप खरेदी करते. जेणेकरून तिला तिची गाणी रेकॉर्ड करून ते व्हिडिओ ऑनलाईन अपलोड करता येतील. चित्रपटाचा शेवट तर अजूनच अंगावर येणार आहे. जेव्हा इन्शियाची आजी तिला सांगते कसं तिने आपल्याला मुलीला या जगात आणण्यासाठी लढा दिला. जेव्हा तिच्यावर घरच्याकडून गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला जात होता. हा चित्रपट खरोखर बघण्यासारखा आहे. हा एक म्युझिकल-ड्रामा चित्रपट असून झाईरा वसीम, आमीर खान आणि मेहेर वीज सगळ्यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण आणि छान आहेत.

नील बट्टे सन्नाटा ( Nil Battey Sannata)

नील बट्टे सन्नाटा हा आई-मुलीच्या नात्यावरील गोड चित्रपट आहे. तुमचं स्वप्न जर योग्य असेल तर ते पूर्ण होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. जे तुमचं आयुष्य बदलू शकत. मग तुमची परिस्थिती कशी का असेना. विचार करायला लावणारी चंदाची कहाणी या चित्रपटात आहे. जिचं स्वप्नं फक्त आपल्याला मुलीचं शिक्षण पूर्ण करणं आणि तिला चांगलं आयुष्य देणं एवढंच आहे. पुन्हा एकदा अशी आई जी स्वतःला विसून आपल्या मुलीच्या चांगल्यासाठी धडपडताना दिसते. हा चित्रपट भरपूर चित्रपट महोत्सवात गाजला आहे. व्यावसायिकरित्या हा चालला की नाही माहीत नाही. पण अर्थपूर्ण चित्रपट आपल्या आईसोबत पाहायचा असल्यास हा चित्रपट नक्की पाहा.

बदला (Badla)

‘बदला’ हा 2019 साली आलेल्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत तापसी पन्नू, अमृता सिंग आणि अमिताभ बच्चन आहेत. हा चित्रपट नावाप्रमाणेच सूडावर आधारित कथा आहे. जिथे एक आई आपल्या खून झालेल्या मुलाच्या आरोपींचा शोध लावते. हा चित्रपट सस्पेन्स थीमवर आधारित असून खरंच पाहण्यासारखा आहे. कारण शेवटपर्यंत या चित्रपटातील सस्पेन्स कायम राहिला आहे.

ADVERTISEMENT

तारे जमीं पर (Taare Zameen Par)

मैं कभी बतलाता नही…पर अंधेरे से डरता हूं मैं माँ। या चित्रपटाने बालचित्रपटांची व्याख्या बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 8 वर्षांचा एक मुलगा, त्याचा भाऊ आणि आईबाबा यांच्यावरील हा सिनेमा आहे. पण ही कथा प्रत्येक मुलाची होईल अशी आहे. पालक, प्रत्येक आई आणि प्रत्येक मुलांशी कनेक्ट होणारी ही कथा खूपच साध्या पण संवेदनशील पद्धतीने मांडण्यात आली आहे. ज्यातले अभिनेत्यांचे अभिनयही एक से एक आहेत. चित्रपटातलं माँ हे गाणं खूप सुंदररित्या दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट बघताना तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल.

मग यंदा मदर्स डे ला आईसोबत असाल तर यापैकी एखादा चित्रपट तिच्यासोबत नक्की पाहा आणि मस्तपैकी वेळ घालवा. तुम्हा सगळ्यांना POPxo मराठी कडून मदर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.

You Might Like These:

Mothers Day Message in Hindi
Happy Mothers Day Quotes in Hindi
माँ पर कविता

04 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT